२०१२-०३-३०

अप्रत्यास्थ पिशव्या- एक पर्यावरणीय धोका

अप्रत्यास्थ कचर्‍यामुळे पर्यावरणासमोर उभा ठाकलेल्या धोक्यासंबंधित मुद्द्यांचे मूल्यांकन अनेक समित्यांनी केलेले आहे. अप्रत्यास्थ पिशव्यांच्या वापरामुळे निर्माण झालेली समस्या ही प्राथमिकतः (घन) कचरा-व्यवस्थापन-प्रणालीतील त्रुटींमुळे निर्माण झालेली आहे. तारतम्यविहीन, रासायनिक पदार्थांच्या भरीमुळे, अशा पर्यावरणीय समस्या उभ्या ठाकलेल्या आहेत, ज्यांत खुल्या गटारांचे तुंबणे, भू-जल मलीन होणे इत्यादी समस्यांचा समावेश होत असतो. अप्रत्यास्थ पदार्थ स्वतःहून निष्क्रिय असतात, जगभर बांधाबांध करण्यास वापरले जात असतात आणि आरोग्य वा पर्यावरणास स्वतःहून धोकादायक नाहीत. मंजूर प्रक्रिया आणि मार्गदर्शक तत्त्वांनुसार अप्रत्यास्थ पदार्थांचे पुनर्चक्रण केल्यास, ते पर्यावरण वा आरोग्यास धोकादायक ठरणारही नाहीत.

अप्रत्यास्थ पदार्थ (प्लास्टिक) काय असतात?

अप्रत्यास्थ (प्लास्टिक) पदार्थ म्हणजे बहुल-परिमाणिक-भव्य-रेणू पदार्थ असतात, ज्यांत एकल-परिमाणिक एककांची पुनरावृत्ती होत असते. अप्रत्यास्थ पिशव्यांच्या प्रकरणात, पुनरावर्ती एकके इथिलीनची असतात. जेव्हा इथिलीन रेणूंचे बहुलिथिलीन निर्माण करण्याकरता बहुलीकरण केले जाते, तेव्हा ते रेणू कर्ब अणूंच्या लांबलचक साखळ्या निर्माण करतात, ज्यांत प्रत्येक कर्ब अणू दोन उद्‌जन अणूंसोबतही बांधला जात असतो.

अप्रत्यास्थ पिशव्या कशाच्या बनलेल्या असतात?

अप्रत्यास्थ पिशव्या तीन मूळ प्रकारच्या बहुल-परिमाणिकां -बहुलिथिलीन- पासून बनलेल्या असतात. उच्च-घनता-बहुल-इथिलीन (उघबइ), निम्न-घनता-बहुल-इथिलीन (निघबइ) किंवा रेषीय-निम्न-घनता-बहुल-इथिलीन (रेनिघबइ). किराणा पिशव्या सामान्यतः उघबइ च्या असतात आणि ड्राय-क्लिनरच्या पिशव्या निघबइ च्या असतात. ह्या पदार्थांतील प्रमुख फरक बहुलिथिलीन साखळ्यांच्या शाखाफुटीच्या प्रमाणात असतो. उघबइ आणि रेनिघबइ पदार्थ रेषीय, शाखा-विहीन साखळ्यांचे बनलेले असतात, तर निघबइ पदार्थांत साखळ्यांना शाखा असतात.

अप्रत्यास्थ पदार्थ आरोग्यास अपायकारक असतात का?

अप्रत्यास्थ पदार्थ स्वभावतः विषारी किंवा अपायकारक नसतात. पण सामानवाहू पिशव्या; रंगद्रव्ये व रोंगणे, निष्ताणकारके, प्रतिप्राणिलीकारके, स्थैर्यकारके आणि धातू यांसारख्या सेंद्रिय आणि असेंद्रिय पदार्थांची भर घालून तयार केल्या जातात.

कॅडमियम आणि शिश्यासारखे विषारी धातू जेव्हा अप्रत्यास्थ पिशव्यांच्या निर्मितीत वापरले जातात, तेव्हा तेही बाहेर पाझरून अन्नपदार्थांना दुषित करतात. कमी मात्रेत अवशोषित कॅडमियम उलट्या होणे आणि हृदयप्रसरण होणे यास कारणीभूत ठरू शकते. दीर्घकालीन शिश्याचा संसर्ग मेंदूच्या उतींची अवनती घडवू शकतो.

