२०२१-०१-२८

गीतानुवाद-१८०: आँखों में क्या जी

मूळ हिंदी गीतः मजरूह सुलतानपुरी, संगीतः सचिनदेव बर्मन, गायकः आशा, किशोरकुमार
चित्रपटः नै दो ग्यारह, सालः १९५७, भूमिकाः देव आनंद, कल्पना कार्तिक 

धृ

आँखों में क्या जी
रुपहला बादल
बादल में क्या जी
किसी का आँचल
आँचल में क्या जी
अजब सी हलचल

डोळे काय बघती
रुपेरी जलधर
त्यातहि काय आहे
नवतीचा पदर
पदरात काय आहे
चाहुली कुतुहल

रंगीं है मौसम
तेरे दम की बहार है
फिर भी है कुछ कम
बस तेरा इंतज़ार है
देखने में भोले हो
पर हो बड़े चंचल

रंगीत ऋतू आहे
तुझ्यामुळेच ही बहार
उणे तरीही काय
बस तुझीच आहे वाट
वाटसी भोळा तरीहि
आहेस तू अचपळ

झुकती हैं पलकें
झुकने दो और झूम के
उड़ती हैं ज़ुल्फें
उड़ने दो होंठ चूम के
देखने में भोले हो
पर हो बड़े चंचल

झुकती पापण्या
झुकू दे नाचनाचुनी
उडती केसही हे
उडू दे ओठ चुंबुनी
वाटसी भोळा तरीहि
आहेस तू अचपळ

झूमें लहराएं
नयना मिल जाये नैन से
साथी बन जाएं
रस्ता कट जाये चैन से
देखने में भोले हो
पर हो बड़े चंचल

डोळे हे बघती
भेटती नयना हे नयन
साथीच होऊ देत
वाट होईल सुखकर ही
वाटसी भोळी तरीहि
आहेस तू अचपळ

 https://www.youtube.com/watch?v=beF9TC8FY_M

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.