मूळ हिंदी गीतः शैलेंद्र, संगीतकारः शंकर जयकिशन, गायकः लता
चित्रपटः अनाडी, सालः १९५९, भूमिकाः राज कपूर,
नूतन
माझे दोन ब्लॉग असे आहेत जे एक लाखाहून जास्त
वेळा वाचले गेले आहेत. त्याचे मला फार अपरूप वाटे. मात्र आज मी जे गाणे अनुवादाला
घेतले, पाहिले तर त्या गाण्याचे चलचित्र पाहणारे आजवर सुमारे ५४ लाख लोक आहेत.
लोकप्रियतेची अशी शिखरे गाठणारी गाणी कमालीचे शब्द, मनमोहक चाल, लोकप्रिय संगीत
आणि स्वर्गीय आवाज घेऊन चित्तखेचक चित्रिकरणाने आपल्यावर गारूड करत असतात. त्यांना
मायबोलीचे शब्द देतांना आकलन आणि अभिव्यक्ती दोन्हींचाही पुरता कस लागत असतो.
तरीही मग का बरं अनुवाद करायचा? हा प्रश्न मनाला शिवतही नाही. कारण एवढेच की,
अमृतातेही पैजा जिंकणारी आपली मायबोली, प्रीयशेखर (लोकप्रियतेच्या शिखरांवर स्वार
झालेली) गाण्यांना आपले शब्द पुरवू शकेल काय, ही पराकोटीची उत्सुकता! मग मला जे
स्फुरले ते शब्द हे असे आहेत.
॥
धृ
॥
|
वो चाँद
खिला, वो तारे हँसे
ये रात
अजब मतवारी है
समझने
वाले समझ गये हैं
ना समझे
वो अनाड़ी हैं
|
तो चंद्र आला,
तारेही आले
ही रात्र अजब
जादूई आहे
समजणारे ते समजले आहेत
ना समजले ते अडाणी आहेत
|
॥
१
॥
|
चाँदी
की चमकती राहें
वो देखो
झूम झूम के बुलाये
किरणों
ने पसारी बाहें
के अरमां
नाच नाच लहराये
बाजे दिल
के तार, गाये ये बहार
उभरे हैं
प्यार जीवन में
|
चांदीशा चमकत्या वाटा
त्या पाहती वाट नाच नाचूनी
किरणांनी पसरले हात,
त्या आशा, उंच नाचूनी जाती
वाजे मनची तार, गाते ही बहार
उमले ही प्रीत जीवनी ह्या
|
॥
२
॥
|
किरणों
ने चुनरीया तानी
बहारें
किस पे आज हैं दीवानी
चंदा की
चाल मस्तानी
हैं पागल
जिस पे रात की रानी
तारों
का जाल, ले ले दिल निकाल
पूछो ना
हाल मेरे दिल का
|
किरणांनी ओढणी घेतली
बहार ही पिशी कुणावर झाली
चंद्राची चाल मस्तानी
जिच्यावर, फिदा रात्रीची राणी
तार्यांचे जाळं, नेई मन खुशाल
नका विचारू हाल माझ्या मनचे
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या
जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या
वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या
गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या
- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.