अप्रत्यास्थ सामानवाहू पिशव्यांनी उभी केलेली समस्या

अप्रत्यास्थ पिशव्यांची विल्हेवाट जर योग्य रीतीने लावली गेली नाही तर जलनिस्सारण प्रणालीत येऊन पोहोचतात आणि त्यांना अवरुद्ध करतात, ज्यामुळे पर्यावरण अनारोग्यकारक होते आणि जल-जन्य रोग बळावतात. पुनर्चक्रित/ रंगीत अप्रत्यास्थ पिशव्यांत काही रसायने असू शकतात जी जमिनीत झिरपून माती आणि भूजलास दुषित करू शकतात. पुनर्चक्रणाकरता, पर्यावरणदृष्ट्या दृढ तंत्रांनी युक्त नसलेली एकके, पुनर्प्रक्रियेदरम्यान निर्माण झालेल्या विषारी धुरापायी पर्यावरणीय समस्या निर्माण करू शकतात. उर्वरित अन्नपदार्थ बाळगणार्‍या आणि इतर कचर्‍यासोबत मिसळलेल्या काही अप्रत्यास्थ पिशव्या, जनावरे खातात, त्यामुळे अपायकारक प्रभाव निर्माण होतात. जैव-विनाश-क्षम नसल्यामुळे आणि स्वभावजन्य अभेद्यतेमुळे, निष्ताण पदार्थ जमिनीत टाकून दिल्यास, भू-जल-आर्द्रकांचे पुनर्भारण रोखतील. शिवाय, अप्रत्यास्थ पदार्थांच्या उत्पादनांचे गुणधर्म सुधारण्याकरता आणि त्यांच्या अवनतीकारक प्रतिक्रिया रोखण्याकरता भरीचे पदार्थ आणि अप्रत्यास्थकारके, परिपूरके, ज्वालानिरोधके आणि रोंगणे सामान्यपणे वापरली जातात, त्यांचेही स्वतःचे आरोग्य-आघात असतात.

रंगद्रव्ये व रोंगणे ही औद्योगिक रक्त-पीत रंजकद्रव्ये असतात ज्यांचा उपयोग अप्रत्यास्थ पिशव्यांना प्रखर रंग देण्यासाठी केला जातो. यांतील काही कर्ककारक असतात आणि या पिशव्यांत अन्नपदार्थ बांधल्यास ते त्या अन्नपदार्थांना दुषित करू शकतात. रोंगणांत असलेले कॅडमियम सारखे जड धातू बाहेर पडून आरोग्यास अपायकारक सिद्ध होऊ शकतात.

अप्रत्यास्थकारके अतिशय निम्न संप्लाव्य स्वभावाचे सेंद्रिय पदार्थ (ईस्टर्स) असतात. ते अन्नपदार्थांत पाझरून स्थलांतरित होऊ शकतात. अप्रत्यास्थकारकेही कर्ककारक असतात.

प्रतिप्राणिलीकारके आणि स्थैर्यकारके ही निर्मिती प्रक्रियांदरम्यान औष्णिक विघटन रोखण्यासाठीची सेंद्रिय आणि असेंद्रिय रसायने असतात.

अप्रत्यास्थ कचरा व्यवस्थापनाकरता व्यूहयोजना

अनेक राज्यांनी जाड पिशव्या वापरण्याचे आदेश दिलेले आहेत. घन-कचरा-ओघात अप्रत्यास्थ पिशव्यांचा प्रवाह मोठ्या प्रमाणात घटवता येऊ शकेल, कारण कचरा-चिवडणारे लोक पुनर्चक्रणार्थ त्या निराळ्या करण्यास तत्पर असतात. पातळ पिशव्यांना फारसे मूल्य नसते आणि म्हणून त्यांचे पृथक्करण अवघड ठरते. जर निष्ताण पिशव्यांची जाडी वाढवली, तर त्या महाग होतात आणि मग त्यांच्या वापरावर मर्यादा पडतात. अप्रत्यास्थ-निर्माता-समाजही कचरा-गोळा करण्याच्या आणि विल्हेवाट-प्रणालीत, विस्तारित-निर्माता-दायित्वाच्या तत्त्वानुसार समाविष्ट केला जाऊ शकतो.

