२०१३-०५-०७

गीतानुवाद-०१५: ख्वाब हो तुम या कोई हकिकत


मूळ हिंदी गीत: मजरूह, संगीत: सचिनदेव बर्मन, गायक: किशोरकुमार
चित्रपट: तीन देवियाँ, भूमिका: देव आनंद, कल्पना, नंदा, सिमी

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००६१२०३ 



ख्वाब हो तुम या कोई हकिकत

स्वप्न तू की खरी हकिकत

 ॥ धृ
 ॥
ख्वाब हो तुम या कोई हकिकत
कौन हो तुम बतलाओ
देर से कितनी दूर खडी हो,
और करीब आ जाओ
स्वप्न तू की खरी हकिकत,
कोण तू सांगून टाक
किती वेळ तू उभी इथे ग,
ये जवळ आणखीन ना

 ॥
 १
 ॥
सुबह पें जिस तरह, शाम का हो गुमाँ
जुल्फों में इक चेहरा,
कुछ जाहीर कुछ निहार
जणू पहाटेवरी, गर्व संध्येचा हो
केसांतच एक चेहरा,
व्यक्त हो धुसर हो

 ॥ 
 २ 
धडकनों ने सुनी, इक सदा पाँव की
और दिल पे लहराई,
आँचल की छाव सी
स्पंदनांनी पहा, परिसले पदरवा
अन् हृदयावर पदराची,
सरकली सावली

 ॥ 
 ३ 
मिल ही जाती हो तुम, मुझको हर मोड पर
चल देती हो कितने,
अफसाने छेडकर
भेटतेसच मला, जीवनी हर घडी
निघुनी जासी, सोडूनी,
कहाण्या कितीएक


 ४ 
फिर पुकारो मुझे, फिर मेरा नाम लो
गिरता हुँ, फिर अपनी,
बाहों में थाम लो
पुन्हा बोलाव मला, अन् माझे नाव घे
अडखळतो, स्वतःच्या,
हातांनी धर मला


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.