२०२३-०९-१९

गीतानुवाद-२८१: हम से आया न गया

मूळ हिंदी गीतः राजिंदर कृष्ण, संगीतः मदन मोहन, गायकः तलत महमूद
चित्रपटः देख कबीरा रोया, सालः १९५७, भूमिकाः अनूप कुमार 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२३०८१३


धृ

हम से आया न गया
तुम से बुलाया ना गया
फ़ासला प्यार में
दोनों से मिटाया ना गया

मला येता न आले
तुलाही न पुकारता आले
अंतर प्रेमातही
दोन्हीकडून ना मिटले

 वो घड़ी याद है जब
तुम से मुलाक़ात हुई
एक इशारा हुआ
दो हाथ बढ़े बात हुई
देखते देखते दिन ढल गया
और रात हुई
वो समां आज तलक
दिल से भुलाया ना गया
हम से आया न गया

ते आठवते जेव्हा
भेट तुझ्याशी झाली
एक संकेत झाला
हात हातातही आले
पाहता पाहता दिस ढळला
आणि रात झाली
ते सारे आजवर
न मनातून गेले
मला येता न आले

क्या ख़बर थी के मिले हैं
तो बिछड़ने के लिये
क़िस्मतें अपनी बनाईं हैं
बिगड़ने के लिये
प्यार का बाग बसाया था
उजड़ने के लिये
इस तरह उजड़ा के फिर
हम से बसाया ना गया
हम से आया न गया

काय माहीत होते जे भेटलो
ते दुरावण्यासाठी
दैवे आपली ती घडवलेली
विखुरण्यासाठी
प्रेमाची बाग वसवलेली
जणू सुकण्यासाठी
सुकली अशी की पुन्हा
बहारीचे ना दिवस आले
मला येता न आले

याद रह जाती है और
वक़्त गुज़र जाता है
फूल खिलता है मगर
खिल के बिखर जाता है
सब चले जाते हैं फिर
दर्दे जिगर जाता है
दाग़ जो तूने दिया
दिल से मिटाया ना गया
हम से आया न गया

याद राहून जाते पण
काळ निघूनच जातो
फूल फुलते तरी
फुलून सुकुनही जाते
सारे जातात
अखेरीस दुःखही जाते
मात्र जे व्रण तू दिले
ते न पुसता आले
मला येता न आले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.