अप्रत्यास्थ सामानवाहू पिशव्या, पाण्याच्या बाटल्या, अप्रत्यास्थ बटवे इत्यादी उकीरड्यावर टाकून देणे पालिकेच्या घन-कचरा-व्यवस्थापनास आव्हानच ठरलेले आहे. अनेक पहाडी राज्यांत (जम्मू आणि काश्मीर, सिक्कीम, पश्चिम बंगाल) अप्रत्यास्थ सामानावाहू पिशव्या, पाण्याच्या बाटल्या यांच्या पर्यटन स्थळी वापरावर बंदी घालण्यात आलेली आहे. हिमाचल प्रदेशात राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने सर्व राज्यभर, १५-०८-२००९ पासून अप्रत्यास्थ पदार्थांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतलेला आहे. हिमाचलप्रदेश जैव-विनाश-क्षम नसलेला कचरा (नियंत्रण) कायदा-१९९५ अंतर्गत हा निर्णय घेतलेला आहे.

केंद्र सरकारनेही देशात समित्या आणि दायित्व-बलांची स्थापना करून त्यांनी केलेल्या मुद्द्यांच्या अभ्यासाच्या आणि शिफारशींच्या आधारे अप्रत्यास्थ कचर्‍याने पर्यावरणास पोहोचवलेल्या हानीचा अंदाज घेतलेला आहे.

पर्यावरण आणि वन मंत्रालयाने, अप्रत्यास्थ सामानवाहू पिशव्या आणि धारके यांच्या नियमन आणि व्यवस्थापनार्थ, अप्रत्यास्थ-निर्माण-आणि-वापर-नियम-१९९९ आणि त्यातील पर्यावरण (संरक्षण) कायदा-१९८६ अंतर्गत केलेल्या २००३ सालच्या सुधारणा जारी केलेल्या आहेत. भारतीय-प्रमाणन-संस्थेने जैव-विनाश-क्षम अप्रत्यास्थ पदार्थांवर १० प्रमाणे जारी केलेली आहेत.

अप्रत्यास्थ पदार्थांना पर्याय

अप्रत्यास्थ-कागद-पिशव्यांच्या वापरास पर्यायी म्हणून, ताग किंवा कापड यांच्या पिशव्यांचा वापर, लोकप्रिय आणि आर्थिक प्रेरणांनी उद्युक्त केला गेला पाहिजे. मात्र, ह्याची दखल घ्यावी लागेल की कागदी पिशव्यांकरता झाडे तोडावी लागतात म्हणून त्यांचा वापर मर्यादित आहे. आदर्शतः जैव-विनाश-क्षम अप्रत्यास्थ पिशव्याच केवळ वापरल्या जाव्यात आणि असे अप्रत्यास्थ विकसित करण्याकरता संशोधन सुरूच आहे.




अल्फाबेटिकली रचलेले मूळ इंग्रजी शब्दांचे पर्यायी मराठी शब्द



अक्र
मूळ इंग्रजी शब्द
पर्यायी मराठी शब्द



Antioxidants
प्रतिप्राणिलीकारके
Art from the waste
कचर्‍यातून कला
Assess
अंदाज घेणे, मूल्यांकन करणे, किंमत ठरवणे
Bag
पिशवी
Bureau of Indian Standards (BIS)
भारतीय-प्रमाणन-संस्था
Carry bags
सामानवाहू पिशव्या
Chemical additives
भरीचे रासायनिक पदार्थ
Choke
तुंबणे, अवरुद्ध होणे, अडकणे
Colorants and pigments
रंगद्रव्ये
१०
Containers
धारके
११
Contamination
दुषित होणे, अशुद्ध होणे, मलीन होणे
१२
Crude oil
कच्चे (मातीचे, खनिज) तेल
१३
Elastic
प्रत्यास्थ, लवचिक, तन्य, ताणल्या जाऊ शकणारे
१४
Environmental hazard
पर्यावरणीय धोका
१५
Fiber
तंतू
१६
Fibrous material
तंतूमय पदार्थ
१७
Fillers
परिपूरके
१८
Flame retardant
ज्वालानिरोधक
१९
Ground water aquifers
भू-जल-आर्द्रक
२०
Harmful
अपायकारक, धोकादायक, हानीकारक
२१
Ideally
आदर्शतः
२२
Impervious
अभेद्य, अगम्य, हेकट
२३
Indiscriminate
तारतम्यविहीन, अविवेकी, भेदभावविरहित, सरसकट, विधिनिषेधशून्य
२४
Intrinsically
स्वभावतः
२५
Isomer
समपरिमाणिक
२६
Issue
मुद्दा
२७
Leaching
पाझरणे
२८
Littering
कचराकुंडीत टाकणे, उकीरडा करणे
२९
Metals
धातू
३०
Monomer
एकलपरिमाण
३१
Non-biodegradable
जैव-विनाश-क्षम नसलेल्या
३२
Notify
जारी करणे
३३
Petrochemicals
भू-तैल-रासायनिक
३४
Petrol
भूतेल, खनिज तेल
३५
Plastic
अप्रत्यास्थ, ताण दिल्यास कायमस्वरूपी विरूप होणारे
३६
Plastic
अप्रत्यास्थ
३७
Plastic Manufacture Association
अप्रत्यास्थ-निर्माता-समाज
३८
Plasticizers
अप्रत्यास्थकारके
३९
Pollution
प्रदूषण
४०
Polymer
बहुलपरिमाण
४१
Pose
उभा ठाकणे
४२
Recharging
पुनर्भारण
४३
Recycle
(वापरलेल्या वस्तुंचे) पुनर्चक्रण करा
४४
Reduce
काटकसर करा
४५
Reuse
पुन्हा वापरा
४६
Rock oil
मातीचे तेल
४७
Shortcomings
त्रुटी, उणीवा, कमी, कसर
४८
Stabilizers
स्थैर्यकारके
४९
Task force
दायित्व-बल
५०
Toxic
विषारी
५१
Waste
भंगार, कचरा, केर, टाकाऊ पदार्थ



