२०२१-०७-१९

गीतानुवाद-२१७: उनसे मिली नजर

मूळ हिंदी गीतः हसरत जयपुरी, संगीतः शंकर जयकिसन, गायकः लता
चित्रपटः झुक गया आसमान, सालः १९६८, भूमिकाः सायरा बानू, राजेंद्रकुमार 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०११०८१४ 

धृ

उनसे मिली नजर के मेरे होश उड गये
ऐसा हुआ असर के मेरे होश उड गये

जादू अशी नजर, की माझे भान हरपले
ऐसे मी गुंतले, की माझे भान हरपले

जब वो मिले मुझे पहली बार
उनसे हो गयी आँखे चार
पास न बैठे पल भर वो
फिर भी हो गया उनसे प्यार
इतनी थी बस खबर के मेरे होश उड गये

जेव्हा भेटलो पहिल्यांदा
नजरानजरी घडतांना
क्षणभर बसले न, त्यांच्या जवळ
जडले तरी मन त्यांचेवर
एवढीचशी बातमी, की माझे भान हरपले

उनकी तरफ दिल खिंचने लगा
बढके कदम फिर रुकने लगा
पास गयी मैं जाने क्यों
अपने आप दम घुटने लगा
छाये वो इस कदर के मेरे होश उड गये

त्यांच्याकडेच मन घेई ओढ
पुढे एक पाऊल, एक मागे ओढ
गेले जवळ मी का जाणे
झाली सुरू आपसुक तगमग
भरले असे मनात, की माझे भान हरपले

घर मेरे आया वो मेहेमान
दिल में जगाये सौ तुफान
देख के उनकी सुरत को
हाय रह गयी मैं हैरान
तडपू इधर उधर के मेरे होश उड गये

माझ्या घरी ते पाहुणे आले
मनात शंभर सुरू वादळे
पाहून त्यांच्या मुखकमळा
पार थक्क मी, लागे लळा
तळमळू इथे तिथे, की माझे भान हरपले

 

https://www.youtube.com/watch?v=vZMugvWNg-I

२०२१-०७-१५

गीतानुवाद-२१६: दिल के अरमा

मूळ हिंदी गीत: हसन कमाल, संगीतकार: रवी, गायिका: सलमा आगा
चित्रपट: निकाह, सालः १९८२, भूमिकाः राज बब्बर, सलमा आगा 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२१०७१५


धृ

दिल के अरमा आँसुओ में बह गये
हम वफ़ा करके भी तनहा रह गये

अंतर्रीरादे अश्रुंतची वाहून गेले
प्रेम करूनही एकटी मी राहिले

जिंदगी एक प्यास बन कर रह गयी
प्यार के किस्से अधूरे रह गये

जीवनही तहान होऊन राहिले
प्रेमाचे किस्से अधूरे राहिले

शायद उनका आखरी हो ये सितम
हर सितम ये सोच कर हम सह गये

हा बहुधा अखेरचा त्याचा गुन्हा
अपराध सारे हेच समजुन साहिले

खुद को भी हम ने मिटा डाला मगर
फ़ासले जो दरमियाँ थे रह गये

मी स्वतःला संपवलेही पण तरी
दोघांतले अंतर कधि ना सांधले


https://www.youtube.com/watch?v=C2i9ZFMHG3I

२०२१-०७-१२

गीतानुवाद-२१५: किसी राह मे किसी मोड पर

मूळ हिंदी गीतः आनंद बक्षी, संगीतः कल्याणजी आनंदजी, गायकः लता, मुकेश
चित्रपटः मेरे हमसफर, सालः १९७०, भूमिकाः जितेंद्र, शर्मिला टागोर 


मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२१०७१२

 

धृ

किसी राह मे किसी मोड पर
कहीं चल न देना तू छोड कर
मेरे हमसफर मेरे हमसफर
मेरे हमसफर मेरे हमसफर

 

 

कुठे वाटेवर कुठे वळणावर
सोडून नको जाऊस तू निघून
माझे सहचरा माझे सहचरा
माझे सहचरा माझे सहचरा

 

किसी हाल में किसी बात पर
कहीं चल न देना तू छोड कर
मेरे हमसफर मेरे हमसफर
मेरे हमसफर मेरे हमसफर

मु

 

कुठल्या स्थितीत कुण्या गोष्टीवर
सोडून नको जाऊस तू निघून
माझे सहचरे माझे सहचरे  
माझे सहचरे माझे सहचरे

