२०२५-१०-१२

गीतानुवाद-३१६: मुसाफिर हूँ यारों

मूळ हिंदी गीतः गुलजार, संगीतः राहूलदेव बर्मन, गायकः किशोरकुमार
चित्रपटः परिचय, सालः १९७२, भूमिकाः जितेंद्र 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२५१०१२

 

धृ

मुसाफिर हूँ यारो
न घर है ना ठिकाना
मुझे चलते जाना है
बस चलते जाना

मित्र हो प्रवासी मी
ना ठाव आहे ना ठिकाणा
चालतच राहणे मला
फक्त राहणे चालतच

एक राह रुक गयी
तो और जुड़ गयी
मैं मुड़ा तो साथ साथ
राह मुड़ गई
हवा के परों पे मेरा आशियाना

एक वाट थांबली
तर दुसरी लाभली
वळलो मी तिथे तिथे
वळली वाटही
हवेच्या पंखांवरच राहे मी पुरा

दिन ने हाथ थाम कर
इधर बिठा लिया
रात ने इशारे से
उधर बुला लिया
सुबह से शाम से मेरा दोस्ताना

दिसाने धरून हात मज
इथेच बसवले
रातीने इशार्‍याने
मज तिथे हाकारले
मैत्री माझी उदयाशी अस्ताशीही असे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.