अकारविल्हे रचलेले मूळ इंग्रजी शब्दांचे पर्यायी मराठी शब्द



अक्र
मूळ इंग्रजी शब्द
पर्यायी मराठी शब्द



अंदाज घेणे, मूल्यांकन करणे, किंमत ठरवणे
Assess
अपायकारक, धोकादायक, हानीकारक
Harmful
अप्रत्यास्थ, ताण दिल्यास कायमस्वरूपी विरूप होणारे
Plastic
अभेद्य, अगम्य, हेकट
Impervious
आदर्शतः
Ideally
उभा ठाकणे
Pose
एकलपरिमाण
Monomer
कचराकुंडीत टाकणे, उकीरडा करणे
Littering
कचर्‍यातून कला
Art from the waste
१०
कच्चे (मातीचे, खनिज) तेल
Crude oil
११
काटकसर करा
Reduce
१२
जारी करणे
Notify
१३
जैव-विनाश-क्षम नसलेल्या
Non-biodegradable
१४
ज्वालानिरोधक
Flame retardant
१५
तंतू
Fiber
१६
तंतूमय पदार्थ
Fibrous material
१७
तारतम्यविहीन, अविवेकी, भेदभावविरहित, सरसकट, विधिनिषेधशून्य
Indiscriminate
१८
तुंबणे, अवरुद्ध होणे, अडकणे
Choke
१९
तृटी, उणीवा, कमी, कसर
Shortcomings
२०
दुषित होणे, अशुद्ध होणे, मलीन होणे
Contamination
२१
धातू
Metals
२२
धारके
Containers
२३
नियुक्तबल
Task force
२४
अप्रत्यास्थ
Plastic
२५
अप्रत्यास्थकारके
Plasticizers
२६
अप्रत्यास्थ-निर्माता-समाज
Plastic Manufacture Association
२७
परिपूरके
Fillers
२८
पर्यावरणीय धोका
Environmental hazard
२९
पाझरणे
Leaching
३०
पिशवी
Bag
३१
पुनर्चक्रण करा
Recycle
३२
पुनर्भारण
Recharging
३३
पुन्हा वापरा
Reuse
३४
प्रतिप्राणिलीकारके
Antioxidants
३५
प्रत्यास्थ, लवचिक, तन्य, ताणल्या जाऊ शकणारे
Elastic
३६
प्रदूषण
Pollution
३७
बहुलपरिमाण
Polymer
३८
भंगार, कचरा, केर, टाकाऊ पदार्थ
Waste
३९
भरीचे रासायनिक पदार्थ
Chemical additives
४०
भारतीय-प्रमाणन-संस्था
Bureau of Indian Standards (BIS)
४१
भू-जल-आर्द्रक
Ground water aquifers
४२
भूतेल, खनिज तेल
Petrol
४३
भू-तैल-रासायनिक
Petrochemicals
४४
मातीचे तेल
Rock oil
४५
मुद्दा
Issue
४६
रंगद्रव्ये
Colorants and pigments
४७
विषारी
Toxic
४८
समपरिमाणिक
Isomer
४९
सामानवाहू पिशव्या
Carry bags
५०
स्थैर्यकारके
Stabilizers
५१
स्वभावतः
Intrinsically


संदर्भ: पत्र-सूचना-कार्यालय-भारत-सरकार

२ टिप्पण्या:

Unknown म्हणाले...

बहुमोल माहिती सांगितलीस

ऊर्जस्वल म्हणाले...

धन्यवाद राहूल!

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.