२०१३-०५-०५

गीतानुवाद-०१४: संसारसे भागे फिरते हो


मूळ हिंदी गीतः साहीर लुधियानवी, संगीतः रोशन, गायीकाः लता
चित्रपटः चित्रलेखा, भूमिकाः मीनाकुमारी, प्रदीपकुमार, अशोककुमार

२००६०८१५


अक्र


संसारसे भागे फिरते हो

संसार सोडुनी पळशी तू

धृ
संसार से भागे फिरते हो
भगवान को तुम क्या पाओगे
इस लोग को भी, अपना ना सके
उस लोग में भी, पछताओगे
संसार सोडुनी पळशी तू
मिळणार तो ईश्वर तुज कैसा?
ह्या लोका न तू आपले म्हणसी
त्या लोकीही तू खंतची करशील

ये पाप हैं क्या, ये पुण्य हैं क्या
रीतों पर धर्म की मोहोरे हैं
हर युग में बदलते धर्मों को
कैसे आदर्श बनाओगे
हे काय असे पाप आणि पुण्य
रीतींवर धर्माची मोहोर जणू
प्रत्येक युगाच्या धर्माला
आदर्श कसा घडविशील तू

ये भोग भी एक तपस्या है
तुम त्याग के मारें क्या जानो
अपमान रचेता का होगा 
रचना को अगर ठुकराओगे
हे भोगही एक तपस्या असे
समजे का तुला त्यागापायी
होतो अपमान रचयित्याचा
केला रचनेचा अव्हेर जरी

हम कहते है, ये जग अपना है
तुम कहते हो झूठा सपना है
हम जनम बिताकर जाएंगे
तुम जनम गवाँकर जाओगे
मी म्हणते हे जग आपले आहे
तू म्हणसी ते खोटं स्वप्न आहे
मी जन्म व्यतीत करून जाईन
तू जन्म गमावून की जाशील



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.