२०१३-०५-०७

युईंग्ज अबुदे-भाग एकूण ६ पैकी २


युईंग्ज अर्बुदे लवकर आढळून येऊ शकतात काय?

युईंग्ज अर्बुदांचा आढळ, ही घटना विरळ असते आणि ह्या अर्बुदांसाठी सर्वदूर संस्तुत गाळणी-चाचण्या (म्हणजे लक्षण-विहीन लोकांत कर्क-संभव शोधणार्‍या चाचण्या) अस्तित्वात नाहीत. तरीही, युईंग्ज अर्बुदे अनेकदा लवकरच म्हणजे, सर्वदूर प्रसार होण्यापूर्वीच, आढळून येत असतात.

युईंग्ज अर्बुदाचे सर्वात सामान्य लक्षण म्हणजे अर्बुद असलेल्या भागात दुखू लागणे. काही प्रकरणांत अर्बुद; हात, पाय अथवा धडावरील टेंगूळ वा सूज अशा स्वरूपात प्रकट दिसू लागते. काही वेळेस असे टेंगूळ, शरीराच्या इतर भागांहून, ऊबदार लागते आणि काही प्रकरणांत मुलास ताप येणे अथवा बरे न वाटणे यांसारखी सर्वसामान्य लक्षणे दिसून येतात.

अर्थातच, बालके आणि कुमार ह्यांना सामान्य क्रियाकर्मांतूनही गाठी वा टेंगळे येऊ शकतातच. मात्र दुःख असेल आणि गाठी बसल्या नाहीत तर मात्र डॉक्टरने तपासले पाहिजे. जर गाठ ऊबदार लागत असेल आणि मुलास ताप येत असेल तरीही डॉक्टरने तपासलेच पाहिजे. ही लक्षणे इतरही कारणांनी उद्‌भवू शकतात, जसे की संसर्ग, पण अशी लक्षणे डॉक्टरने तपासलीच पाहिजेत, ज्यामुळे कारणे शोधून काढून आवश्यकता भासल्यास त्यांचा इलाज केला जाऊ शकेल.

युईंग्ज अर्बुदांचे निदान कसे केले जाते?

बालक वा कुमारात आढळून येणार्‍या चिन्हा वा लक्षणांमुळेच बहुधा युईंग्ज अर्बुदे लक्षात येत असतात. जर अर्बुदाची शंका असेल तर, निदानाची पुष्टी करण्यासाठी चाचण्या आवश्यक ठरतील.

युईंग्ज अर्बुदांची चिन्हे वा लक्षणे

युईंग्ज अर्बुदाचे सर्वात सामान्य लक्षण म्हणजे अर्बुदाच्या जागेवर उद्‍भवणारे दुःख होय. अस्थीअर्बुदे असलेल्या बहुतेक रुग्णांत अस्थीवेदनाही जाणवत असतात. अस्थींच्या बाह्य अस्तरांत पसरत जाणार्‍या अर्बुदामुळे किंवा अर्बुदामुळे अशक्त झालेल्या अस्थीच्या भंगण्यामुळे हे दुःख उद्‌भवत असते.

यथावकाश, बव्हंशी युईंग्ज-अस्थी-अर्बुदे आणि बहुतेक सर्व अस्थी-बाह्य (मऊ ऊतींमधल्या) युईंग्ज अर्बुदांमुळे सूज किंवा गाठ येत असते, जी अर्बुदे हाता-पायांतील असल्यास लवकर लक्षात येऊ शकते. अर्बुद मऊ आणि ऊबदार जाणवू शकते. छातीच्या पिंजर्‍यातील आणि पुठ्ठ्यातील अर्बुदे बरीच मोठी झाल्याखेरीज लक्षात येऊ शकत नाहीत.

जर अर्बुद पसरले तर मुलास ताप येऊ शकतो, थकवा जाणवू शकतो आणि वजनघटही अनुभवास येऊ शकते. क्वचित, मज्जारज्जूनजीकच्या अर्बुदामुळे, अशक्तपणा, बधीरता किंवा हाता-पायांत पक्षाघात अनुभवास येऊ शकतो. तर फुफ्फुसांत पसरलेल्या अर्बुदांमुळे श्वास घेण्यास त्रास जाणवू शकतो.

युईंग्ज अर्बुदांची बव्हंशी चिन्हे वा लक्षणे, इतर कशामुळे तरी दिसून येणे शक्य असते. तरीही तुमच्या मुलास ह्यापैकी काही लक्षणे आढळून आली तर, डॉक्टरला दाखवा, ज्यामुळे कारण शोधून काढून, आवश्यकता पडल्यास त्यावर उपचार करणेही शक्य होईल.

