२०२४-०५-०१

गीतानुवाद-२८९: पंछी बनू उडती फिरू

मूळ हिंदी गीतः हसरत जयपुरी, संगीतः शंकर जयकिसन, गायकः लता
चित्रपटः चोरीचोरी, सालः १९५६, भूमिकाः नर्गिस, राज कपूर

 

धृ

पंछी बनूँ उड़ती फिरूँ मस्त गगन में
आज मैं आज़ाद हूँ दुनिया के चमन में
हिल्लोरी.. हिल्लोरी, हिलो हिलो हिलो री

पक्षी बनू उडत फिरू मस्त गगनि मी
आज मी स्वतंत्र आहे संसार उपवनी
हिल्लोरी.. हिल्लोरी, हिलो हिलो हिलो री

ओ मेरे जीवन मे चमका सवेरा
ओ मिटा दिल से वो गम का अंधेरा
ओ हरे खेतों में गाए कोई लहरा
ओ यहाँ दिल पर किसी का न पहरा
रंग बहारों, ने भरा, मेरे जीवन में

ओ माझ्या आयुष्यात झाली पहाट
ओ मिटले दुःख, गेली अंधारी वाट
ओ हिरव्या शेतात गातो कुणी वारा
ओ मनावर नाही कुणाचाच पाहरा
रंग बहारींनी, दिला, माझ्या जीवनी

ओ दिल ये चाहे बहारों से खेलूँ
ओ गोरी नदिया की धारों से खेलूँ
ओ चाँद सूरज सितारों से खेलूँ
ओ अपनी बाहों में आकाश ले लूँ
बढ़ती चलूँ, गाती चलूँ, अपनी लगन में

ओ मला वाटे बहारींशी खेळू
ओ शुभ्र नदीच्याही धारेशी खेळू
ओ चंद्र सूर्य आणि तार्‍यांशी खेळू
ओ सारे आकाशच बाहूंत घेऊ
पुढती चलू, गात फिरू, अंतःस्फूर्तीनी

ओ मैं तो ओढूँगी बादल का आँचल
ओ मैं तो पहनूँगी बिजली की पायल
ओ छीन लूँगी घटाओं से काजल
ओ मेरा जीवन है नदिया की हलचल
दिल से मेरे, लहरें उठे, ठंडी पवन में

ओ पदर मेघाचा का मी न ओढू
ओ पायी पैंजण का बिजलीचे घालू
ओ निशेचे हिसकीन काळे मी काजळ
ओ माझे जीवन ही सरितेची सळसळ
उसळवती, मनी लहरी, गार झुळुकी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.