मूळ हिंदी गीतः मजरूह सुलतानपुरी, संगीतः किशोरकुमार,
गायकः किशोरकुमार
चित्रपटः झुमरू, सालः १९६१, भूमिकाः किशोरकुमार,
मधुबाला
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१९१११२
|
कोई हमदम ना रहा
कोई सहारा ना रहा
हम किसी के ना रहे
कोई हमारा ना रहा
|
न कुणी आपला राहिला
न कुणी सहाय्या राहिला
आम्ही कुणाचे न उरलो
न कुणी आमचा राहिला
|
|
शाम तन्हाई की है
आएगी मंज़िल कैसे
जो मुझे राह दीखाए
वोही तारा ना रहा
|
रात एकाकी आहे
ईप्सित लाभेल कैसे
जो मला वाट दाखवेल
तो न तारा राहिला
|
|
ऐ नज़ारों न हँसो
मिल न सकूँगा तुमसे
वो मेरे हो न सके
मैं भी तुम्हारा न रहा
|
देखाव्यांनो न हसा
मी न भेटू शकतो
ती न माझी जाहली
मीही न राहिलो तुमचा
|
|
क्या बताऊँ मैं
कहाँ
यूँही चला जाता हूँ
जो मुझे फिर से बुलाह ले
वो इशारा ना रहा
|
काय सांगू मी कुठे
असा उठून जातो आहे
जो मला पुन्हा बोलावेल
न इशारा राहिला
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या
जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या
वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या
गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या
- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.