२०२०-०१-०१

गीतानुवाद-१३३: ये नव वर्ष हमें स्वीकार नहीं


ये नव वर्ष हमें स्वीकार नहीं
मूळ हिंदी कवीः रामधारी सिंह दिनकर – (जन्मः २३-०९-१९०८, मृत्यूः २४-०४-१९७४ )
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१९१२३१

धृ
ये नव वर्ष हमें स्वीकार नहीं
है अपना ये त्यौहार नहीं
है अपनी ये तो रीत नहीं
है अपना ये व्यवहार नहीं

नववर्ष आम्हाला मान्य न हे
हा सण काही आपला नाही
ही रीत काही आपली नाही
हा व्यवहारही आपला नाही
धरा ठिठुरती है सर्दी से
आकाश में कोहरा गहरा है
बाग़ बाज़ारों की सरहद पर
सर्द हवा का पहरा है
सूना है प्रकृति का आँगन
कुछ रंग नहीं , उमंग नहीं
हर कोई है घर में दुबका हुआ
नव वर्ष का ये कोई ढंग नहीं
चंद मास अभी इंतज़ार करो
निज मन में तनिक विचार करो
नये साल नया कुछ हो तो सही
क्यों नक़ल में सारी अक्ल बही
उल्लास मंद है जन -मन का
आयी है अभी बहार नहीं

धरा काकडे थंडीने
धुके दाटते आकाशी
वन उपवनींच्या सीमांवरती
अतिथंड हवेचा पाहरा असे
सृष्टीचे आंगण एकाकी
न रंग दिसे, न उत्साह असे
प्रत्येकजण घरी अडलेला
नववर्षाची न अशी तर्‍हा असे
काही महिने थांबा न जरा
थोडा विचारहि मनात करा
नववर्षी नवे काही तर असो सही
नक्कल करण्यात का अक्कल ही
उल्हास न दिसे जनी, न मनी
अहो आली न बहार अजून आहे

ये धुंध कुहासा छंटने दो
रातों का राज्य सिमटने दो
प्रकृति का रूप निखरने दो
फागुन का रंग बिखरने दो
प्रकृति दुल्हन का रूप धार
जब स्नेह सुधा बरसायेगी
शस्य श्यामला धरती माता
घर -घर खुशहाली लायेगी
तब चैत्र  शुक्ल की प्रथम तिथि
नव वर्ष मनाया जायेगा
आर्यावर्त की पुण्य भूमि पर
जय गान सुनाया जायेगा
युक्ति प्रमाण से स्वयंसिद्ध
नव वर्ष हमारा हो प्रसिद्ध
आर्यों की कीर्ति सदा -सदा
नव वर्ष चैत्र शुक्ल प्रतिपदा
अनमोल विरासत के धनिकों को
चाहिये कोई उधार नहीं

धुके हे जरा तरी विरु दे
साम्राज्य रात्रींचे ओसरू दे
सृष्टीचे रूप जरा सजू दे
वसंताचे रुपही रंगू दे
निसर्ग नटुनी नवरीगत
जेव्हा झरेल ती स्नेहसुधा
शस्य-शामला धरती मग
आणेल खुशाली घर, वावर
तेव्हा करू साजरे नवे वर्ष
चैत्र शुक्ल प्रतिपदा या दिवशी
आर्यावर्ताच्या पुण्यभूमीवर
गाऊ जयगान ऐकवू सर्वत्र
तर्क-प्रमाणाने स्वयंसिद्ध
आमचे नववर्ष होवो प्रसिद्ध
आर्यांची कीर्ति नेहमीकरता
नववर्ष चैत्र शुक्ल प्रतिपदा
परंपरागत अमूल्य धनवाना
नको उसने, उधार नको आहे
https://www.youtube.com/watch?v=UuvhTHacrwc

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.