२०१६-०५-१५

गीतानुवाद-०७८: चौदहवीं का चाँद हो या आफ़ताब हो

मूळ हिंदी गीतः शकील, संगीतः रवी, गायक: रफी
चित्रपटः चौदहवी का चांद, सालः १९६०, भूमिकाः गुरू दत्त, वहीदा रहमान, रहमान, जॉनी वाकर

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००८०५०३

धृ
चौदहवीं का चाँद हो, या आफ़ताब हो
जो भी हो तुम खुदा कि क़सम, लाजवाब हो
पौर्णिमेचा चंद्र वा सूर्यच जणू की तू
असशी जी कुणीही खरच अनुपमेय तू
ज़ुल्फ़ें हैं जैसे काँधे पे बादल झुके हुए
आँखें हैं जैसे मय के पयाले भरे हुए
मस्ती है जिसमे प्यार की तुम, वो शराब हो
हे केस खांद्यावरती जणू दाटलेले ढग
डोळे जणू की सोमरसे भारले चषक
मस्ती आहे ज्यात प्रेमाची, आहेस ते मद्य तू

चेहरा है जैसे झील मे खिलता हुआ कंवल
या ज़िंदगी के साज पे छेड़ी हुई गज़ल
जाने बहार तुम किसी शायर का ख़्वाब हो
चेहरा जणू की फुललेले पद्मच सरोवरी
की जीवनाच्या संगीती कविता खरीखुरी
प्रिये बहार तू, कुणा कवीचे स्वप्न तू

होंठों पे खेलती हैं तबस्सुम की बिजलियाँ
सजदे तुम्हारी राह में करती हैं कैकशाँ
दुनिया--हुस्न--इश्क़ का तुम ही शबाब हो
ओठांवर उजळती जणू स्मित फुलझड्या
मार्गी तुझ्या उजळती विश्वदीप हे दिशा
दुनियेतील सुंदरता आणि प्रीतीचे यौवन तू




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.