मूळ हिंदी गीतकार: फरुक कैसर, संगीत: लक्ष्मीकांत प्यारेलाल, गायक: लता, रफी
चित्रपट: पारसमणी, साल: १९६३, भूमिका: महिपाल, गितांजली
मराठी अनुवाद:
नरेंद्र गोळे २००४०६०४
॥
धृ
॥
|
रफी
वो जब याद आए, बहोत याद आए
गम ए जिंदगी के, अंधेरे मे हमने
चिराग ए मुहब्बत, जलाए बुझाए
वो जब याद आए, बहोत याद आए
|
रफी
ते जसे याद आले, परत याद आले
दु:खी जीवनाच्या, अंधारामध्ये मी
दिवे प्रेमभावाचे, उजळले मालवले
ते जसे याद आले, परत याद आले
|
॥
१
॥
|
रफी
आहटे जाग उठी, रास्ते हँस दिये
थामकर दिल उठे, हम किसी के लिये
कई बार ऐसा भी, धोखा हुआ है
चले आ रहे वो, नजरे झुकाए
|
रफी
साद जागे झाले, मार्ग हसू लागले
प्राण घेऊन
मुठीत, कुणास्तव पाहिले
कितीदा तरी धोका झाला असाही
मान खाली
करून, ती येती झाली
|
॥
२
॥
|
लता
दिल सुलगने लगा, अश्क बहने लगे
जाने क्या क्या हमे, लोग कहने लगे
मगर रोते रोते हँसी आ गई है
खयालों में आके वो जब मुस्कुराए
|
लता
काळिज कुढू लागले, अश्रू गळू लागले
लोक काही बाही, आम्हा म्हणू लागले
तरीही रडता रडता, बघ हसू उमटले हे
जेंव्हा विचारात त्याचे, स्मित ते प्रकटले
|
॥
३
॥
|
रफी
वो जुदा क्या हुए, जिंदगी खो गई
लता
शम्मा जलती रही, रोशनी खो गई
रफी
बहुत कोशिशे की, मगर दिल न बहला
कई साज छेडे, कई गीत गाए
|
रफी
दूर होताची ती, जैसे प्राण हरपले
लता
वात पेटत होती, दीप्ती ना राहिली
रफी
यत्न केले अनेक, मन न मुळी मानले
साज किती लावले, गाणी किती गाईली
|