२०२१-०२-२२

गीतानुवाद-१८४: हाय रे तेरे चंचल

मूळ हिंदी गीतः मजरूह, संगीतः चित्रगुप्त, गायिकाः लता
चित्रपटः उँचे लोग, सालः १९६५, भूमिकाः अशोक कुमार, राजकुमार, फिरोझखान, कन्हैयालाल 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००९०७२७

धृ

हाय रे तेरे चंचल नैनवा
कुछ बात करें रुक जाएँ

डोळे तुझे चंचल बोलके
हितगूज करती, चुप होती

खुलके ये बातें कम करें
चुपके ही चुपके सितम करें
बस डोलें न कुछ बोलें
पलकों से मुस्काएँ

क्वचितच बोलती स्पष्ट हे
गपचूपच राहून छळती हे
बस फिरती, न गुज करती
पापण्यांनी स्मित करती

उलझे हम से हर बार दिल
कुछ ऐसा है बेक़रार दिल
कुछ तुम भी तो समझाओ
हम क्या-क्या समझाएँ

प्रत्येकच वेळी गुंगवी मन
बेचैनच ऐसे राहते मन
काही तू हि तर समजव
मी काय काय समजावू

हम तो चाहत में जल गए
तुम वादा करके बदल गए
हम कैसे जी तुम जैसे
अनजाने बन जाएँ

मी तर प्रीतीतच जळले रे
वचनही देऊन तू बदललास
मी कैसी रे तुज जैसी
विसरू रे ओळखच


https://www.youtube.com/watch?v=Qkig_Vw2ngA

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.