ह्यांपैकी बव्हंशी चिन्हे वा लक्षणे सामान्य टेंगळांमुळे आणि खरचटण्यांमुळे किंवा अस्थी-संसर्गांमुळेही दिसून येणे शक्य असते, म्हणून युईंग्ज अर्बुदांचे निदान लगेचच होत नाही. मुलाची अवस्था प्रतिजैवी औषधांनी सुधारली नाही तर, त्यावेळी योग्य निदान करण्याकरता अस्थींचे क्ष-किरण-चित्र काढले जाते.


वैद्यकीय इतिहास आणि शारीरिक तपासणी

जर तुमच्या मुलात अर्बुद-दर्शक चिन्हे वा लक्षणे आढळली असतील तर, डॉक्टरांना संपूर्ण वैद्यकीय इतिहास प्राप्त करण्याचीही आवश्यकता जाणवू शकेल, ज्यामुळे त्या लक्षणांबाबत अधिक जाणून घेता येईल आणि ती किती काळापासून अस्तित्वात आहेत ह्याबाबतही समजून घेता येईल. डॉक्टर, दुःख वा सूज प्रकट करणार्‍या भागांवर विशेष लक्ष ठेवून, संपूर्ण शारीरिक तपासणी करवून घेतील.
जर लक्षणे आणि / किंवा शारीरिक तपासणीचे परिणाम मुलास युईंग्ज (किंवा इतर) अर्बुद असल्याचे सुचवत असतील तर, बहुधा अधिक सखोल चाचण्या केल्या जातील. ह्यांत चित्रांकन चाचण्या, अर्बुद-नमुना काढण्याकरताच्या शल्यक्रिया आणि/ किंवा प्रयोगशालेय चाचण्यांचा समावेश असतो.
चित्रांकन चाचण्या
चित्रांकन चाचण्या, शरीरांतर्गत चित्रे प्राप्त करण्यासाठी, क्ष-किरणे, चुंबकीय क्षेत्रे किंवा प्रारक पदार्थांचा उपयोग करत असतात. चित्रांकन चाचण्या अनेक कारणांसाठी केल्या जातात. ज्यांत खालील कारणांचाही समावेश होत असतो.
१.      संशयास्पद भाग कर्कजन आहे काय हे शोधून काढण्याकरता
२.      अर्बुदाचा प्रसार निर्धारित करण्याकरता किंवा कर्क किती दूरपर्यंत प्रसारित झाला असू शकेल हे जाणून घेण्याकरता
३.      उपचार प्रभावी झालेले आहेत की नाही ते निर्धारित करण्यासाठी

