२०२२-०३-१९

गीतानुवाद-२४०: क्या क्या न सहे हमने सितम आपके खातिर

मूळ हिंदी गीत: हसरत, संगीत: शंकर-जयकिसन, गायक: लता-रफी
चित्रपट: मेरे हुजूर, साल: १९६८, भूमिका: माला सिन्हा, जितेंद्र, राजकुमार 

मराठी अनुवाद: नरेंद्र गोळे २०१३०७०९

प्र

तेरा चेहरा कँवल समझता हूँ
चाँदनी का बदन समझता हूँ
तेरी आँखें नहीं दो मिस्रें हैं
तेरी आँखें ग़ज़ल समझता हूँ

तुझा चेहरा कमळ मी मानतो
तव शरीरास चांदणे समजे
तुझे न नेत्र, ओळी त्या आहेत
मी त्यांना गझलच मानतो

 

तेरा चेहरा सुबह का सूरज है
तुझसे मिलने की आस रहती है
तेरे जलवे कहीं भी रोशन हो
रोशनी दिल के पास रहती है

तुझा चेहरा सकाळचा सूर्य
तुला भेटण्याची आशा राहे
तुझी दीप्ती कुठेही तळपो
उजेड मनापाशीच राहे

धृ

क्या क्या न सहे हमने सितम आपके खातिर
ये जान भी जायेगी सनम आपके खातिर

कसकसले सोसले न त्रास ग तुझ्यासाठी
हे प्राणही जातील सखे ग तुझ्यासाठी

 

तडपे है सदा अपनी कसम आपके खातिर
निकलेगा किसी रोज ये दम आपके खातिर

तळमळले सदा, शपथ माझी, रे तुझ्यासाठी
जाईल प्राण एखाद्या दिवशी, रे तुझ्यासाठी

इक आप जो मिल जाये तो मिल जाये खुदाई
मंजूर है दुनिया के आलम आपके खातिर

मिळालीस जर तू, लाभलाच देव बघ मला
कबूल सारे विश्व मला, ग तुझ्यासाठी

हम आपके तस्वीर निगाहों में छुपाकर
जाग आये अक्सर शब्बे गम आपके खातिर

मी डोळ्यांत तव मूर्ती ठेवुनी लपवून
जागल्या किती दुःखराती, रे तुझ्यासाठी

लोगोंने हमे आपका दिवाना बताया
ऐसे हुए हमपे करम आपके खातिर

लोक म्हणतात मला खुळावलो ग तुझ्यासाठी
आले असे आळ सखे, ग तुझ्यासाठी

हम राहे वफा से कभी पिछे न हटेंगे
सुन लिजिए मिट जायेंगे हम आपके खातिर

प्रेमाच्या पथावरून ना मी मागे कधी सरेन
ऐकून घे, संपेनही मी, रे तुझ्यासाठी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.