२०२१-०२-०६

गीतानुवाद-१८३: हम ने जफ़ा न सीखी

मूळ हिंदी गीतः हसरत जयपुरी, संगीतः शंकर-जयकिसन, गायकः मोहम्मद रफी
चित्रपटः जिंदगी, साल: १९६४, भूमिकाः राजेंद्रकुमार 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००८१०१७

धृ

हम ने जफ़ा न सीखी
उनको वफ़ा न आयी
पत्थर से दिल लगाया
और दिल ने चोट खाई

शिकली न वंचना मी
प्रिती तिला न आली
मन वाहिले शिळेवर
त्याला इजाच झाली

अपने ही दिल के हाथों
बरबाद हो गये हम
किससे करें शिकायत
अब किसको दें दुहाई

आपल्या मनाच्या-हस्ते
पुरता मी नष्ट झालो
तक्रार करू कुणाशी
विनवू कुणा कुणा मी  

दुनिया बनाने वाले
मैं तुझसे पूछता हूँ
क्या प्यार का जहाँ में
बदला है बेवफ़ाई

हे सृष्टी-सृजनकर्त्या
पुसतो तुलाच हे मी
प्रेमास का जगी या
मिळते कृतघ्नता ही


https://www.youtube.com/watch?v=T0gQgfXBIY8

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.