ज्या रुग्णांना युईंग्ज अर्बुद झालेले असेल वा झालेले असू शकेल त्यांना एक वा अधिक चाचण्या करून घ्याव्या लागतील.
क्ष-किरणे
जर एखादी अस्थी-गाठ जात नसेल किंवा डॉक्टरांना ती कुठल्याशा कारणाने अस्थी-अर्बुदाची असल्याचा संशय असेल तर पहिली चाचणी म्हणून ते त्या भागाचे क्ष-किरण चित्रांकन काढावयास सांगतील. प्रारणतज्ञ (रेडिओलॉजिस्ट, चित्रांकन चाचण्या समजून घेण्यात तज्ञ असलेलेल डॉक्टर) बहुधा क्ष-किरण चित्रांकनात, अस्थी अर्बुदे आणि अस्थींचा समावेश असलेले युईंग्ज अर्बुद ओळखू शकतात. पण इतर चित्रांकन चाचण्याही आवश्यक ठरू शकतात.
जरी एखादे क्ष-किरण चित्रांकन सशक्तपणे युईंग्ज अस्थी अर्बुद सूचित करत असेल, तरी संसर्गासारखी इतर कुठलीही समस्या नसून कर्क आहे, ह्याच्या पुष्टीकरता नेहमीच एक नमुना काढण्याची शल्यक्रिया (बायोप्सी) आवश्यक असते.
चुंबकीय-अनुनाद-चित्रक (एम.आर.आय.) चित्रांकन
क्ष-किरण-चित्रांकनांत आढळून आलेल्या, अपसामान्य भागाच्या चांगल्या वर्णनाकरता अनेकदा चुंबकीय-अनुनाद-चित्रक-चित्रांकनेही काढली जात असतात. चुंबकीय-अनुनाद-चित्रक-चित्रांकने सामान्यपणे आपल्याला हे सांगतात की, ते अर्बुद असू शकेल की संसर्ग की इतर कारणांमुळे घडून आलेला अस्थीहानीचा एखादा प्रकार. ही चित्रांकने अर्बुदाचा नेमका विस्तार निर्धारित करण्यास मदत करू शकतात कारण ती, अस्थींच्या आतील मज्जेची, स्नायूंची, मेदाची आणि अर्बुदाभोवतीच्या जोड-ऊतींची तपशीलवार चित्रे देऊ शकत असतात. शल्यक्रिया किंवा प्रारणोपचारांची योजना करत असता, अर्बुदाच्या विस्ताराची व्याख्या करणे महत्त्वाचे ठरते.
ह्याशिवाय चुंबकीय-अनुनाद-चित्रक चित्रांकनेमेंदू व मज्जारज्जू ह्यांचे चांगले चित्र पुरवतात, म्हणून पाठीच्या कण्यानजीकच्या भागात झालेल्या कर्काच्या संभाव्य प्रसाराच्या निदानार्थ ती वापरली जातात. अर्बुद कशा प्रकारे प्रतिसाद देत आहे हे पाहण्याकरता, ह्या चाचण्या उपचारांदरम्यान आणि उपचारांपश्चातही उपयोगात आणल्या जाऊ शकतात.
चुंबकीय-अनुनाद-चित्रक चित्रांकने शरीरातील मऊ ऊतींची तपशीलवार चित्रे पुरवतात. ही चित्रांकने, क्ष-किरणांऐवजी, प्रारण-लहरी आणि सशक्त चुंबक वापरतात, म्हणून ह्यात प्रारण समाविष्ट नसते. प्रारण-लहरींमधील ऊर्जा अवशोषिली जाते आणि मग शरीरातील ऊतींचा प्रकार व काही रोग यांवर अवलंबून असलेल्या संरचनेने विमोचित केली जाते. एक संगणक त्या संरचनेचे, शरीरातील भागांच्या खूप तपशीलवार चित्रांत रूपांतरण करतो. तपशील नीट दिसण्याकरता चित्रांकनापूर्वी, गॅडोलिनियम नावाचा एक गुणविधर्मी पदार्थ शिरेत अंतर्क्षेपित केला जातो.
चुंबकीय-अनुनाद-चित्रक चित्रांकनांकरता एखादा तास लागू शकतो. मुलाला, बंदिस्त, अरुंद नलिकेत पडून राहावे लागते, ज्यामुळे अवघडल्यासारखे वाटू शकते. नवीन अधिक खुली चुंबकीय-अनुनाद-चित्रण यंत्रे ह्याकरता सोयीची ठरतात, पण तरीही चाचणीकरता दीर्घकाळ शांत पडून राहावेच लागत असते. ह्याव्यतिरिक्त, चुंबकीय-अनुनाद-चित्रण यंत्रे गुणगुण आणि टिकटिक अशाप्रकारचे मोठे आवाजही करतात, ज्यामुळे तुमचे मूल विचलित होऊ शकते. म्हणून काही वेळेस लहान मुलांना ह्या चाचणीदरम्यान शांत ठेवण्यासाठी अथवा झोपवण्यासाठी औषधे दिली जातात.
संगणित-त्रिमितीचित्रक-चित्रांकने
(संगणित-त्रिमितीचित्रक चित्रांकने [सी.टी.] किंवा संगणित-अक्षीय-त्रिमितीचित्रक चित्रांकने [सी.ए.टी.])
युईंग्ज अर्बुद फुफ्फुसांपर्यंत पसरले आहे काय हे पाहण्याकरता छातीचे संगणित-त्रिमितीचित्रण केले जाते. प्रत्यक्ष अर्बुदाचा विस्तार जाणून घेण्यासाठी चुंबकीय-अनुनाद-चित्रक चित्रांकने किंचित अधिक चांगली असतात, पण तरीही संगणित-त्रिमितीचित्रक चित्रांकनेही काढली जाऊ शकतात.
संगणित-त्रिमितीचित्रक चित्रांकन ही एक क्ष-किरण चाचणी असते जी, शरीराच्या भागांची स्नायूंसारख्या मऊ ऊतींसहितची तपशीलवार कापात्मक चित्रे निर्माण करते. नियमित क्ष-किरण चाचणीप्रमाणे, एक चित्र घेण्याऐवजी, संगणित-त्रिमितीचित्रण-चित्रांकक, मूल टेबलावर उताणे पडलेल्या स्थितीत असतांना, तुमच्या मुलाच्या शरीराभोवती गोल फिरत असता, अनेक चित्रे घेतो. त्यानंतर संगणक ह्या चित्रांना, अभ्यासल्या जात असलेल्या शरीराचे काप ह्या स्वरूपात, जुळवून एकत्र करतो.
चित्रांकनापूर्वी मुलास गुणविधर्मी (काँट्रास्ट) द्रावण पिण्यास सांगितले जाते किंवा शिरेतील अंतर्क्षेपणाद्वारे (इंट्रा-व्हिनस इंजेक्शनने) असा गुणविधर्मी रंग शरीरात शिरवला जातो, जो शरीरातील अपसामान्य भागांच्या रूपरेषा ठळक करेल. मुलास त्या रंगाकरता शिरेतील जोडणी असावी लागेल. गुणविधर्मी पदार्थामुळे काहीशी लाली येऊ शकते (विशेषतः चेहर्‍यावर एकप्रकारचा ऊबदारपणा). काही लोकांना ह्याचे वावडे असते आणि त्यांना पुरळ येऊ शकते. क्वचित प्रसंगी श्वसनास त्रास होणे किंवा रक्तदाब घटणे ह्यासारख्या अधिक गंभीर स्वरूपाच्या प्रतिक्रिया उमटतात. तुमच्या मुलास कशाचेही वावडे असल्यास किंवा ह्यापूर्वी कधीही क्ष-किरणांसोबत वापरल्या जाणार्‍या गुणविधर्मी पदार्थांसोबत प्रतिक्रिया आढळून आलेली असल्यास, डॉक्टरला अवश्य सांगा.
