२०२३-०९-१८

गीतानुवाद-२८०: न किसी की आँख का

मूळ हिंदी गीतः बहादुरशहा जफर, संगीतः एस.एन. त्रिपाठी, गायकः महम्मद रफी
चित्रपटः लाल किला, सालः १९६०, भूमिकाः जयराज, निरुपमा 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२३०९१८

 

धृ

न किसी की आँख का नूर हूं
न किसी के दिल का करार हूं
जो किसी के काम न आ सके
मै वो एक मुश्ते-गुबार हूं

न कुणाच्या नेत्रिची दीप्ति मी

न कुणाच्या मनचा सुधीर मी

जो कुणाच्या कामी न येतसे

मुठभरशा धुळीचा धुराळ मी

न तो मै किसी का हबीब हूं
न तो मै किसी का रकीब हूं
जो बिगड गया वो नसीब हूं
जो उजड गया वो दयार हूं

न मी कुणाचाही मित्र आहे
न स्पर्धक कुणाचाही मी आहे
मी बिघडले नशीब आहे
उजाड अन्‌ मी निवासही

मेरा रंग रूप बिगड गया
मेरा यार मुझसे बिछड गया
जो चमन खिजॉ से उजड गया
मै उसी की फस्ले बहार हूं

माझा रूपरंग उजाडला

माझा मित्र संग न राहिला

जे फूल अकाली कोमेजले

त्याच्या मी बहारीची सुगी

पा-ए-फातहा कोई आये क्यो
कोई चार फूल चढाये क्यो
कोई आ के शम्मा जलाये क्यू
(जफर अश्क कोई बहाये क्यु)
मै तो बेकसी का मजार हूं

मृतास शांती प्रार्थिल का

फुले चार त्यास वाहील का

वा येऊन दीप लावील का

(जफर अश्रु उगा ढाळील का)

एक असहाय्यतेची समाधी मी

मै नही हूं नग्मा-ए-जॉफिजा
मुझे सुन के कोई करेगा क्या
मै बडे विरॉन की हूं सदा
मै बडे दुखों की पुकार हूं

न मी गीत आनंदाचे असे

मला ऐकून कोण करेल काय
वैराण ओसाडीचा मी स्वर
मी खूप दुःखाची साद आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.