मूळ हिंदी गीतः कैफी, आझमी, संगीतः मदनमोहन, गायक: रफी
चित्रपटः हकिकत, सालः १९६४, भूमिकाः बलराज सहानी, धर्मेंद्र
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००५०७२९
॥
धृ
॥
|
कर चले हम फिदा जान ओ तन
साथियों
अब तुम्हारे हवाले वतन साथियों
|
अर्पुनी तन, हे जीवन आम्ही चाललो
देश तुमच्या हवाली, आता मित्र हो
|
॥
१
॥
|
साँस थमती गई, नब्ज जमती गई
फिर भी बढते कदम को न स्र्कने
दिया
कट गये सर हमारे तो कुछ गम नही
सर हिमालय का हम ने न झुकने
दिया
मरते मरते रहा बाँकापन साथियों
अब तुम्हारे हवाले वतन साथियों
|
श्वास थांबत गेले, रक्त गोठत गेले
मुळी न थांबू दिली अग्रसर पावले
शीर जरी कापले, दुःख मुळी ना असे
मस्तका हिमनगाच्या न मुळी झुकू दिले
सुंभ जळला तरी, पीळ सुटला नसे
देश तुमच्या हवाली आता मित्र हो
|
॥
२
॥
|
जिंदा रहने के मौसम बहुत हैं
मगर
जान देने की स्र्त रोज आती नहीं
हुस्न और इश्क दोनों को स्र्सवा
करे
वो जवानी जो खूं में नहाती नहीं
बाँध लो अपने सर पर कफन साथियों
अब तुम्हारे हवाले वतन साथियों
|
असती जगण्यास मौसम अनेकोअनेक
प्राण देण्याची संधी नसे रोज येत
रूप अन प्रेम दोघांसही ना भावते
होत जे रक्तरंजित न यौवन मुळी
बांधुनी प्रेतवस्त्रे चला मित्र हो
देश तुमच्या हवाली आता मित्र हो
|
॥
३
॥
|
राह कुर्बानियों की न वीरान हो
तुम सजाते ही रहना नये काफिले
फतह का जश्न इस जश्न के बाद है
जिंदगी मौत से मिल रही है गले
आज धरती बनी है दुल्हन साथियों
अब तुम्हारे हवाले वतन साथियों
|
त्यक्तजीवित जनांचे न पथ रिक्त हो
तुम्ही पुन्हा सज्ज ठेवा नवे काफिले
विजयोत्सव असे उत्सवापाठी ह्या
मृत्यूला भेटते जीवित आलिंगुनी
नटत धरती नव्या नवरीगत मित्र हो
देश तुमच्या हवाली आता मित्र हो
|
॥
४
॥
|
खींच दो अपने खूं से जमी पर
लकीर
इस तरह आने पाये न रावण कोई
तोड दो हाथ अगर हाथ उठने लगे
छुने पाये न सीता का दामन कोई
राम तुम हो, तुम ही लक्ष्मण साथियों
अब तुम्हारे हवाले वतन साथियों
|
रेखुनी रक्तरेखा या भूवर अशी
येऊ द्या ना पुढे तुम्ही कुणा रावणा
तोडूनी हात टाका जे उठतील ते
हात सीतेस लावू शको ना कुणी
राम तुम्ही, तुम्हीच लक्ष्मण मित्र हो
देश तुमच्या हवाली आता मित्र हो
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या
जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या
वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या
गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या
- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.