संगणित-त्रिमितीचित्रक-चित्रांकनास नियमित क्ष-किरण चाचणीपेक्षा अधिक वेळ लागतो. त्याकरता चित्रांकन होईस्तोवर मुलास टेबलावर स्तब्ध पडून राहावे लागते. चाचणीदरम्यान टेबलच चित्रांककाच्या आत-बाहेर सरकत असते. चित्रांकक एक कंकणाकृती यंत्र असते जे टेबलास संपूर्णपणे वेढून घेत असते. काही लोकांना ह्यामुळे चित्रांकन होत असता काहीसे बंदिस्त झाल्यासारखे वाटते. लहान मुलांना चाचणीदरम्यान शांत ठेवण्याकरता किंवा निजवण्याकरता औषध दिले जाते, ज्यामुळे चित्रे चांगली येऊ शकतात. अनेक वैद्यकीय केंद्रे हल्ली मळसूत्री संगणित-त्रिमितीचित्रण वापरतात, जे जलद चित्रांकन पूर्ण करतात. ते अधिक तपशीलवार चित्रे देते आणि चाचणीदरम्यान होणारा प्रारणसंसर्ग घटवते.
अस्थी-चित्रांकन
अस्थी-चित्रांकने, अस्थींत आणि शरीराच्या इतर भागांत होणार्‍या कर्काच्या प्रसाराचा शोध घेण्यास मदत करू शकतात आणि युईंग्ज अर्बुद असलेल्या तुमच्या मुलाकरता तो एक तपासणीचा भाग असू शकतो संपूर्ण अस्थीपंजराचे चित्र एकाच वेळी पुरवत असल्याने ही चाचणी उपयुक्त ठरते. (एक धन-विजक-उत्सर्जक-त्रिमितीचित्रक चित्रांकनही (Positron Emission Tomography -PET- Scan) अनेकदा अशाप्रकारची माहिती पुरवू शकते, म्हणून काही प्रकरणांत अशी चाचणी करवून घेतलेली असल्यास, अस्थी-चित्रांकन आवश्यक राहतही नाही).
ह्या चाचणीकरता, निम्नस्तरीय किरणोत्सारी पदार्थाची एक लहान मात्रा शिरेत अंतर्क्षेपित केली जाते. दोन तासांच्या अवधीत, तो पदार्थ संपूर्ण अस्थी-पिंजर्‍यातील, हानिग्रस्त अस्थींच्या भागांत, साखळतो. तुमचे मूल मग टेबलावर सुमारे ३० मिनिटे पडून राहते, ज्यावेळी एक विशेष चित्रांकक किरणोत्सार संवेदतो आणि अस्थी-पिंजर्‍याचे चित्र तयार करतो.
सक्रिय अस्थी-बदलांचे भाग अस्थी-पिंजर्‍यावर ’ठळक उठून (हॉट स्पॉट)’ दिसतात, कारण ते किरणोत्सार आकर्षून घेत असतात. असे भाग कर्काची उपस्थिती दर्शवतात, पण इतर अस्थी विकारही तसेच ठसे दर्शवू शकतात. अचूक निदान करण्यासाठी, इतर चित्रण चाचण्या जशा की साधी क्ष-किरण चाचणी आणि चुंबकीय-अनुनाद-चित्रक चित्रांकने किंवा अगदी अस्थींचे नमुने घेणेही आवश्यक ठरू शकते.
धन-विजक-उत्सर्जक-त्रिमितीचित्रक चित्रांकन
धन-विजक-उत्सर्जक-त्रिमितीचित्रक चित्रांकनाकरता, एका प्रकारची किरणोत्सारी साखर (जिला फ्लुओरो-डेक्सो-ग्लुकोज किंवा एफ.डी.जी. असेही म्हटले जाते), रक्तात अंतर्क्षेपित केली जात असते. किरणोत्साराचे वापरलेले परिमाण खूपच निम्न असते. शरीरातील कर्कपेशी झपाट्याने वाढत असल्याने त्या, ही साखर मोठ्या प्रमाणात शोषून घेतात. सुमारे अर्ध्या तासानंतर, धन-विजक-उत्सर्जक-त्रिमितीचित्रक चित्रांकनाकरता तुमचे मूल टेबलावर सुमारे ३० मिनिटे पडून राहते, जेव्हा एक विशेष चित्रांकक, शरीरातील किरणोत्सारी भागांचे चित्र निर्माण करतो. संगणित-त्रिमितीचित्रक चित्रांकने किंवा चुंबकीय-अनुनाद-चित्रांकनांप्रमाणे ही चित्रांकने बारीक तपशील पुरवत नाहीत, मात्र ती, संपूर्ण शरीराबाबतची उपयुक्त माहिती पुरवितात.
युईंग्ज अर्बुदांचा प्रसार दर्शवण्याकरता आणि (अस्थी चित्रांकने किंवा संगणित-त्रिमितीचित्रक चित्रांकने यांसारख्या) इतर चाचण्यांत आढळून आलेले अपसामान्य भाग अर्बुद आहेत काय हे शोधून काढण्याकरता, धन-विजक-उत्सर्जक-त्रिमितीचित्रक-चित्रांकने खूपच उपयुक्त ठरतात. उपचारांदरम्यान काळासोबत होणार्‍या कर्क-प्रसाराचे निदान करण्यासाठी, धन-विजक-उत्सर्जक-त्रिमितीचित्रक-चित्रांकने पुन्हा पुन्हा काढली जाऊ शकतात.
काही नवीन यंत्रे एकाच वेळी, धन-विजक-उत्सर्जक-त्रिमितीचित्रक-चित्रांकने आणि संगणित-त्रिमितीचित्रक-चित्रांकने काढू शकतात. ह्यामुळे डॉक्टरांना धन-विजक-उत्सर्जक-त्रिमितीचित्रक-चित्रांकनांतील उच्चतर किरणोत्सारी क्षेत्रांची, संगणित-त्रिमितीचित्रक-चित्रांकनांतील अधिक तपशीलवार  प्रकटनांसोबत तुलना करता येते.
अर्बुद-नमुना-निष्कर्षण-शल्यक्रिया
चित्रांकन चाचण्यांचे फलित प्राकर्षाने युईंग्ज अर्बुद सुचवत असू शकेल, पण केवळ शल्यक्रिया (म्हणजे अर्बुदाचा काही भाग, सूक्ष्मदर्शकाखाली तपासण्याकरता आणि इतर प्रयोगशालेय चाचण्यांकरता, काढून घेणे) हाच, ह्याची खात्री करवून घेण्याचा उपाय आहे. अर्बुदाचीनमुना निष्कर्षणार्थची शल्यक्रिया हाच, इतर कर्कांपासून युईंग्ज अर्बुद वेगळे सांगता येण्याचा, सर्वोत्तम उपाय आहे.
जर अर्बुदात अस्थीचा समावेश असेल तर, तर युईंग्ज अर्बुदांच्या उपचारांत तज्ञ असलेल्या डॉक्टरांकरवी ही शल्यक्रिया केली जाणे खूपच महत्त्वाचे ठरते. जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा, अर्बुद-नमुना-निष्कर्षण-शल्यक्रिया आणि शल्यक्रियात्मक उपचार हे सोबतच योजिले जायला हवेत आणि त्याच अस्थी-शल्य-विशारदाने दोन्हीही शल्यक्रिया कराव्यात. अर्बुद-नमुना-निष्कर्षण-शल्यक्रियेकरताच्या जागेच्या निवडीचे योग्य नियोजन आणि शल्यक्रियेचे तंत्र, नंतर संभवणार्‍या गुंतागुंतींपासून वाचवू शकतात आणि पुढे उपचारांदरम्यान आवश्यक ठरू शकणार्‍या शल्यक्रियेची व्याप्ती घटवू शकतात. युईंग्ज अर्बुदाच्या निदानाकरता नमुना-निष्कर्षण-शल्यक्रिया करण्याच्या दोन पद्धती आहेत.
पूर्णछेदक (excisional)-नमुना-निष्कर्षण-शल्यक्रियाअगदी क्वचित प्रकरणांत अर्बुद हे पुरेसे लहान असते आणि चांगल्या जागी असते, अशावेळी मुलास संपूर्ण भूल देऊन शल्यविशारद ते पूर्णतः काढून टाकू शकतो. ह्या शल्यक्रियेस पूर्णछेदक-नमुना-निष्कर्षण-शल्यक्रिया म्हटले जाते.
