मूळ हिंदी गीतः गुलजार, संगीतः हेमंतकुमार, गायकः
हेमंतकुमार
चित्रपटः खामोशी, सालः १९६९, भूमिकाः वहिदा रेहमान, धर्मेंद्र
धृ
|
तुम पुकार लो तुम्हारा इंतजार है तुम पुकार लो ख्वाब चुन रही है रात बेकरार है तुम्हारा इंतजार है तुम पुकार लो
|
बोलावून घे वाट तुझीच आहे बोलावून घे स्वप्न निवडते ही रात फार अधीर आहे वाट तुझीच आहे बोलावून घे
|
१
|
होठपर लिये हुए दिल की बात हम जागते रहेंगे और कितनी रात हम मुख्तसरसी बात है तुमसे प्यार है तुम्हारा इंतजार है तुम पुकार लो
|
ओठांवर मनातले गूज घेऊनी जागू आणखी किती सारी रात मी स्पष्ट गोष्ट हीच आहे तुजसी प्रीत आहे वाट तुझीच आहे बोलावून घे
|
२
|
दिल बहल तो जायेगा इस खयाल से हाल मिल गया तुम्हारा अपने हाल से रात ये करार की बेकरार है तुम्हारा इंतजार है तुम पुकार लो
|
स्वस्थ मन तर होईलच या विचाराने तुझीही गोष्ट तीच आहे माझी जी आहे रात धीराचीच ही ती अधीर आहे वाट तुझीच आहे बोलावून घे
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या
जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या
वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या
गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या
- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.