|
Roget’s Thesaurus
|
रॉजेटचा शब्दनिधी
|
|
|
|
|
मूळ इंग्रजी कविताः ब्रेन बिल्स्टन
(Brian Bilston) १७७९०११८
|
मराठी अनुवादः
नरेंद्र गोळे २०२१०११८
|
|
|
|
१
|
In order to grow, expand, widen his
lexicological corpus, Roget bought, acquired, purchased a synonymopedia, a
thesaurus.
|
शब्दनिधीविचाराच्या सामुग्रीने वाढावं, विस्तारावं, रुंद व्हावं याकरता रॉजेट यांनी
समानार्थी शब्दसंग्रह, एक शब्दनिधीविचार प्राप्त केला, मिळवला विकत घेतला.
|
२
|
Soon, presently, without delay, he no
longer ran out of things to say, speak, utter, express, articulate, give
voice to, pronounce, communicate.
|
लवकरच, वर्तमानात,
अविलंब, त्यांना बोलायला, उच्चारायला, व्यक्त व्हायला, मत
मांडायला, आवाज उठवायला, घोषित करायला, संवाद साधायला शब्दांची उणीव जाणवेनाशी
झाली.
|
३
|
This was all very well, fine, great, wonderful,
super, terrific but his friends, mates, pals found him boring, tedious, dull,
soporific.
|
हे तर फारच
छान झाले, उत्तम झाले, थोर झाले, आश्चर्यकारक झाले, महान झाले, कमालच झाले; पण त्यांचे
मित्र, सोबती यांना ते कंटाळवाणे वाटू लागले, क्लिष्ट भासले, रटाळ आणि गुंग करणारे वाटले.
|
४
|
So let this be a warning, an omen, a sign, a
premonition, it’s all very well to show learning, education, knowledge, erudition,
|
त्यामुळे एक
सावधगिरीची सूचना आहे, एक शकून, एक चिन्ह, पूर्वानुमान
आहे की, आपले अवगत कौशल्य, शिक्षण, ज्ञान, विद्वत्ता, दाखवण्यासाठी हे ठीक आहे,
|
५
|
but here’s a top tip, a hint, a suggestion, some advice, don’t ever let it stop you from being concise,
|
मात्र एक सर्वोत्तम
मार्गदर्शन, इशारा, एक सूचना, काहीसा सल्ला असा आहे की, त्यामुळे तुम्हाला कधीही
थोडक्यात सांगता येऊ नये, असे होऊ नये,
|
६
|
brief, short, clear, pithy, succinct, compendious, to the point, compact,
snappy, laconic, Breviloquent.
|
स्वल्प, छोटे,
स्पष्ट, नेमके, सारभूत, सारांकित, मुद्द्याचे,
सुटसुटित, जोमदार, मितभाषी आणि संक्षिप्त सांगता येऊ नये, असे होऊ नये.
|