२०१६-०५-१६

गीतानुवाद-०७९ः तुम अगर मुझको

मूळ हिंदी गीतकार: साहिर, संगीतः रोशन, गायक: मुकेश
चित्रपटः दिल ही तो हैं, सालः १९६३, भूमिकाः राज कपूर, नूतन

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००६१२१६


धृ
तुम अगर मुझको, न चाहो, तो कोई बात नहीं
तुम किसी और को, चाहोगी, तो मुष्किल होगी
तू पसंत मजला, न करशील, न बिघडत काही
कुणा दुसर्‍यास, पसंत करशील, तर कठीण होईल

अब अगर मेल, नहीं है, तो जुदाई भी नहीं
बात तोड़ी भी नहीं, तुमने बनाई भी नहीं
ये सहारा भी, बहुत है, मेरे जीने के लिये
तुम अगर मेरी नहीं हो, तो पराई भी नहीं
मेरे दिल को न सराहो, तो कोई बात नहीं
गैर के दिल को, सराहोगी, तो मुष्किल होगी
निकटता नसली, नसो तरीपण, विरहही नाही
तोडलेही न जरी आता, तू जोडलेही नाहीस
धीर जगण्याला, माझ्या हा, पुरेसा आहे
तू न माझी जरी असलीस, तरी परकीही नाहीस
माझे मन राखले नाहीस, न बिघडत काही
कुणा दुसर्‍याचे, राखशील मन, तर कठीण होईल

तुम हसीं हो, तुम्हें सब, प्यार ही करते होंगे
मैं तो मरता हूँ, तो क्या, और भी मरते होंगे
सब की आँखों में, इसी शौक़ का तूफ़ां होगा
सब के सीने में, यही दर्द, उभरते होंगे
मेरे ग़म में, न कराहो, तो कोई बात नहीं
और के ग़म में, कराहोगी, तो मुष्किल होगी
सुंदर आहेस तू, सर्व तुजवर, प्रेमची करतील
जीव टाकत मी, विशेष काय, इतरही टाकतील
वादळे ह्याच वेडाची, नयनी सार्‍या दिसतील
कळाही ह्याच, सर्वांच्या, हृदयी उठतील
माझ्या दु:खाने, न दुखशील, न बिघडत काही
कुणा दुसर्‍याचे, दु:ख सहशील, तर कठीण होईल

फूल की तरह हँसो, सब की निगाहों में रहो
अपनी मासूम जवानी की पनाहों में रहो
मुझको वो दिन, न दिखाना, तुम्हें अपनी ही क़सम
मैं तरसता रहूँ, तुम गैर की बाहों में रहो
तुम अगर मुझसे न निभाओ, तो कोई बात नहीं
किसी दुश्मन से निभाओगी, तो मुष्किल होगी
फुलापरी हास, सगळ्यांच्या, नजरेत राहा
निरागस यौवनाच्या तू आश्रयाने राहा
शपथ माझी, न मला तू, दाखवी दिन तो
मी तडफडेन, मिठीत तू दुसर्‍याच्या असो
माझ्याशी घेशी ना जुळवून, न बिघडत काही
कुणा दुसर्‍याशी घेशी जुळवून, तर कठीण होईल




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.