२०२३-०७-०८

गीतानुवाद-२७६: तदबीर से बिगड़ी हुई

मूळ हिंदी गीतः साहिर लुधियानवी, संगीतः सचिनदेव बर्मन, गायिकाः गीता दत्त
चित्रपटः बाजी, सालः १९५१, भूमिकाः गीता दत्त, देव आनंद 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१५०८२९

 

धृ

तदबीर से बिगड़ी हुई
तक़दीर बना ले
तक़दीर बना ले 
अपने पे भरोसा है तो
ये दांव लगा ले
लगा ले दांव लगा ले

चतुराईने, बिघडलेले
नशीब घडवून घे
नशीब घडवून घे
स्वतःवर भरोसा आहे तर
हा डाव लावून घे
लाव हा डाव लावून घे

डरता है ज़माने की
निगाहों से भला क्यूँ
निगाहों से भला क्यूँ
इन्साफ़ तेरे साथ है
इलज़ाम उठा ले
इलज़ाम उठा ले

घाबरसी लोकांच्या
नजरेला का म्हणून
नजरेला का म्हणून
न्याय तुझ्या सोबत आहे
आरोप पत्कर रे
आरोप पत्कर रे

क्या खाक वो जीना है
जो अपने ही लिये हो
अपने ही लिये हो
खुद मिटके किसी और को
मिटने से बचा ले
मिटने से बचा ले

किती व्यर्थ ते जीवन आहे
जे आहे स्वतःपुरते
ते जे स्वतःपुरते
स्वतः संपून मिटत्याला
त्यातून वाचव रे
त्यातून वाचव रे

टूटे हुए पतवार हैं
कश्ती के तो हम क्या
कश्ती के तो हम क्या
हारी हुई बाहों को ही
पतवार बना ले
पतवार बना ले

वल्ही जरी तुटलेली आहेत
नावेची आमच्या
नावेची आमच्या
हारल्या हातांचीच
तू वल्ही करून घे
तू वल्ही करून घे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.