२०१२-०३-३०

काही संस्कृत श्लोकांचे मी केलेले अनुवाद

१. 
न त्वहं कामये

मूळ संस्कृतः
न त्वहं कामये राज्यं न स्वर्गं नापुनर्भवं ।
कामये दुखतप्तानां‌ प्राणिनां आर्तिनाशनम्‌ ॥ - राजा रंतीदेव

हिंदी अनुवादः
न राज्य चाहूँ, न स्वर्ग चाहूँ और न चाहूँ मोक्ष,
मैं तो चाहूँ, दुःखियों की पीडा होवै सभी खतम ।

मराठी अनुवादः
नको राज्य, नको स्वर्ग, 
नकोच मोक्षही  मला,
दुःखितांच्या नष्ट व्हाव्या, आर्ती सार्‍याच आजला.

English translation:
I desire neither kingdom nor heaven nor liberation,
I desire end of miseries for all the life on the earth.

२. 
उत्तानं शववत् भूमौ

मूळ संस्कृत: 
उत्तानं शववत् भूमौ, शयनं तत् शवासनम् । 
शवासनं श्रांतिहारं, चित्तविश्रांतिकारकम्  ॥ - अनुष्टुप्‌

मराठी अनुवाद: 
उताणे शववत् पडणे भूवरी, ते शवासन । 
शरीरा विश्रांती देते ते, मनाही शांती देतसे ॥ - अनुष्टुप्‌

३. 
उपसर्गेण धात्वर्थो

मूळ संस्कृत: 
उपसर्गेण धात्वर्थो बलादन्यत्र नीयते । 
प्रहाराहारविहार संहारपरिहारवत्‌ ॥ - अनुष्टुप्‌

मराठी अनुवाद: 
उपसर्गानि शब्दाचा बदले अर्थ तो पुरा । 
प्रहाराहारविहार संहारा परि तो स्मरा ॥ - अनुष्टुप्‌

४. 
अग्रतः चतुरो वेदः

मूळ संस्कृत: 
अग्रतः चतुरो वेदः पृष्ठतः सशरं धनु: । 
इदं ब्राह्मं इदं क्षात्रं शापादपि शरादपि ॥

मराठी अनुवाद: 
वाचासिद्ध वेद चार, धनुष्यबाण पाठिशी । 
सर्वोच्च शापशक्तीही, क्षात्रशक्ती परात्पर ॥

५. 
सा रम्या नगरी

मूळ संस्कृत:
सा रम्या नगरी महान्सनृपतिः सामन्तचक्रं च तत् 
पार्श्वे तस्य च सा विदग्धपरिषत्ताश्चन्द्रबिम्बाननाः ।
उद्वृत्तः स च राजपुत्रनिवहस्ते बन्दिनस्ताः कथाः 
सर्वं यस्य वशादगात्स्मृतिपथं कालाय तस्मै नमः ॥

मराठी अनुवाद:
ती रम्या नगरी, महान नृपती, मंत्रीगणांची सभा 
ती विद्वानसभा, तशाच तेथील ललनाही चंद्रानना ।
तो गर्वोन्नत राजपुत्रही, तसे ते भाट, त्यांच्या कथा
ज्या काळे, स्मरणास योग्य रचिले, काळास त्या वंदु या ॥

६. 
यां चिन्तयामि सततं

मूळ संस्कृत:
यां चिन्तयामि सततं मयि सा विरक्ता 
साप्यन्यमिच्छति जनं स जनोऽन्यसक्तः ।
अस्मत्कृते च परिशुष्यति काचिदन्या
धिक् तां च तं च मदनं च इमां च मां च ॥ - वसंततिलका

मराठी अनुवाद:
मी ध्यातो जिस नेहमी, न तिजला मी आवडे स्वगृही
ज्याला ती भजते तयास, न रुचे ती, आवडे वेगळी ।
ती ला तो न रुचे, मदर्थ झुरुनी, ती टाकते जीवही
धिक्कारा तिजला, तयास, मजला, कामासही, हीस ही ॥ - शार्दूलविक्रीडित

मी जीस चिंतित असे, न रुचे तिला मी
जो आवडे तिजसि त्यास रुचे दुजी स्त्री ।
त्या स्त्रीस तो न रुचतो, मला वरे ती
धिक्‌ तीस, त्यास, मदनास, हिला, मलाही ॥ - वसंततिलका

७. 
कायेन वाचा

मूळ संस्कृत:
कायेन वाचा मनसेंद्रिर्येवा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिः स्वभावः ।
करोमि यद्‌ यद्‌ सकलं परस्मै नारायणाय च समर्पयामि ॥

मराठी अनुवाद:
तना मनाने वा इंद्रियाने, बुद्धी, हृदय वा असो स्वभावे ।
करेन जे मी सारेच ते ते, असो समर्पित नारायणा  ते ॥

८. 
या कुन्देन्दुतुषारहारधवला

या कुंदेंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता
या वीणावरदंडमंडितकरा या श्वेत पद्मासना ।
या ब्रम्हाच्युतशंकरप्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता
सा मां पातु सरस्वती भगवती निःषेश जाड्यापहा ॥ - शार्दूलविक्रीडित

