२०२१-०१-१६

गीतानुवाद-१७८: इक प्यार का नग़मा है

मूळ हिंदी गीतः संतोष आनंद, संगीतः लक्ष्मीकांत-प्यारेलाल, गायकः लता, मुकेश
चित्रपटः शोर, सालः १९७२, भूमिकाः मनोज कुमार, ज़या भादुरी

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००८०६२० 

धृ

एक प्यार का नग़मा है
मौजों की रवानी है
ज़िंदगी और कुछ भी नहीं
तेरी मेरी कहानी है

एक प्रेमाचे गीत आहे हे
प्रवाहाचा हा ओघच आहे
जीवन इतर काही नसून
तुझी माझी कहाणी आहे

कुछ पाकर खोना है
कुछ खोकर पाना है
जीवन का मतलब तो
आना और जाना है
दो पल के जीवन से
एक उम्र चुरानी है

काही कमवून गमवायचे
काही गमवून कमवायचे
जीवनाचा अर्थच तर
येणे आणि जाणे आहे
दो घडीच्या जगण्यातून
'जीवन' एक घडवायचे

तू धार है नदिया की
मैं तेरा किनारा हूँ
तू मेरा सहारा है
मैं तेरा सहारा हूँ
आँखों में समंदर है
आशाओं का पानी है

तू प्रवाह नदीचा आहेस
मी तर एक किनारा तुझा
आधार मला तू आहेस
आधार आहे मीही तुला
डोळ्यांत समुद्र जणू
पाणी आशांचे आहे

तूफ़ान तो आना है
आकर चले जाना है
बादल है ये कुछ पल का
छाकर ढल जाना है
परछाइंयाँ रह जातीं
रह जाती निशानी है

वादळ तर येणार आहे
येऊन निघून जाणार आहे
मेघच जणू पळभर हा
झाकोळून जाणार आहे
उरल्या सावल्याही आहेत
राहीलेल्या खुणाही आहेत

जो दिल को तसल्ली दे
वो साज़ उठा लाओ
दम घुटने से पहले ही
आवाज़ उठा लाओ
खुशियों की तमन्ना है
अश्कों की रवानी है

मनाला समाधान दे
तो सूर तू शोधून ये
शेवटल्या श्वासाआधी
आवाज तू घेऊन ये
आनंदाची कांक्षा आहे
अश्रूंचाही ओघच आहे

https://www.youtube.com/watch?v=ST_WC13rNJo

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.