मेरा दिल कहे कहीं ये न हो
नही ये न हो नहीं ये न हो
किसी रोज तुझसे बिछड के मै
तुझे ढुंडती फिरू दर बदर
मेरे हमसफर मेरे हमसफर
मेरे हमसफर मेरे हमसफर

 

माझे मन म्हणे कधी हे न हो
कधी हे न हो कधी ते न हो
कुण्या दिवशी सुटून तुझी साथ मी
दारोदार हुडकत फिरू मी तुज
माझे सहचरा माझे सहचरा
माझे सहचरा माझे सहचरा

तेरा रंग साया बहार का
तेरा रूप आईना प्यार का
तुझे आ नजर में छुपा लूं मै
तुझे लग न जाये कहीं नजर
मेरे हमसफर मेरे हमसफर
मेरे हमसफर मेरे हमसफर

मु

 

तुझा रंग बहारीची सावली
तुझे रूप प्रेमाचा आरसा
ये तुला नजरेत मी साठवू
तुला लागू नये कुणाची नजर
माझे सहचरे माझे सहचरे
माझे सहचरे माझे सहचरे

तेरा साथ है तो है जिंदगी
तेरा प्यार है तो है रोशनी
कहाँ दिन ये ढल जाये क्या पता
कहाँ रात हो जाये क्या खबर
मेरे हमसफर मेरे हमसफर
मेरे हमसफर मेरे हमसफर


मु

मु
दो

तुझ्या साथीनेच ही जिंदगी
तुझी प्रीत हाच प्रकाश की
कुठे मावळेल हा दिस ना कळे
कुठे होईल रात न मुळी कळे
माझे सहचरा/रे माझे सहचरा/ रे
माझे सहचरा/रे माझे सहचरा/ रे

 

https://www.youtube.com/watch?v=N2RXpMC-1r8

२०२१-०७-११

गीतानुवाद-२१४: काँटों से खींच के ये आँचल

चित्रपटः गाईड, भूमिकाः देव आनंद, वहीदा रहमान
मूळ हिंदी गीतकारः शैलेन्द्र, संगीतः सचिनदेव बर्मन, गायकः लता 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१००१०४

धृ

काँटों से खींच के ये आँचल
तोड़ के बंधन बांधे पायल
कोई न रोको दिल की उड़ान को
दिल वो चला ह ह हा हा हा हा
आज फिर जीने की तमन्ना है
आज फिर मरने का इरादा है

काट्यांतून सोडवून पदराला
बांधले पैंजण मोडून प्रथेला
रोखा ना कुणी मनोरथा
तो निघाला ह ह हा हा हा हा
आज पुन्हा जगण्याची इच्छा आहे
आज पुन्हा मरण्याचा इरादा आहे

अपनेही बस में नहीं मैं
दिल हैं कहीं, तो कहीं मैं
जाने क्या बात हैं मेरी जिंदगी में
हस कर कहा अ अ आ आ आ आ

मी न स्वतःच्या काबूत आहे
मन माझे कुठे, कुठे मी आहे
न जाणे काय आहे जीवनात माझ्या
म्हटले हसून अ अ आ आ आ आ

मैं हूँ खुमार या तूफाँ हूँ
कोई बताए मैं कहाँ हूँ
डर है सफ़र में कहीं खो न जाऊँ मैं
रस्ता नया अ अ आ आ आ आ

आहे कैफात, का वादळात मी
सांगा कुणी, कुठे आहे मी
भीते वाटेतच हरवून न जाऊ
रस्ता नवा अ अ आ आ आ आ

कल के अंधेरों से निकल के
देखा है आँखें मलते मलते
फूल ही फूल ज़िंदगी बहार है
तय कर लिया अ अ आ आ आ आ

कालच्या निघून अंधारातून
चोळतच डोळे पाहिले मी
फूल आहे, फूल, जीवन बहार आहे
निश्चय केला अ अ आ आ आ आ

 

https://www.youtube.com/watch?v=hCmOGikiNoQ

२०२१-०७-०९

गीतानुवाद-२१३: मेरे ख्वाबों में जो आये

मूळ हिंदी गीतः आनंद बख्शी, संगीतः जतीन-ललित, गायकः लता
चित्रपटः दिलवाले दुल्हनियाँ ले जाएँगे, सालः १९९५, भूमिकाः शाहरुख खान, काजोल 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१५१००१