कुंदाचंद्रतुषारहारसमशा वस्त्री रमे श्वेतशा
वीणा वादन जी स्वये करतसे पद्मातही श्वेतशा ।
जी पूज्या विधि-विष्णु-शंकर अशा देवांसही तत्त्वता
रक्षो ती मज शारदा हरवु दे निर्बुद्धता पूर्णतः ॥  - शार्दूलविक्रीडित

९. 
पिण्डे पिण्डे मतिर्भिन्ना 

पिण्डे पिण्डे मतिर्भिन्ना कुण्डे कुण्डे नवं पयः ।
जातौ जातौ नवाचारा नवा वाणी मुखे मुखे ॥ - अनुष्टुप्‌

व्यक्ती व्यक्ती नवी बुद्धी, कुंडे कुंडे नवे जल 
प्रत्येकी वागणे भिन्न, नवी भाषा मुखे मुखे ॥ - अनुष्टुप्‌


१०.
यावत्‌ स्वस्थमिदं कलेवरगृहं यावच्च दूरे जरा
यावच्चेन्द्रियशक्तिरप्रतिहता यावत्‌ क्षयो नायुषः ।
आत्मश्रेयसि तावदेव विदुषा कार्यः प्रयत्नो महान्‌ 
प्रोद्दिप्ते भवनेच कूपखननं प्रत्युद्द्यमः किदृशः ॥ 
- शार्दूलविक्रीडित

भर्तृहरी, वैराग्य शतक, श्लोक-७५

जेव्हा स्वस्थ शरीर हे असतसे, जेव्हा न आली जरा
जेव्हा चालत हातपाय सगळे, र्‍हासा न झाली त्वरा ।
तेव्हा श्रेयस कार्य, शक्य सगळे, साधून घे माणसा
लागे आग घरास, खोदुन तदा, कूपास का फायदा ॥ - शार्दूलविक्रीडित

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१७०५०४

११.
सत्यं ब्रूयात् प्रियं ब्रूयात् न ब्रूयात् सत्यमप्रियम् ।
नासत्यं च प्रियं ब्रूयात् एष धर्मः सनातनः ॥ - अनुष्टुप्‌
भद्रं भद्रमिति ब्रूयाद भद्रमित्येव वा वदेत् ।
शुष्कवैरं विवादं च न कुर्यात केनचित्सह ॥ - अनुष्टुप्‌

स्वायंभुव मनुस्मृती, ४-१३८, १३९

सत्य बोला, प्रिय बोला, न बोला सत्य अप्रिय ।
खोटे प्रियहि ना बोला, हाच धर्म सनातन ॥ - अनुष्टुप्‌
नेहमी शुभ बोलावे, बोलावे शुभची सदा ।
व्यर्थची वैर वादंग, कुणाशीही करू नये ॥ - अनुष्टुप्‌

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२०१२०५

१२.
शशी दिवसधूसरो गलितयौवना कामिनी
सरो विगतवारिजं मुखमनक्षरं स्वाकृतेः 
प्रभुर्धनपरायणा: सततदुर्गतः सज्जनो 
नृपांगणगतः खलो मनसि सप्त शल्यानि मे ॥ - पृथ्वी, 

भतृहरी, इ.स.पूर्व ५५४ वर्षे,

शशांक दिवसा फिका, सरत यौवना सुंदरा
सरोवर जलाविना, निरक्षरास सौंदर्य का 
कुबेर धन लोभला, सतत नाडली सभ्यता 
वसे खल नृपाघरी, खुपत सात शल्ये मला ॥ - पृथ्वी

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१६१२२५

१३.
अयं बन्धुरयं नेतिगणना लघुचेतसाम् ।
उदारचरितानां तु वसुधैव कुटुम्बकम् ॥ - अनुष्टुप छंद

महोपनिषद्, अध्याय ४, श्‍लोक ७१

हा भाऊ, दुजा नाही, कूपमंडूक कल्पना ।
उदारमनस्कांना विश्व परिवार आपला ॥ - अनुष्टुप छंद

मराठी अनुवाद: नरेंद्र गोळे २०१७०९२२

१४.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः ।
गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ॥ - अनुष्टुप्‌

वेदव्यासरचित, गुरूगीता ५८/३५२, स्कंदपुराण


गुरू ब्रम्हा, गुरू विष्णू, गुरू देव महेश्वर ।
गुरू साक्षात परब्रम्ह, म्हणून गुरू वंदू या ॥ 
- अनुष्टुप्‌

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१८०११२


१५.
सर्वे भवन्तु सुखिनः। सर्वे सन्तु निरामयाः
सर्वे भद्राणि पश्यन्तु । मा कश्चित् दुःख भाग्भवेत् ॥ - अनुष्टुप्‌

ऋग्वेद

सारेच सुखी होवोत, सारे होवो निरामय ।
सारेच व्हावे खुशाल, दुःखी कुणी होऊ नये ॥ 
- अनुष्टुप्‌

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१८०११२


१६.
षट्‍ दोषाः पुरूषेणेह हातव्या भूतिमिच्छता
निद्रा तन्द्रा भयं क्रोधं आलस्यं दीर्घसूत्रता ॥ - अनुष्टुप्‌

उन्नती चाहणार्याने, त्यागावे दोष हे सहा
निद्रा, तंद्रा, तशी भीती, राग, आळस, मंदता ॥ - अनुष्टुप्‌

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१८०११२


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.