अंशछेदक (incisional)-नमुना-निष्कर्षण-शल्यक्रिया: संशयित युईंग्ज अर्बुदांच्या बव्हंशी प्रकरणांतअंशछेदक-नमुना-निष्कर्षण-शल्यक्रिया (अर्बुदाचा केवळ एक तुकडा काढून) केली जाणे अधिक संभवनीय असते. नमुना-निष्कर्षण-शल्यक्रिये दरम्यान शल्यविशारद त्वचेच्या खुल्या भागातून अर्बुदाचा एक तुकडा काढून घेऊन हे साध्य करू शकतो (जिला खुली-नमुना-निष्कर्षण-शल्यक्रिया असे म्हटले जाते), किंवा एक मोठी पोकळ सुई त्वचेवाटे अर्बुदात शिरवून त्यातून नमुना काढून घेऊ शकतो (जिला सुईची-नमुना-निष्कर्षण-शल्यक्रिया असे म्हटले जाते).
वयस्क तरूणांत आणि प्रौढांत काही वेळेस अंशछेदक-नमुना-निष्कर्षण-शल्यक्रिया स्थानिक भूल देऊन (बधीरक औषधाने) केली जाते, मात्र मुलांच्या बाबतीत ती बहुधा संपूर्ण भूल देऊनच केली जाते.
नमुना-निष्कर्षण-शल्यक्रियेकरता जर एखाद्या मुलास संपूर्ण भूल दिली जाणार असेल तर, नंतर स्वतंत्ररीत्या कराव्या लागणार असलेल्या इतर प्रक्रियाही पुन्हा भूल देणे टाळण्याकरता, मूल बेहोश असतांनाच करून घेण्याचे नियोजन शल्यविशारद करू शकतात. उदाहरणार्थ, जर ते अर्बुद छाती वा इतरत्र पसरलेले असेल तर, अशा संशयित अर्बुदांचे नमुना-निष्कर्षणही शल्यविशारद मूल बेहोश असतांनाच करून घेऊ शकतात. डॉक्टर अशा वेळी, अस्थी-मज्जा-पोकळ्यांत कर्क प्रसृत झालेला आहे काय हे पाहण्याकरता, अस्थीमज्जा-नमुना-निष्कर्षणही (खाली पाहा) करून घेऊ शकतात.
नमुना-निष्कर्षण-शल्यक्रियेदरम्यान (मूल अजूनही बेहोशीत असतांना) रोगनिदानतज्ञ (प्रयोगशालेय चाचण्यांचा उपयोग करून रोगनिदान करणारा विशेषज्ञ डॉक्टर-पॅथॉलॉजिस्ट), निष्कर्षित नमुना सूक्ष्मदर्शकाखाली त्वरित निरीक्षण (क्विक लुक) करू शकतो. जर तो युईंग्ज अर्बुदाप्रमाणे दिसत असेल तर, शल्यविशारद एक लहान लवचीक नळी, जिला मध्य-शिरा-प्रवेशक म्हणतात, ती त्याच शल्यक्रियेदरम्यान छातीतील मुख्य रक्त-वाहिनीत बसवतात. नळीचे टोक जेमतेम (जस्ट) त्वचेखाली किंवा बाहेर राहते, ज्यामुळे डॉक्टर वा परिचारकांना शिरेत पोहोच प्राप्त होते. मध्य-शिरा-प्रवेशक उपचारांदरम्यान अनेक महिनेपर्यंत त्याच जागी राहू शकतो. नंतर रसायनोपचार दिले जावयाचे असल्यास, मुलास ते सोयीचे ठरते, कारण ह्यामुळे कमी वेळेस सुई टोचण्याची आवश्यकता पडते.
अस्थीमज्जा चूषण आणि नमुना-निष्कर्षण
ह्या चाचण्यांचा उपयोग, अस्थीमज्जेत म्हणजेच अस्थींतील मऊ अंतर्भागांत कर्क प्रसृत झालेला आहे किंवा नाही ते तपासण्याकरता होतो. युईंग्ज अर्बुदाचे निदान करण्यासाठी ह्या चाचण्या केल्या जात नाहीत, तर एकदा निदान झाल्यानंतर अस्थीमज्जेत कर्क प्रसृत झालेला आहे किंवा नाही ते तपासणे महत्त्वाचे असल्याने त्याकरता त्या केल्या जाऊ शकतात.
अस्थीमज्जा चूषण आणि नमुना-निष्कर्षण बहुधा एकाच वेळी केले जाते. बव्हंशी प्रकरणांत, मज्जा-नमुने पुठ्ठ्याच्या दोन्हीही हाडांतून घेतले जातात.
ह्या चाचण्या स्वतंत्र पद्धती म्हणून केल्या जाऊ शकतात, किंवा त्या नमुना-निष्कर्षण- शल्यक्रियेदरम्यान किंवा मुख्य अर्बुदावरील उपचारात्मक शल्यक्रियेदरम्यान (मूल अजूनही बेहोश असतांना) केल्या जाऊ शकतात.
जर अस्थीमज्जा चूषण स्वतंत्र पद्धती म्हणून केले जात असेल तर, मूल एका टेबलावर (कुशीवर किंवा पालथे) पडून राहते. पुठ्ठ्यावरचा भाग स्वच्छ केल्यावर, त्वचा आणि अस्थीचा पृष्ठभाग स्थानिक भूल देऊन बधीर केला जातो, ज्यामुळे किंचित दुःख किंवा जळजळ उत्पन्न होऊ शकते. बव्हंशी प्रकरणांत, मुलास पद्धतीचा अवलंब करत असता झोप येण्याकरता इतर औषधेही दिली जातात. एक पातळ, पोकळ सुई मग हाडात खुपसली जाते, आणि पिचकारीद्वारे अस्थीमज्जेतील थोडा द्रव शोषून बाहेर काढून घेतला जातो.
अस्थीमज्जा-नमुना-निष्कर्षण-शल्यक्रिया बहुधा अस्थीमज्जा-चूषणानंतर लगेचच केली जाते. अस्थीचा एक लहानसा तुकडा आणि अस्थीमज्जा एका किंचित मोठ्याशा सुईद्वारे काढून घेतली जाते. सुई हाडात टोचत असता तीस पीळ भरून हे साधले जाते. नमुना-निष्कर्षण-शल्यक्रिया संपताच, रक्तस्त्राव होत असल्यास तो थांबवण्याकरता, त्या जागेवर दाब दिला जातो.
अस्थीमज्जेचे नमुने रोगनिदान प्रयोगशाळेकडे पाठविले जातात, जिथे त्यांची पाहणी करून ते कर्कपेशींकरता तपासले जातात.
शल्यक्रियेने निष्कर्षित नमुन्यांचा तपास
कर्क आहे का हे तपासण्याकरता, रोगनिदानतज्ञ म्हणवला जाणारा डॉक्टर, शल्यक्रियेद्वारे निष्कर्षित नमुन्यांवर सूक्ष्मदर्शकाखाली नजर टाकतो. बव्हंशी प्रकरणांत, कर्काचा विशिष्ट प्रकारही ओळखला जातो. मात्र युईंग्ज अर्बुदाच्या पेशी, इतर प्रकारच्या बाल्य कर्कांचीच वैशिष्ट्ये बाळगत असल्याने, अनेकदा आणखी प्रयोगशालेय चाचण्या आवश्यक ठरतात.
अबाधित-इतिहासातील-रसायनस्थितीः ह्या चाचणीकरता, शल्यक्रियेद्वारे निष्कर्षित नमुन्याचा एक भाग अशा प्रतिपिंडांद्वारे (विशेष प्रथिनांद्वारे – विथ अँटिबॉडीज) उपचारित केला जातो, जी केवळ युईंग्ज-अर्बुद-पेशींत आढळून येणार्‍या पदार्थांना चिकटतात आणि सूक्ष्मदर्शकाखाली पाहता येऊ शकतात. इतर कर्कपेशींतील पदार्थांना ती चिकटत नाहीत. ह्यावरून रोगनिदानतज्ञास, अर्बुद युईंग्ज कुटुंबातील असल्याचे निदान करता येऊ शकते.

