मूळ हिंदी गीतः हसरत जयपुरी, संगीतः , गायकः मुकेश
चित्रपटः आवारा, सालः १९५१, भूमिकाः राज कपूर
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२२०१३०
धृ
|
आवारा हूँ आवारा हूँ या गर्दिश में हूँ आसमान का तारा हूँ
|
भटकाच मी भटकाच मी संकटी असे वा आकाशीचा तारा मी
|
१
|
घर बार नहीं, संसार नहीं मुझसे किसी को प्यार
नहीं उस पार किसी से मिलने का इकरार नहीं मुझसे किसी को प्यार
नहीं सुनसान नगर अनजान डगर का प्यारा हूँ
|
घरदार नसे, संसार मला प्रीती न मजवरती कोणा वायदा न भेटण्या त्या पार कुणा प्रीती न मजवरती कोणा वैराण नगर अपरिचित पथा आवडता मी
|
२
|
आबाद नही, बर्बाद सही गाता हूँ खुशी के गीत
मगर जख्मों से भरा सीना है
मेरा हंसती है मगर ये मस्त
नजर दुनिया मै तेरे तीर का या तकदीर का मारा हूँ
|
वसलो न मी, विस्कटलो मी तरी गातो गीत मजेत मी छातीभर घावच मम वक्षी आनंदी तरी ही मम दृष्टी तीराचा बळी जगाच्या मी खातो दैवाचा तडाखा मी
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या
जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या
वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या
गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या
- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.