मूळ हिंदी गीतः हसरत जयपुरी, संगीतः शंकर जयकिसन, गायकः लता
चित्रपटः राजकुमार, सालः १९६५, भूमिकाः साधना, शम्मीकपूर
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२५०११२
धृ
|
आ जा आई बहार दिल है बेक़रार ओ मेरे राजकुमार, तेरे
बिन रहा न जाए
|
ये रे आली बहार मन हे बेचैन रे माझ्या राजकुमार, तुजविण रहावत ना
|
१
|
जुल्फ़ों से जब भी, चले
पुरवाई तन मेरा टूटे आयी अंगड़ाई देखूँ बार बार, तेरा इन्तज़ार ओ मेरे राजकुमार, तेरे
बिन रहा न जाए
|
केसांतून जेव्हा, वाहे हवा ही तन माझे फिरते घेते अन् गिरकी पाहू वारंवार, वाट तुझी राजसा राजकुमार, तुजविण रहावत ना
|
२
|
मन मे सुनू मैं, तेरी
मुरलिया नाचूँ मैं छम-छम बाजे पायलिया दिल का तार-तार तेरी करे पुकार ओ मेरे राजकुमार, तेरे
बिन रहा न जाए
|
मनातच ऐकू, मुरली तुझी रे नाचू मी छाम छम वाजे पायल ही मनाची, गुंजे तार तुज पुकारे, रे माझ्या राजकुमार, तुजविण रहावत ना
|
३
|
जल की मछरिया, जल
मे है प्यासी खुशियों के दिन हैं फिर भी उदासी लेकर मेरा प्यार, आ
जा अब के बार ओ मेरे राजकुमार, तेरे
बिन रहा न जाए
|
मासोळी जळीची, तहानली त्यातच खुशीचे हे दिस परी तरीही उदासी घेऊन माझे प्रेम, ये रे आता तरी, राजसा राजकुमार, तुजविण रहावत ना
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या
जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या
वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या
गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या
- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.