२०२०-१२-२३

गीतानुवाद-१७७: उड़ें जब जब ज़ुल्फ़ें तेरी

मूळ हिंदी गीतः साहिर, संगीतः ओ.पी.नय्यर, गायकः रफी, आशा
चित्रपट: नया दौर, सालः १९५७, भूमिकाः दिलिपकुमार, वैजयन्तीमाला, अजीत

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००८०६१२

उड़ें जब जब ज़ुल्फ़ें तेरी
हो, उड़ें जब जब ज़ुल्फ़ें तेरी
कुँवारियों का दिल मचले, जिन्द मेरिये

आशा

उडे जेव्हा जेव्हा बट ती तुझी रे
उडे जेव्हा जेव्हा बट ती तुझी रे
कुमारिकांचे मन उसळे, माझ्या सजणा

हों जब ऐसे चिकने चेहरे
तो कैसे न नज़र फिसले, जिन्द मेरिये

रफ़ी

असती नितळ इतके चेहरे
तर त्यावर का नजर न ठरे, माझे सजणे

हो, रुत प्यार करन की आई
के बेरियों के बेर पक गये, जिन्द मेरिये

आशा

ऋतू प्रेमालापाचा आला
की बोरींवरची बोरे पिकली, माझ्या सजणा

कभी डाल इधर भी फेरा
के तक-तक नैन थक गये, जिन्द मेरिये

रफ़ी

कधी इकडेही कर तू फेरी
की वाट पाहून डोळे थकले, माझे सजणे

हो, उस गाँव से सँवर कभी सद्क़े
के जहाँ मेरा यार बसता, जिन्द मेरिये

आशा

त्या गावात वसू मी कशी रे
की जिथे प्रियतम राहतो, माझ्या सजणा

पानी लेने के बहाने आजा
के तेरा मेरा इक रस्ता, जिन्द मेरिये

रफ़ी

पाणी आणण्यासाठी तू ये ना
की तुझा माझा एक रस्ता, माझे सजणे

हो, तुझे चाँद के बहाने देखूँ
तू छत पर आजा गोरिये, जिन्द मेरिये

रफ़ी

चंद्र पाहतो म्हणून तुज पाहू
तू छतावर ये ना गं सये, माझे सजणे

अभी छेड़ेंगे गली के सब लड़के
के चाँद बैरी छिप जाने दे
जिन्द मेरिये

आशा

आता चिडवतील मुलगे शेजारचे
हा चंद्र मेला, निघून जाऊ दे
माझ्या सजणा

हो, तेरी चाल है नागन जैसी
रे जोगी तुझे ले जायेंगे, जिन्द मेरिये

रफ़ी

तुझी चाल आहे नागिणी जैशी
गारुडी तुला घेऊन जातील, माझे सजणे

१०

जायेँ कहीं भी मगर हम सजना
ये दिल तुझे दे जायेंगे, जिन्द मेरिये

आशा

जावो कुठेही मी माझे सजणा
हृदय तुला देऊन जाईन, माझ्या सजणा

११

, दिल लेके दगा देंगे
यार हैं मतलब के
ये देंगे तो क्या देंगे

रफ़ी

, मन घेऊन, दगा देतील
प्रियकर हे तर स्वार्थाचे,
हे देतील तर काय देतील

१२

दुनिया को दिखा देंगे
यारों के पसीने पर
हम  ख़ून बहा देंगे

रफ़ी

दुनियेला दाखवून देऊ
प्रियतमांच्या श्रमासाठी
आम्ही रक्ताचे पाट वाहवू

https://www.youtube.com/watch?v=Hr6SAJ5CfYc

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.