https://www.facebook.com/narendra.gole.3/posts/3909836765725910
विघ्नांचा करि जो विनाश सहसा, भक्तांस दे प्रीति
त्या
जो देवांसहि पूज्य श्री गणपती, वंदून आधी तया ।
सांगे स्पष्ट अचूक सार चतुरा, लालित्य भावेल जी
अंकांची गणिते करे सरळ जी, सोपीच ’लीलावती’ ॥ १॥
- शार्दूलविक्रीडित
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२१०२१२
प्रीतिंभक्तजनस्त यो जनयते विघ्नं विनिघ्नन्स्मृत
स्तं वृन्दारकवृन्दवन्दितपदं नत्वा मतङ्गाननम् ।
पाटीं सद्गणितस्य वच्मि चतुरप्रीतिप्रदां
प्रस्फुटां
संक्षिप्ताक्षरकोमलामलपदैर्लालित्यलीलावतीम् ॥
१ ॥ - शार्दूलविक्रीडित
मङ्गलाचरणम्, लीलावती, भास्कराचार्य द्वितीय, इसवीसन-१११४ ते ११८५
स्मरण करताच भक्तांच्या विघ्नांचा नाश करणार्या,
भक्तांवर प्रेम करणार्या, सर्व देवतासमूहाकडून वंदिल्या गेलेल्या गजाननास वंदन
करून मी; चतुरजनांना आवडणार्या, सुस्पष्ट, संक्षिप्त, सोप्या, निर्दोष आणि लालित्यपूर्ण
भाषेत अंकगणित सांगणारी ’लीलावती’ इथे सादर करतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या
जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या
वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या
गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या
- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.