२०२१-०१-३०

गीतानुवाद-१८२: जाइये आप कहाँ जायेंगे

मूळ हिंदी गीत: मजरूह, संगीतः ओ.पी. नय्यर, गायीकाः आशा
चित्रपटः मेरे सनम, सालः १९६५, भूमिकाः विश्वजीत, आशा पारेख, मुमताज 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००८०७२६

धृ

जाइये आप कहाँ जायेंगे
ये नज़र लौट के फिर आयेगी
दूर तक आप के पीछे पीछे
मेरी आवाज़ चली आयेगी

जायचे जा जिथे तुला वाटेल
परतुनी ही पुन्हा नजर येईल
दूरवर चालुनी पाठी पाठी
तुजवरी हाक ही माझी येईल

आपको प्यार मेरा
याद जहाँ आयेगा
कोई काँटा वोही दामन
से लिपट जायेगा

माझ्या प्रीतीची तुला
सय जिथे कुठे येईल
कुणी काटा तिथेच
रोखेल अडकून तुला

जब उठोगे मेरी
बेताब निगाहों की तरह
रोक लेंगी कोई डाली
मेरी बाहों की तरह

जेव्हा उठशील माझ्या
बेकाबू नयनांसारखा
तुला रोखेल कुणी फांदी
हातांगत माझ्या

देखिये चैन मिलेगा
न कहीं दिल के सिवा
आपका कोई नहीं
कोई नहीं दिल के सिवा

मजविना चैन ना
पडणार तुला कोठेही
रे तुझे कोणी नाही
कोणी नाही सोडून मला


https://www.youtube.com/watch?v=2Z_ihYJLBCE

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.