२०१९-११-२०

गीतानुवाद-१३२: आसमाँ के नीचे


मूळ हिंदी गीतः मजरूह सुल्तानपुरी, संगीतः सचिनदेव बर्मन, गायकः लता, किशोर
चित्रपटः ज्वेल थीफ, सालः १९६७, भूमिकाः देव आनंद, वैजयंतीमाला

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१६०३२८


धृ
आसमाँ के नीचे, हम आज अपने पीछे
प्यार का जहां, बसा के चले
कदम के निशाँ, बना के चले
आकाशीच्या तळी, मी आज मागे मागे
प्रेमाचे जग हे, वसवत गेलो/ ले
पाऊली
चिन्हे, उठवत गेलो/ ले



तुम चले तो, फूल जैसे आँचल के रँग से
सज गई राहें, सज गई राहें
पास आओ मैं पहना दूँ, चाहत का हार ये
खुली खुली बाहें, खुली खुली बाहें
जिसका हो आँचल खुद ही चमन
कहिये, वो क्यूँ, हार बाहों के डाले
तू चालशी तर, पदरातील फुलागत रंगांनी
रंगल्या ह्या वाटा, सजल्या ह्या वाटा
ये जवळ, मी घालतो आहे, पसंतीचा हार
खुली आहे मिठी ही, खुली आहे मिठी ही
जिचा आहे पदर, ती स्वतःच आहे बहार
सांग मग, का म्हणून, 
घालेल कंठी हार



बोलती हैं, आज आँखें, कुछ भी न आज,
तुम कहने दो हमको, कहने दो हमको
बेखुदी बढ़ती चली है, अब तो ख़ामोश ही
रहने दो हमको, रहने दो हमको
एक बार, एक बार, मेरे लिये
कह दो, खनकें, लाल होंठों के प्याले
बोलती ना, आज डोळे, काहीच आज
तू सांगू मला दे, सांगू मला दे
वाढती ही ओढ आहे, आता तर गप्पच
राहू दे मला तू, राहू दे मला तू
एक वार, एक वार, माझ्यासाठी
म्हण, वाजतील लाल ओठांचे प्याले



साथ मेरे चलके देखो आई हैं धूम से
अब की बहारें, अब की बहारें
हर गली, हर मोड़ पे, वो दोनों के नाम से
हमको पुकारे, तुमको पुकारे
कह दो बहारों से, आएँ इधर
उन तक, उठकर, हम नहीं जाने वाले
संग माझ्या, येऊन पहा, आली गतीने
बहार ही आता, बहार ही आता
पुकारे गली गली, वळणावर, आम्हा
मलाही पुकारे, तुलाही पुकारे
सांग बहारीला, तूच ये ना इकडे
मी काही तिथवर जाणार नाही आहे



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.