२०१५-०७-२०

गीतानुवाद-०५४: किसी की मुस्कुराहटों पे

मूळ हिंदी गीतः शैलेंद्र, संगीतः शंकर जयकिसन, गायक: मुकेश
चित्रपटः अनाडी, सालः भूमिकाः राजकपूर, नूतन

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००६०३२१


धृ
किसी की मुस्कुराहटों पे, हो निसार
किसी का दर्द मिल सके, तो ले उधार
किसी के वास्ते हो, तेरे दिल में प्यार
जीना इसी का नाम हैं
कुणाच्या स्मितहास्यावर जे हो बहाल
कुणाचे दुःख मिळाल्यास घेई जे उधार
कुणाप्रती तुझ्या मनी ये स्नेहभाव
ह्याचेच जीवन हे नाव

माना, अपनी जेब से फकीर हैं
फिर भी यारों, दिल के हम अमीर हैं
मिटे जो प्यार के लिये, वो जिन्दगी
जले बहार के लिये, वो जिन्दगी
किसी को हो हो, हमें तो ऐतबार
कबूल जरी, आम्ही जगी, गरीब असू
तरी मनानी, दर्यादिल आम्ही असू
प्रेमासाठी सुळी चढे, ती जिंदगी
बहारीस्तव जी टाके जीव, ती जिंदगी
कुणा असो नसो, आम्हास हा विश्वास

रिश्ता दिल से, दिल के ऐतबार का
जिन्दा हैं हमीं से, नाम प्यार का
के मर के भी, किसी को याद आयेंगे
किसी की आँसुओं में, मुस्कुरायेंगे
कहेगा फुल, हर कली से, बार बार
मनामनातल्या विश्वासाचेच नाते हे
प्रेमाचे नावही आमच्यामुळेच टिके
की मरूनही, कुणास आम्ही आठवू
कुणाच्या अश्रुअश्रुंतून, आम्हीही हसू
म्हणेल पुष्पही, कळीकळीस वारंवार


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.