२०१५-०७-१२

गीतानुवाद-०५३: ये ख़ामोशियाँ

मूळ हिंदी गीतः राजिंदर क्रिश्न, संगीतः रवी, गायकः रफी, आशा
चित्रपटः ये रास्ते हैं प्यार के, सालः १९६३, भूमिकाः सुनील दत्त, लीला नायडू

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१५०७१२

धृ
रफ़ी
ये ख़ामोशियाँ ये तनहाइयाँ
मुहब्बत की दुनिया है कितनी जवाँ
आशा
ये ख़ामोशियाँ ये तनहाइयाँ
मुहब्बत की दुनिया है कितनी जवाँ
दोनों
ये ख़ामोशियाँ ये तनहाइयाँ

रफ़ी
ही निरवता एकांत हा
किती प्रीतीची ही दुनिया युवा
आशा
ही निरवता एकांत हा
किती प्रीतीची ही दुनिया युवा
दोघे
ही निरवता एकांत हा

आशा
आ आऽऽऽ आऽ आऽऽ आऽ
ओ हो हो
रफ़ी
आ हा
आशा
आ आ आ आ आ आ
रफ़ी
आ हा हा
आशा
ओ हो
रफ़ी
ओ हो हो हो हो हो
आशा
(ये सर्दी का मौसम बदन काँपे थर थर)-
रफ़ी:
ये हैं बर्फ़ के ढेर या संगमरमर
दोनों
बना लें न क्यूँ अपनी जन्नत यहाँ
रफ़ी
ये ख़ामोशियाँ ये तनहाइयाँ
मुहब्बत की दुनिया है कितनी जवाँ
दोनों
ये ख़ामोशियाँ ये तनहाइयाँ

आशा
आ आऽऽऽ आऽ आऽऽ आऽ
ओ हो हो
रफ़ी
आ हा
आशा
आ आ आ आ आ आ
रफ़ी
आ हा हा
आशा
ओ हो
रफ़ी
ओ हो हो हो हो हो
आशा
(ऋतू थंडीचा अन्‌ तनू कापे थर थर)-
रफ़ी:
ह्या बर्फांच्या राशी की असे संगमर
दोघे
आपला इथे स्वर्गचि वसवू या का
रफ़ी
ही निरवता एकांत हा
किती प्रीतीची ही दुनिया युवा
दोघे
ही निरवता एकांत हा

रफ़ी
ये ऊँचे पहाड़ों के मग़रूर साये
आशा
(ये कहते हैं उनको नज़र तो मिलाये)-
दोनों
फ़रिश्ते भी हैं इस जगह बेज़ुबाँ
आशा
ये ख़ामोशियाँ ये तनहाइयाँ
मुहब्बत की दुनिया है कितनी जवाँ
दोनों
ये ख़ामोशियाँ ये तनहाइयाँ

रफ़ी
या उंच पर्वताच्या उद्दाम छाया
आशा
(म्हणतात ह्या नेत्र उचलून पाहा ना)-
दोघे
देवदूतही होती येथे अवाक्‌
आशा
ही निरवता एकांत हा
किती प्रीतीची ही दुनिया युवा
दोघे
ही निरवरता एकांत हा

रफ़ी
न परदा है कोई न है कोई चिलमन
आशा
(जहाँ पाँव रख दें 
है फिसलन ही फिसलन)-
दोनों
क़दम छोड़ते जा रहे हैं निशाँ
रफ़ी
ये ख़ामोशियाँ [आ आ आ]
ये तनहाइयाँ [आ आ आ]
मुहब्बत की दुनिया है, कितनी जवाँ
दोनों
ये ख़ामोशियाँ ये तनहाइयाँ
रफ़ी  
आ आऽऽऽ आऽ आऽऽ आऽ
आशा  
आ आऽऽऽ आऽ आऽऽ आऽ
दोनों
आ आऽऽऽ आऽ आऽऽ आऽ
रफ़ी
न पदा इथे न आहे कुठलाही अडसर
आशा
(जिथे पाय ठेऊ 
तिथे फक्त घसरण)-
दोघे
पावले पुढे जात सोडत खुणा
रफ़ी
ही निरवता [आ आ आ]
एकांत हा [आ आ आ]
किती प्रीतीची ही दुनिया युवा
दोघे
ही निरवता एकांत हा
रफ़ी  
आ आऽऽऽ आऽ आऽऽ आऽ
आशा   
आ आऽऽऽ आऽ आऽऽ आऽ
दोघे
आ आऽऽऽ आऽ आऽऽ आऽ

हे गीत मुळी गीतकाराचे, अनुवादकाचे नाहीच आहे. हे आहे चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे, संगीतकाराचे आणि पार्श्वगायनाशी; ओठांच्या हालचाली, तसेच चेहर्‍यावरील भावविभ्रमांचा अनुपमेय ताळमेळ साधणार्‍या कलावंतांचे. म्हणजेच आर.के.नय्यर ह्यांचे, रवीजींचे, सुनील दत्त आणि लीला नायडू ह्यांचे. संगीत आणि चित्रीकरणाचे आदर्श घडवणारे हे अविस्मरणीय गीत आहे. केवळ खुळावणारे! अर्थातच गायक रफी आणि आशा ह्यांच्या कौशल्यांची वाखाणणी आपण काय करायची. ती तर त्यांच्या गाण्यातच बांधलेली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.