२०१५-०८-२१

गीतानुवाद-०५९: ये दिल और उनकी

मूळ हिंदी गीतः जान निस्सार अख्तर, संगीतः जयदेव, गायीकाः लता
चित्रपटः प्रेमपर्वत, सालः १९७३, भूमिकाः

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००६०५०


धृ

ये दिल और उनकी निगाहों के सायें
मुझे घेर लेते हैं बाहों के सायें

हृदय आणि त्याच्या, नजर सावल्या त्या
मला घेरतात, बाहू सावल्या त्या



पहाडों को चंचल किरण चुमती हैं
हवा हर नदी का बदन चुमती है
यहाँ से वहाँ तक है चाहों के सायें

पहाडांना चंचल किरण स्पर्शतात
हवा नदी नदीच्या जला स्पर्शतात
इथुन तिथवरी आसक्त सावल्या त्या



लिपटते हैं पेडों से बादल घनेरे
ये पल पल उजाले ये पल पल अंधेरे
बहोत ठंडे ठंडे हैं राहों के साये

बिलगतात वृक्षांना मेघ भारलेले
प्रकाश अन् तमाचाही लपंडाव चाले
गार गार असती मार्ग सावल्या त्या



धडकते हैं दिल कितनी आझादीयों से
बहोत मिलते जुलते हैं इन वादियों से
मोहोब्बत की रंगीन पनाहों के साये

मुभा लाभल्याने, हरखती मने ती
किती प्रकृतीशी, मने मिळती जुळती
रंग नाहलेल्या प्रेम सावल्या त्या

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.