२०२१-१०-२८

गीतानुवाद-२३०: नग्म़ा-ओ-शेर की सौगात

मूळ हिंदी गीतः साहिर लुधियानवी, संगीतः मदनमोहन, गायिकाः लता
चित्रपटः गझल, सालः १९६४, भूमिकाः मीनाकुमारी 

नरेंद्र गोळे २०२००४१७

धृ

नग्म़ा-ओ-शेर की सौगात किसे पेश करूँ
ये छलकते हुये जज़बात किसे पेश करूँ

उमलत्या काव्याचे हार मी कुणा अर्पू
उसळत्या भावांचे शब्द हे कुणा अर्पू

शोख आँखों के उजालों को लुटाऊँ किस पर
मस्त ज़ुल्फों की सियाह रात किसे पेश करूँ

तेजस्वी नयनांचे तेज कुणावर उधळू
मस्त केसांतली रात मी कुणा अर्पू

गर्म सासों में छूपे राज बताऊँ किस को
नर्म होठों में दबी बात किसे पेश करूँ

उष्ण श्वासांतले गुपीत मी कुणा सांगू
मऊ ओठांतले हितगूज मी कुणा अर्पू

कोई हमराज तो पाऊँकोई हमदम तो मिले
दिल की धड़कन के इशारात किसे पेश करूँ

कुणी सोबत तर मिळो, कुणी असो संगत
हृदयस्पंदांचे संकेत हे, मी कुणा अर्पू


२०२१-१०-०७

गीतानुवाद-०१३: चमन के फूल भी

मूळ हिंदी गीतकार: फरुख कैसर, संगीत: जी.एस.कोहली, गायक: लता, रफी
चित्रपट: शिकारी, साल १९६३, भूमिकाः अजित, रागिणी, हेलन, मदन पुरी 

मराठी अनुवाद: नरेंद्र गोळे २००७०११८

धृ

चमन के फूल भी तुझ को गुलाब कहते हैं
हमीं नहीं, हैं सभी लाजवाब कहते हैं

उपवनी फुलंही तुलाच गुलाब म्हणतात
न फक्त मी, सर्व तुज अनुपमेय म्हणतात

 

नज़र मिला के मेरे दिल की बात पहचानो
सुना है चेहरे को दिल की किताब कहते हैं

जुळवून नजर तू जरा, हृदय माझे जाणून घे
परिसले, चेहर्‍या पुस्तक मनाचे म्हणतात

साज़-ए-दिल छेड़ दिया है
तो ये नग़मा सुन लो
बिखरी बिखरी हुई ये प्यार की
किरणें चुन लो

मनाची छेडलिस तार
तर हे गीत ऐकून घे
विखुरलेलीशी प्रेमाची
किरणे निवडून घे

 

इसी किरण को सनम आफ़ताब कहते हैं

याच किरणांना प्रिये, लोक सूर्य म्हणतात

 

हमीं नहीं हैं सभी लाजवाब कहते हैं
हमीं नहीं हैं सभी लाजवाब कहते हैं
चमन के फूल भी तुझ को



न फक्त मी, सर्व तुज अनुपमेय म्हणतात
न फक्त मीसर्व तुज अनुपमेय म्हणतात
उपवनी फुलंही तुलाच

चष्म-ए-हैराँ की कसम
जुल्फ-ए-परेशाँ की कसम
मांग लो जान तुम्हे
आज मेरे जाँ की कसम

चकित नजरांची शपथ
विखुरल्या केसांची शपथ
माग तू आज प्राण माझे
तुला माझ्या प्राणांची शपथ

 

गजब की बात है ये क्या जनाब कहते है
हमीं नहीं हैं सभी लाजवाब कहते हैं
हमीं नहीं हैं सभी लाजवाब कहते हैं
चमन के फूल भी




कमालच आहे काय हे मागता आपण
न फक्त मी, सर्व तुज अनुपमेय म्हणतात
न फक्त मी, सर्व तुज अनुपमेय म्हणतात
उपवनी फुलंही तुलाच

आज तक देखी नहीं ऐसी दहकती आँखें

आजवर पाहिले ना, हे असे तेजस डोळे

 

