मूळ हिंदी गीत: कमर जलालाबादी, संगीत: कल्याणजी-आनंदजी, गायक: मुकेश
चित्रपट: हिमालय की गोद मे, साल: १९६५, भूमिका: माला सिन्हा, मनोजकुमार, शशीकला
मराठी अनुवाद: नरेंद्र गोळे २००६१००१
मैं तो एक ख्वाब हूँ
|
मी तर एक स्वप्नवत्
|
|
॥धृ॥
|
मैं तो एक ख्वाब हूँ,
इस ख्वाब से तू प्यार न कर
प्यार हो जाए तो,
फिर प्यार का इज़हार न कर
|
मी तर एक स्वप्नवत्,
ह्या स्वप्नावर तू प्रेम न कर
प्रेम जडले तरी,
त्या प्रेमाचा उच्चार न कर
|
॥१॥
|
ये हवाएं सभी
चुपचाप चली जाएंगी
लौट कर फिर कभी
गुलशन में नहीं आएंगी
अपने हाथों में हवाओं को
गिरफ़्तार न कर
|
ही हवा सारी
विनाशब्द, रवाना होईल
कधी परतून पुन्हा,
ह्या उपवनी ना मग येईल
कैद आपल्याच हातांनी,
ह्या हवेला तू न कर
|
॥२॥
|
शाख से टूट के गुन्चे भी
कभी खिलते हैं
रात और दिन भी ज़माने में
कहीं मिलते हैं
भूल जा जाने दे तक़दीर से
तक़रार न कर
|
तोडूनही फांदीहून, पुष्पेही
फुलती का कधी
रात्र अन् दिवसही मिळतात,
जगीही का कधी
विसर, सोडून दे, नशीबाकडे
तक्रार न कर
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या
जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या
वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या
गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या
- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.