रंगसूत्रातील वैगुण्ये आणि आजार यांतील संबंधाच्या शोधार्थ केलेला पेशीविभाजनाचा अभ्यास (सायटोजेनेटिक्स): ह्या चाचणीकरता अर्बुद-पेशींतील रंगसूत्रे (अ-पान-शर्करा-गर्भकाम्लाचे तुकडे), बदलांचा माग काढण्याकरता, सूक्ष्मदर्शकाखाली पाहिली जातात. “युईंग्ज अर्बुदांची कारणे आपल्याला माहीत आहेत काय? ह्या अनुभागात नोंद केल्यानुसार, युईंग्ज अर्बुदांच्या पेशींत बहुधा रंगसूत्रांची अदलाबदल (ट्रान्सलोकेशन) झालेली असते, जेव्हा दोन रंगसूत्रांदरम्यान त्यांच्या अ-पान-शर्करा-गर्भकाम्लांच्या तुकडयांची अदलाबदल केली जाते. बव्हंशी प्रकरणांत, युईंग्ज अर्बुदांच्या पेशींत रंगसूत्रे २२ आणि ११ ह्यांदरम्यान अदलाबदल झालेली असते. क्वचितच इतर रंगसूत्रांचा ह्या अदलाबदलीत समावेश होत असतो. हे बदल शोधून काढल्यास इतर कर्कांपासून युईंग्ज अर्बुदे निराळी काढण्यास मदत होऊ शकते. काही युईंग्ज अर्बुदांच्या पेशींत इतर प्रकारचे रंगसूत्र-बदलही आढळून येऊ शकतात.

