२०२१-०३-२४

गीतानुवाद-१८५: लाखो है निगाह में

मूळ हिंदी गीतः मजरूह, संगीतः ओ. पी. नय्यर, गायकः महंमद रफी
चित्रपट: फिर वहीं दिल लाया हूँ, सालः १९६३, भूमिकाः जॉय मुखर्जी, आशा पारेख 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१७०८१४

धृ

लाखो है निगाह में
जिंदगी की राह में
सनम हसीन जवाँ
होटों में गुलाब हैं
आँखों में शराब हैं
लेकिन वो बात कहाँ

लाखो दिसतात की
जीवनात ह्या पथी
सुहृद सुरेख युवा
ओठांवर गुलाब आहे
धुंद नयनांत आहे
पण कुठे ती मोहक अदा

लट है किसी की जादू का जाल
रंग डाले दिल पे किसी का जमाल
तौबा ये निगाहें, की रोकती हैं राहे
देखो, ले ले के तीर-कमान

बट आहे कुणाच्या जादुचे जाल
रंगवे हृदय, ही कुणाची कमाल
कहर हे डोळे, कसे रोखती, न कळे
पाहा, घेऊन धनुष्य नि बाण

जानु ना दिवाना मैं दिल का
कौन है खयालों की मलिका
भिगी भिगी ऋत की छाओ तले
मान लो कहीं वो आन मिले
कैसे पहेचानू के नाम नहीं जानू
किसे ढुंढे मेरे अरमान

मनोमनी खुळा, मज माहीत ना
कोण असे, स्वप्नीची कलिका
सर्द सर्द ऋतूच्या सावलीत ह्या
समजा ती, येऊन भेटली मला
कसे मी ओळखावे, मला नाव नाही ठावे
कुणा शोधते माझी स्पृहा 

 

कभी कभी वो इक माहजबीं
डोलती हैं दिल के पास कहीं
हैं जो यही बाते
तो होंगी मुलाकाते
कभी यहाँ नहीं तो वहाँ

कधी कधी ती, एक चंद्रमुखी
विहरते माझ्या हृदयाशी
असतील हितगुजे
तर घडतील भेटीही की
कधी इथे किंवा जमेल तिथे


https://www.youtube.com/watch?v=eoiOG0a1jNw

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.