डाल दो आ के इन आँखोंमें छलकती आँखें

रोखून डोळ्यांत पाहा, तुझे लावुनी डोळे

 

सम्भल के पीना इसे सब शराब कहते हैं

सावरून प्यावे, हिला जन सुराच म्हणतात

 

हमीं नहीं हैं सभी लाजवाब कहते हैं
हमीं नहीं हैं सभी लाजवाब कहते हैं
चमन के फूल भी



न फक्त मी, सर्व तुज अनुपमेय म्हणतात
न फक्त मीसर्व तुज अनुपमेय म्हणतात
उपवनी फुलंही तुलाच


गीतानुवाद-१७४: गाता रहे मेरा दिल

चित्रपटः गाईड, सालः १९६५, देव आनंद, वहीदा रहमान
मूळ हिंदी गीतः शैलेंद्र, संगीतः सचिनदेव बर्मन, गायकः किशोर, लता 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००८०६२७

 

धृ

गाता रहे मेरा दिल
तू ही मेरी मंज़िल
कहीं बीतें न ये रातें
कहीं बीतें न ये दिन

गातच राहो माझे मन
तूच माझे ईप्सित
सरून जावोत न या राती
सरून जावोत न हे दिस

प्यार करने वाले
अरे प्यार ही करेंगे
जलने वाले चाहे
जल जल मरेंगे
दिल से जो धड़के हैं
वो दिल हरदम ये कहेंगे

प्रेम करणारे हे
प्रेम नेहमीच करतील
जळणारे हवं तर
जळून जळून मरतील
मने स्पंदती मनापासूनी
नेहमीच हे, म्हणतील की

ओ मेरे हमराही
मेरी बाँह थामे चलना
बदले दुनिया सारी
तुम न बदलना
प्यार हमे भी सिखला देगा
गरदिश में सम्भलना

ए सोबत्या माझ्या
माझा हात धरून चल तू
बदलो दुनिया सारी
मुळी ना बदल तू
प्रेम आपल्यालाही शिकवेल
संकटात सावरणे

दूरियाँ अब कैसी
अरे शाम जा रही है
हमको ढलते ढलते
समझा रही है
आती जाती साँस जाने
कब से गा रही है

दूरता ही कसली
जाते सांज ही ढळूनी
ढळता, ढळता आम्हाला
समजावत आहे ती
येते जाते श्वास न जाणो
गाती कधीपासूनी

गीतानुवाद-११०: दिल का खिलौना हाय

मूळ हिंदी गीतः भरत व्यास, संगीतः वसंत देसाई, गायीकाः लता
चित्रपटः गूंज उठी शहनाई, सालः १९५९, भूमिकाः राजेंद्र कुमार, अमिता, आनिता गुहा 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००८०७०४

 

धृ

टूट गया
दिल का खिलौना हाय टूट गया
कोई लुटेरा आ के लूट गया
हाय कोई लुटेरा आ के लूट गया
दिल का खिलौना हाय टूट गया

मोडलं रे
खेळणे मनाचे बघ की मोडलं रे
कुणा लुटारूने येऊन लुटले रे
हाय कुणा लुटारूने येऊन लुटले रे
खेळणे मनाचे बघ की मोडलं रे

हुआ क्या क़ुसूर ऐसा सैंयाँ हमारा
जाते हुये जो तूने हमें ना पुकारा
उल्फ़त का तार तोड़ा
हमें मझधार छोड़ा
हम तो चले थे ले के तेरा ही सहारा
साथी हमारा हमसे छूट गया

घडला क़सूर असला कुठला रे माझा
सादही न घातलीस तू निघतांना
प्रीतीची लय मोडलीस
मला प्रवाहात सोडलीस
मी तर मदतीने होते चालले तुझ्या
सोबती माझा, हरपून गेला

कैसी परदेसी तूने प्रीत लगाई
चैन भी खोया हमने नींद गँवाई
तेरा ऐतबार कर के
हाय इंतज़ार कर के
ख़ुशियों के बदले ग़म की दुनिया बसाई
ज़ालिम ज़माना हमसे रूठ गया

