डॉ. पीटर मार्क रॉजेट यांचा जन्म १८-०१-१७७९ रोजी झाला. त्यांनीच शब्दनिधीचा विचार दिला. त्यालाच हल्ली प्रमाण मानले जाते. ब्रेन बिल्स्टन यांनी त्यांच्या कर्तृत्वाचा आलेख एका कवितेतच व्यक्त केला. ती मूळ इंग्रजी कविता आणि तिचा हा मी केलेला मराठी अनुवाद!
|
Roget’s Thesaurus |
रॉजेटचा शब्दनिधी |
|
|
|
|
मूळ इंग्रजी कविताः ब्रेन बिल्स्टन (Brian Bilston) १७७९०११८ |
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२१०११८ |
|
|
|
१ |
In order to grow, expand, widen his lexicological corpus, Roget bought, acquired, purchased a synonymopedia, a thesaurus. |
शब्दनिधीविचाराच्या सामुग्रीने वाढावं, विस्तारावं, रुंद व्हावं याकरता रॉजेट यांनी
समानार्थी शब्दसंग्रह, एक शब्दनिधीविचार प्राप्त केला, मिळवला विकत घेतला. |
२ |
Soon, presently, without delay, he no
longer ran out of things to say, speak, utter, express, articulate, give
voice to, pronounce, communicate. |
लवकरच, वर्तमानात,
अविलंब, त्यांना बोलायला, उच्चारायला, व्यक्त व्हायला, मत
मांडायला, आवाज उठवायला, घोषित करायला, संवाद साधायला शब्दांची उणीव जाणवेनाशी
झाली. |
३ |
This was all very well, fine, great, wonderful,
super, terrific but his friends, mates, pals found him boring, tedious, dull,
soporific. |
हे तर फारच
छान झाले, उत्तम झाले, थोर झाले, आश्चर्यकारक झाले, महान झाले, कमालच झाले; पण त्यांचे
मित्र, सोबती यांना ते कंटाळवाणे वाटू लागले, क्लिष्ट भासले, रटाळ आणि गुंग करणारे वाटले. |
४ |
So let this be a warning, |
त्यामुळे एक
सावधगिरीची सूचना आहे, एक शकून, एक चिन्ह, पूर्वानुमान
आहे की, आपले अवगत कौशल्य, शिक्षण, ज्ञान, विद्वत्ता, दाखवण्यासाठी हे ठीक आहे, |
५ |
but here’s a top tip, a hint, a suggestion, some advice, don’t ever let it stop you from being concise, |
मात्र एक सर्वोत्तम
मार्गदर्शन, इशारा, एक सूचना, काहीसा सल्ला असा आहे की, त्यामुळे तुम्हाला कधीही
थोडक्यात सांगता येऊ नये, असे होऊ नये, |
६ |
brief, short, clear, pithy, succinct, compendious, to the point, compact, snappy, laconic, Breviloquent. |
स्वल्प, छोटे,
स्पष्ट, नेमके, सारभूत, सारांकित, मुद्द्याचे,
सुटसुटित, जोमदार, मितभाषी आणि संक्षिप्त सांगता येऊ नये, असे होऊ नये. |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या
जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या
वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या
गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या
- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.