२०१९-११-१६

गीतानुवाद-१३१: मैं चली, मैं चली पीछे-पीछे जहां


मूळ हिंदी गीतः शैलेंद्र, संगीतः शंकर-जयकिसन, गायक: लता, रफी
चित्रपटः प्रोफेसर, सालः १९६२, भूमिकाः कल्पना, शम्मी कपूर


धृ
मैं चली, मैं चली पीछे-पीछे जहां
ये न पूछो किधर, ये न पूछो कहाँ
सजदे में हुस्न के, झुक गया आसमाँ
लो शुरू हो गई, प्यार की दास्ताँ

चालले, चालले, मागे मागे सारे
नका विचारू कुठे, नका विचारू ठिकाण
रूपाच्या कौतुकात, झुकले आकाश हे
पाहा सुरू जाहली, प्रेमाची ही कथा

जाओ जहाँ कहीं आँखों से दूर
दिल से ना जाओगे मेरे हुज़ूर
जादू फिज़ाओं का छाया सुरूर
ऐसे में बहके तो किसका क़ुसूर

जा कुठेही तू, नजरेतून दूर
जाशील मनातून न कधी निघून
बहारीची जादू ही, आला हुरूप
वाहवले अशात तर, कुणाची चूक
बहके क़दम चाहे, बहके नज़र
जाएँगे दिल ले के जाएँ जिधर
प्यार की राहों में प्यारा सफर
हम खो भी जाये तो क्या है फिकर

चुकली पावले वा, चुकली नजर
जिंकून मन जाईन, हवे तोवर
प्रेमाच्या वाटेवर, प्रीय सफर
हरवलो कुठेही तर, कसली फिकर



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.