प्रमाणित रंगसूत्रातील वैगुण्ये आणि आजार यांतील संबंधाच्या शोधार्थ केलेल्या पेशीविभाजन चाचणीस २ ते ३ सप्ताह लागू शकतात, कारण त्यांतील रंगसूत्रे सूक्ष्मदर्शकाखाली तपासता येण्यापूर्वी, त्या कर्क पेशी प्रयोगशालेय बशांमध्ये सुमारे दोन सप्ताह वाढाव्या लागतात.

प्रस्फुरक-अवस्थेतील-संकर (फ्ल्युओरेसेन्स इन सिच्यू हायब्रिडायझेशन-एफ.आय.एस.एच.) ह्या एका विशेष प्रकारच्या रंगसूत्रातील वैगुण्ये आणि आजार यांतील संबंधाच्या शोधार्थ केलेल्या पेशीविभाजनचाचणीत, युईंग्ज अर्बुदांतील विशिष्ट रंगसूत्र-बदलांना ओळखता यावे म्हणून, विशेष-प्रस्फुरक-रंगांचा उपयोग केला जात असतो. ही चाचणी (अदला-बदलींसारखे) बव्हंशी रंगसूत्र-बदल शोधून काढू शकते, जे प्रमाणित रंगसूत्रातील वैगुण्ये आणि आजार यांतील संबंधाच्या शोधार्थ केलेल्या पेशीविभाजन चाचणीत सूक्ष्मदर्शकाखाली दृश्यमान असतात. त्याशिवाय नेहमीच्या रंगसूत्रातील वैगुण्ये आणि आजार यांतील संबंधाच्या शोधार्थ केलेल्या पेशीविभाजन चाचणीत दिसून येण्याच्या दृष्टीने लहान असलेले काही बदलही, ह्या चाचणीत आढळून येत असतात.

