२०२१-०३-२५

गीतानुवाद-१८६: ऐ हुस्न ज़रा जाग

मूळ हिंदी गीतः शकील, संगीतः नौशाद, गायकः रफ़ी
चित्रपटः मेरे महबूब, सालः १९६३, भूमिकाः राजेंद्रकुमार, साधना 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००८०७०६

 

धृ

ऐ हुस्न ज़रा जाग तुझे इश्क जगाये
बदले मेरी तकदीर जो तू होश में आये

हे रूपवती तू जाग तुला प्रीत पुकारे
बदलेल माझे दैव जर तू जागशी सखये

ये प्यार के नगमे ये मुहब्बत के तराने
तुझको बड़े अरमान से लाया हूँ सुनाने
उम्मीद मेरे दिल की कहीं टूट न जाये

प्रेमाच्या ह्या कविता आणि ही प्रीतीची गीते
अपेक्षेने तुला ऐकवायला आणले सये हे
आशा न मनाची माझ्या होवो निराश गे

साज़--दिले खामोश में एक सोज जगा दे
तू भी मेरी आवाज़ में आवाज़ मिला दे
आया हूँ तेरे दर पे बड़ी आस लगाये

संगीतात सूप्त, हृदयीच्या जागव तू शोकगीत
आवाजामधे माझ्या तुझा स्वर मिसळ प्रिये
खूप आस घेऊनी मी तुझ्या द्वारी आलो आहे

ऐ शम्मा तू आजा ज़रा चिलमनसे निकलके
हसरत है कि रह जाऊं तेरी आग में जलके
परवाना वो क्या तुझपे जो मिटकर ना दिखाए

हे ज्योती तू आवरणाच्या बाहेर निघून ये
इच्छा तुझ्या धगीत भस्म होण्याची आहे प्रिये
समर्पित न होऊन दाखवे पतंगच न तो म्हणवे


https://www.youtube.com/watch?v=9rXZ_IWILxs

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.