कसे परदेशीया तू प्रेम जडवलेस
सुख ही गमावले, माझी झोपही उडाली
तुझा भरवसा धरून
तुझी प्रतीक्षा करून
सुखाऐवजी दु:खाचे वसवले मी गाव
दुष्ट समाज मजवर रुष्ट झाला

गीतानुवाद-१४४: मुझ को इस रात की

मूळ हिंदी गीतकारः शमीम जयपुरी, संगीतः कल्याणजी-आनंदजी, गायकः मुकेश
चित्रपटः दिल भी तेरा हम भी तेरे, सालः १९६०
भूमिकाः बलराज सहानी, उषा किरण, कुमकुम, धर्मेंद्र 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२१०७१२

धृ

मुझ को इस रातकी तनहाई में आवाज़ न दो
जिसकी आवाज़ रुला दे मुझे वो साज़ न दो

मला ह्या रात्रीच्या एकांती तू आवाज न दे
रडू फुटेल मला ज्याने तो तू साज न दे

मैंने अब तुम से न मिलने की कसम खाई है
क्या खबर तुमको मेरी जान पे बन आई है
मैं बहक जाऊँ कसम खाके तुम ऐसा न करो

तुला न भेटायची मी आता शपथ घेतली आहे
तुला काय माहित ती जीवावरच बेतली आहे
मी शपथ घेऊ आणि न पाळू, तू असे न कर

दिल मेरा डूब गया आस मेरी टूट गई
मेरे हाथों ही से पतवार मेरी छूट गई
अब मैं तूफ़ान में हूँ साहिल से इशारा न करो

जीव बुडला माझा, आशा माझी झाली निराश
माझ्या हातातुनच वल्ही माझी निसटून गेली
आता तुफानात मी, तीराहून तू संकेत न कर

रौशनी हो न सकी लाख जलाया हमने
तुझको भूला ही नहीं लाख भुलाया हमने
मैं परेशां हूँ मुझे और परेशां न करो

खूप उजळूनही उजेड होऊ शकला नाही
खूप विसरूनही तुज विसरू शकलो नाही
मी संत्रस्त आहे, आणखी तू त्रस्त न कर

किस कदर रोज़ किया मुझसे किनारा तुमने
कोई भटकेगा अकेला ये न सोचा तुमने
छुप गए हो तो कभी याद ही आया न करो

कसे दररोज मला टाळले आहेस ग तू
कुणी एकटा भटकेल हा न विचार केलास तू
लपली आहेस तर, कधी आठवूही नकोस

२०२१-१०-०६

स्तोत्रानुवाद-०४: आदि शंकराचार्यकृत प्रातःस्मरण

मराठी समश्लोकी (वसंततिलका) अनुवादः नरेंद्र गोळे २०२००४०९

प्रात: स्मरामि हृदि संस्फुरदात्मतत्त्वं
सच्चित्सुखं परमहंसगतिं तुरीयम्
यत्स्वप्नजागरसुषुप्तिमवैति नित्यं
तद्ब्रह्म निष्कलमहं न च भूतसंघ:

सत्त्वा सकाळि स्मरतो हृदि जागते जे
आनंद दे परमहंसपदी मिळे ते
निद्रेतही, सजगतेत, स्वप्नात जागे
ते मीच निष्कलंक ब्रम्ह, न पंचभूते

प्रातर्भजामि मनसा वचसामगम्यं
वाचो विभान्ति निखिला यदनुग्रहेण
यन्नेतिनेतिवचनैर्निगमा अवोचु-
स्तं देवदेवमजमच्युतमाहुरग्र्यम्‌

अर्चे सकाळि मनसा वचसा अगम्या
वाचा विलासत कृपाप्रसादे जयाच्या
वेदांत ज्यास म्हणती नच हे न दूजे
जे आदि देव अच्युतात्मक तत्त्व त्याला

प्रातर्नमामि तमस:परमर्कवर्णं
पूर्णं सनातनपदं पुरुषोत्तमाख्यम्
यस्मिन्निदं जगदशेषमशेषमूर्तौ
रज्ज्वां भुजंगम इव प्रतिभासितं वै

तेजा सकाळि नमु दिव्य, अंधार नाशी
जे वर्णतात पुरुषोत्तम पूर्ण अंशी
स्फूर्ती तयाचि करते जग भासमान
दोरी भुजंग ठरते जशि संशयानं

