२०२२-११-०८

गीतानुवाद-२५३: आज की रात पिया

मूळ हिंदी गीतः साहिर लुधियानवी, संगीतः सचिनदेव बर्मन, गायकः गीता दत्त
चित्रपटः बाझी, सालः १९५१, भूमिकाः गीता बाली, कल्पना कार्तिक, देव आनंद 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२२११०८

धृ

आज की रात पिया दिल न तोड़ो
मन कि बात पिया मान लो

आजच्या रात्री प्रिया नको मन मोडू
मनची गोष्ट प्रिया मान तू

दिल की कहानी अपनी ज़ुबानी
तुम को सुनाने आयी हूँ
आँखों में लेके सपने सुहाने
अपना बनाने आयी हूँ
छोड़के साथ पिया मूँह न मोड़ो

मनची कहाणी सांगते वाणी
सांगण्या आले तुला मी
डोळ्यांत सुंदर स्वप्ने घेऊन
आपला करण्या आले मी
सोडून साथ तू फिरव न तोंड

चन्दा भी देखे तारे भी देखे
हमको गगन की ओट से
घायल किया है दिल तुमने मेरा
मीठि नज़र की चोट से
थाम के हाथ पिया यूँ न छोड़ो

चंद्र पाहतो, तारेही पाहती
आपल्याला आकाशातून
जखमी केलेस तू मन हे माझे
घावाने मधुर दृष्टीच्या
हाती घेऊन हात, नकोस सोडू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.