२०२३-०७-२०

गीतानुवाद-२७८: हम आपकी आँखों में

मूळ हिंदी गीतः साहिर लुधियानवी, संगीतः सचिनदेव बर्मन, गायकः रफी, गीता दत्त
चित्रपटः प्यासा, सालः १९५७, भूमिकाः गुरूदत्त, माला सिन्हा 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२३०७२०


धृ

हम आपकी आँखों में
इस दिल को बसा दें तो
हम मूँद के पलकों को
इस दिल को सज़ा दें तो

डोळ्यांत तुझ्या जर मी
वसवले हृदय हे तर
मी पापण्या मिटून
हृदया त्या सजा दिली तर

इन ज़ुल्फ़ों में गूँधेंगे
हम फूल मुहब्बत के
ज़ुल्फ़ों को झटक कर हम
ये फूल गिरा दें तो

या कुंतली मी गुंफेन
प्रीतीची फुले जर तर
केसांना मी झटकून
फुले ती झटकली तर

हम आपको ख्वाबों में
ला ला के सतायेंगे
हम आपकी आँखों से
नींदें ही उड़ा दें तो

मी तुला स्वप्नांत आणून
आणून जर सतावले तर
मी डोळ्यांतली झोपच
उडवून टाकली तर

हम आपके कदमों पर
गिर जायेंगे ग़श खाकर
इस पर भी न हम अपने
आंचल की हवा दें तो

चरणांवर मी तुझिया
पडलो जर शुद्ध हरपून
तरीही न जर का मी
वाराही घातला तर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.