फल

श्लोकत्रयमिदं पुण्यं लोकत्रयविभूषणम्
प्रात:काले पठेद्यस्तु स गच्छेत्परमं पदम्

भूषणच तिन्ही लोकी असे हे श्लोक रोजची
सकाळी जो म्हणे जाय सर्वोच्चपदि तो सुखे

इति

श्रीमच्छंकरभगवत: कृतौ परब्रह्मण:
प्रात:स्मरणस्तोत्रं सम्पूर्णम्

अशाप्रकारे श्रीमच्छंकराचार्यकृत परब्रम्हाचे
प्रातःस्मरण संपूर्ण होत आहे

 

२०२१-१०-०१

गीतानुवाद-२२९: भुईचाफ्यांचा ताटवा

मूळ इंग्रजी कविताः

भुईचाफ्यांचा ताटवा (डॅफोडिल्स, आय वांडर्ड लोनली ऍज क्लाऊड)

मूळ इंग्रजी कवी: विल्यम वर्डसवर्थ
(जन्मः ७ एप्रिल १७७०, कॉकरमाऊथ;
मृत्यूः २३ एप्रिल १८५०, रायडल माऊंट अँड गार्डन)

श्रीमान विद्याधर नारायण शुक्ला यांच्या प्रयासाने प्रेरित होऊन केलेला
वर्डसवर्थ यांच्या एका नितांतसुंदर कवितेचा हा मराठी अनुवाद!
 

I Wandered Lonely as a Cloud - BY William Wordsworth

https://www.poetryfoundation.org/poems/45521/i-wandered-lonely-as-a-cloud

I wandered lonely as a cloud
That floats on high o'er vales and hills,
When all at once I saw a crowd,
A host, of golden daffodils;
Beside the lake, beneath the trees,
Fluttering and dancing in the breeze.

वाहे उंचावरुनी, ढग झुलत तसा, मी फिराया निघालो
देखावा ये समोरी, अवचितच असा, एक सोनेरि पुष्पी
होता तळ्यातिरी तो, झुलत तरुतळी, ताटवा चाफयाचा
वार्‍याच्या स्वैर लाटां, वर विहरत तो, खूप डौलात मौजे

Continuous as the stars that shine
And twinkle on the milky way,
They stretched in never-ending line
Along the margin of a bay:
Ten thousand saw I at a glance,
Tossing their heads in sprightly dance.

तार्‍यांच्या चांदण्याचे, परि चमकत तो, एकओळी किनारी
रांगेला अंत नाही, दशसहस्र तुरे, मान उंचावणारे
ऊर्जा त्यांची अपारा, तळपत भुषती, नाचती सौष्ठवाने
सारे ते दृश्य मोदे, मन भरत तसे, देखणे जातीवंत

The waves beside them danced; but they
Out-did the sparkling waves in glee:
A poet could not but be gay,
In such a jocund company:
I gazed—and gazed—but little thought
What wealth the show to me had brought:

लाटा वार्‍यांवरीच्या, हरत उजळता, रंग चाफ्यांस तेजे
याने आनंद व्हावा, सहज उमलुनी, कोणत्याही कवीला
देखावा तो सुदैवी, बघत बघत मी, भान माझे गळाले
त्याच्या श्रीमंतिने मी, विभव कितितरी, गाठिला जोडलेले

For oft, when on my couch I lie
In vacant or in pensive mood,
They flash upon that inward eye
Which is the bliss of solitude;
And then my heart with pleasure fills,
And dances with the daffodils.

जेव्हा जेव्हा कधी मी, नकळत दमता, काहिसा थांबतो तो
अंतःचक्षूसमोरी, हसत हसत ते, येति सोनेरि चाफे
देती आनंद मोठा, उजळत फुलुनी, आठवांतील सारे
मीही आनंदि होतो, थिरकत पदही, त्यांसवे नाचु लागे


वृत्तः स्रग्धरा (अक्षरे-२१, यतीः ७,७,७), लक्षणगीतः मानावा राधिका भा, स्कर नमन यमा, चा यमाचा यमाचा