’फिश’ ही चाचणी, विशिष्ट रंगसूत्र-बदल शोधण्याकरता उपयोगात आणली जाऊ शकते. तिचा वापर, रक्त अथवा अस्थीमज्जा नमुन्यांकरताही केला जाऊ शकतो. ही चाचणी खूपच अचूक असते आणि बहुधादोन दिवसांत निष्कर्ष पुरवत असते.

उलट-परस्परांकन बहुरेण्वीय-निर्माण-विकर साखळी-प्रतिक्रिया
(रिव्हर्स-ट्रान्सक्रिप्शन-पॉलिमरेस-चेन-रिऍक्शन: आर.टी. - पी.सी.आर.)

अर्बुदाचा प्रकार निश्चित करण्यासाठी, अर्बुदपेशींमधील अदला-बदल शोधून काढण्याचा, ही चाचणी म्हणजे आणखी एक मार्ग आहे. ही खूप संवेदनाक्षम चाचणी आहे, जी अनेकदा, रंगसूत्रातील वैगुण्ये आणि आजार यांतील संबंधाच्या शोधार्थ केलेल्या पेशीविभाजन-अभ्यासानेही संवेदल्या जाऊ शकणार नाहीत इतक्या, खूप लहान संख्येतील अदला-बदली शोधून काढण्यात यशस्वी ठरत असते.

उपचारांनंतर उरलेला कर्क किंवा पुनरावर्ती कर्क शोधून काढण्यासही ही चाचणी उपयुक्त ठरत असते. उदाहरणार्थ जर, उपचारांनंतर घेतलेल्या एखाद्या अस्थी-मज्जा-नमुन्याकरता ही चाचणी केल्यावर प्रातिनिधिक अदला-बदल झालेली आढळून आली तर, कर्क बरा झालेला नसू शकतो आणि आणखी उपचार आवश्यक ठरू शकतात.

रक्त-तपासण्या

युईंग्ज कुटुंबातील अर्बुदांच्या निदानास उपयुक्त ठरू शकतील अशा रक्त-तपासण्या अस्तित्वात नाहीत. पण एकदा निदान झाल्यावर मग उपयोगी ठरू शकतील अशा काही रक्त-तपासण्या असतात.

संपूर्ण-रक्त-गणना (कंप्लिट-ब्लड-काऊंट) रक्तातील पांढर्‍या व लाल रक्तपेशींच्या आणि बिंबाणूंच्या संख्यांच्या पातळ्या मोजत असते. निदानाच्या वेळी अपसामान्य गणना-निष्कर्ष प्राप्त झाल्यास, जिथे रक्तपेशींची निर्मिती होत असते त्या अस्थी-मज्जेपर्यंत, कर्काचा प्रसार झाला असल्याचे समजून येते.

प्रातिनिधिकरीत्या, दुग्धज-प्राणिलीकरण-उत्प्रेरक-विकर (लॅक्टेट-डि-हायड्रोजनेस, एल.डी.एच.) पातळ्यां-करताची रक्त-तपासणी निदानाकरता केली जाते. विकराच्या उच्च पातळीचा संबंध शरीरातील मोठ्या अर्बुदाशी जोडण्यात आलेला आहे, ज्यामुळे उपचारास कठीण असलेला कर्क सूचित होतो.

संभाव्य समस्या किंवा उपप्रभावांचा शोध घेण्यासाठी, उपचारांपूर्वी (विशेषतः शल्यक्रियेपूर्वी) आणि (रसायनोपचारांसारख्या) उपचारांदरम्यान अनेकदा मुलाचे सामान्य आरोग्य तपासण्याच्या उद्देशाने, प्रमाणितरक्त-तपासण्या केल्या जातात. ह्या चाचण्यांत अस्थी-मज्जा-कार्य तपासण्यासाठी संपूर्ण-रक्त-गणनेचा आणि यकृत व मूत्रपिंड कसे काम करत आहे हे तपासण्यासाठी रक्त-रसायन-चाचण्यांचा समावेश असू शकतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.