धृ

मेरे ख्वाबों में जो आएँ
आ के मुझे छेड जाएँ
उससे कहो कभी सामने तो आएँ
मेरे ख्वाबों में जो आएँ
आ के मुझे छेड जाएँ
उससे कहो कभी सामने तो आएँ
मेरे ख्वाबों में जो आएँ

माझ्या स्वप्नांतून जो येई
येऊन मला चिडवून जाई
त्याला सांगा कधी समोर तर यावे
माझ्या स्वप्नांतून जो येई
येऊन मला चिडवून जाई
त्याला सांगा कधी समोर तर यावे
माझ्या स्वप्नांतून जो येई

कैसा हैं, कौन हैं, वो जाने कहाँ हैं
जिसके लिए मेरे होटों पे हाँ हैं
अपना हैं या बेगाना हैं वो
सच हैं या कोई अफसाना हैं वो
देखे घूर घूर के युँही दूर दूर से
उससे कहो मेरी निंद ना चुराएँ

कसा आहे, कोण आहे, न जाणे कुठे आहे
ज्याच्यासाठी माझ्या ओठांवर हो आहे
आपला आहे की परका आहे तो
खराच आहे की कथाभागच आहे तो
पाहे रोख रोखून, असाच दूर दूरून
त्याला सांगा माझी उडवू नको झोप रे

जादू सा जैसे कोई चलने लगा है
मैं क्या करूँ दिल मचलने लगा हैं
तेरा दिवाना हूँ कहता हैं वो
छुपछुप के फिर क्यूँ रहता हैं वो
कर बैठा भूल वो ले आया फूल वो
उससे कहो जाएँ चाँद लेके आएँ

जादू खरेच जणू होऊ लागली आहे
मी काय करू मनच उसळत आहे
तुझाच खुळा ग मी, म्हणतो तो आहे
लपूनछपून का मग राहतो तो आहे
आणले त्याने फूल आहे, केली ही चूक आहे
त्याला सांगा जाऊन चंद्र घेऊन यावे


https://www.youtube.com/watch?v=Zxgvob1Ew0c

२०२१-०७-०८

गीतानुवाद-२१२: मीठी मीठी बातों से

मूळ हिंदी गीतः हसरत जयपुरी, संगीतः दत्ताराम वाडकर, गायीकाः लता
चित्रपटः कैदी नं.९११, सालः १९५९, भूमिकाः जागीरदार, मेहमूद, नंदा, शेख मुख्तार, डेझी इराणी 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१३१०२२

प्रस्ताव

और गाओ ना दिदी

आणखी म्हण ना ताई

धृ

मीठी मीठी बातों से बचना जरा
दुनिया के लोगों में है जादू भरा

गोड गोड गप्पांपासून सावध रहा
भारलेल्या लोकांतील जादू पहा

खूब तेज है इल्म जिसे
कोई चोर भी ले न सके
भर ले खजाना, तेरा जमाना
जग में रहेगा तेरा नाम सदा

मेहनत से दिन रात पढुंगा
पहला नंबर पास करूंगा
शाबाश

ज्याला ज्ञान ते खूप असे
कोणी चोर ते हरू न शके
भर खजिना, हा काळ तुझा
राहिल जगात, तुझे नाव सदा 

कष्टाने दिन रात शिकेन
वर्गात नेहमी पहिला असेन
शाब्बास

खेल कूद में खोना नहीं
बात बात में रोना नहीं
तू है सितारा चंदा से प्यारा
करना जहाँ में कोई काम बडा

हिंदुस्तान की शान बनुंगा
देश का उँचा नाम करुंगा
शाबाश

खेळाखेळातच हरवू नको
जेव्हा तेव्हा मुला तू रडू नको
तू आहेस तारा, चंद्राहून प्यारा
काम जगी थोर तू कर रे मुला

मी भारताची शान ठरेन
देशाचे उज्ज्वल नाव करेन
शाब्बास

झूम झूम तुफाँ के नजर
राहे घेरले तेरी अगर
होगा अंधेरा कोई न तेरा
फिर तू बचेगा कैसे हमको बता

तुफानों से नहीं डरुंगा
हिम्मत से मै निकल पडुंगा
शाबाश

भिरभिर येत्या वादळी जर
मार्ग घेरले तुझे समज
होईल अंधार, कुणी सोबतीस ना
वाचशील कसा मग सांग जरा

घाबरेन ना वादळा मी
धैर्याने पुढे जाईन मी
शाब्बास

http://www.youtube.com/watch?v=E-8bzOvaS44