२०२२-११-०२

गीतानुवाद-२५२: ना तो कारवां की तलाश है

मूळ हिंदी गीतः साहिर लुधियानवी, संगीतः रोशन,
गायकः मो.रफी
, मन्ना डे, बतिश, आशा भोंसले, सुधा मल्होत्रा
चित्रपटः बरसात की रात, सालः १९६०, भूमिकाः मधुबाला भारतभूषण 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२२०६०८

 

धृ

ना तो कारवां की तलाश है
ना तो हमसफ़र की तलाश है
मेरे शौक़-ए-खाना ख़राब को
तेरी रहगुज़र की तलाश है
मेरे नामुराद जनून का
है इलाज कोई तो मौत है
जो दवा के नाम पे ज़हर दे
उसी चारागार की तलाश है

ना थव्याचा शोध आहे
ना सोबत्याचा शोध आहे
माझ्या ईप्सिताला आता
तुझ्या मार्गाचा शोध आहे
दुर्दैवी माझ्या खुळाचा असेल
उपाय काही तर अंत आहे
औषधाच्या नावे जो विष दे
त्या वैद्यबुवाचा शोध आहे

तेरा इश्क है मेरी आरज़ू
तेरा इश्क है मेरी आबरू
दिल इश्क जिस्म इश्क है
और जान इश्क है
ईमान की जो पूछो तो
ईमान इश्क है
तेरा इश्क है मेरी आबरू
मेरी उम्र भर की तलाश है
ये इश्क इश्क है इश्क इश्क
ये इश्क इश्क है इश्क इश्क
जाँ-सोज़ की हालत को
जाँ-सोज़ ही समझेगा
मैं शमा से कहता हूँ
महफ़िल से नहीं कहता, क्योंकि
ये इश्क इश्क है इश्क इश्क
ये इश्क इश्क है इश्क इश्क
सहर तक सबका है अंजाम
जल कर ख़ाक हो जाना
भरी महफ़िल में कोई शमा
या परवाना हो जाए, क्योंकि
ये इश्क इश्क है इश्क इश्क
ये इश्क इश्क है इश्क इश्क

तुझे प्रेम माझी कामना
तुझे प्रेम माझी आबरू
हृदय प्रेम आहे, शरीर प्रेम आहे
आणि प्राणही प्रेम आहे
निष्ठा विचाराल तर
तीही प्रेमच आहे
तुझे प्रेम माझी आबरू
माझा जीविताचा शोध आहे ते
हे प्रेम प्रेम आहे प्रेम प्रेम
हे प्रेम प्रेम आहे प्रेम प्रेम
प्रेम करणाराच प्रेम करत्याची
स्थिती जाणू शकतो
म्हणून मी ज्योतीस म्हणतो
मैफिलीस नाही, कारण
हे प्रेम प्रेम आहे प्रेम प्रेम
हे प्रेम प्रेम आहे प्रेम प्रेम
सकाळपर्यंत सगळ्यांचीच परिणती
राख होण्यात होणार आहे
मग मैफिलीत कुणी ज्योत असो
वा पतंग, कारण
हे प्रेम प्रेम आहे प्रेम प्रेम
हे प्रेम प्रेम आहे प्रेम प्रेम

वहशत-ए-दिल रस्म-ओ-दार
से रोकी ना गई
किसी खंजर, किसी तलवार से
रोकी ना गई
इश्क मजनू की वो आवाज़ है
जिसके आगे
कोई लैला किसी दीवार से
रोकी ना गई, क्योंकि
ये इश्क इश्क है इश्क इश्क
ये इश्क इश्क है इश्क इश्क
वो हँस के अगर मांगे
तो हम जान भी दे दें
हाँ ये जान तो क्या चीज़ है
ईमान भी दे दें, क्योंकि
ये इश्क इश्क है इश्क इश्क
ये इश्क इश्क है इश्क इश्क

प्रेम उन्माद
प्राणभयाने ना ठरे
नाही खंजीर, वा तलवारही
रोखू त्या शके
प्रेम मजनूची आहे साद ही
जिच्यापुढती
कुणी लैला, कुणा भिंतीने
रोखली ना गेली
हे प्रेम प्रेम आहे प्रेम प्रेम
हे प्रेम प्रेम आहे प्रेम प्रेम
ती मागेल हसून जर
तर मी प्राणही देईन
प्राणच हा काय महान
मी तर निष्ठाही वाहीन
हे प्रेम प्रेम आहे प्रेम प्रेम
हे प्रेम प्रेम आहे प्रेम प्रेम

नाज़-ओ-अंदाज़ से कहते हैं
कि जीना होगा
ज़हर भी देते हैं तो कहते हैं
कि पीना होगा
जब मैं पीता हूँ तो कहते हैं
कि मरता भी नहीं
जब मैं मरता हूँ तो कहते हैं
कि जीना होगा
ये इश्क इश्क है इश्क इश्क
ये इश्क इश्क है इश्क इश्क

मोठ्या तोर्‍यात सांगे ती
जगलेच पाहिजे
विष देईल जर तर तेही
प्यायलेच पाहिजे
मी जर प्यालो तर म्हणते की
हा मरत का नाही
मी जर मरतो तर म्हणते
की जगले पाहिजे
हे प्रेम प्रेम आहे प्रेम प्रेम
हे प्रेम प्रेम आहे प्रेम प्रेम

मज़हब-ए-इश्क की हर रस्म कड़ी होती है
हर कदम पर कोई दीवार खड़ी होती है
इश्क आज़ाद है
हिंदू ना मुसलमान है इश्क
आप ही धर्म है और
आप ही ईमान है इश्क
जिससे आगाह नहीं
शेख-ओ-बरहामन (ब्राह्मण) दोनों
उस हक़ीक़त का
गरजता हुआ ऐलान है इश्क

प्रेमधर्माची हर प्रथा खूप कठोर असते
पावलापावलावर भिंतच जणू उभी असते
प्रेम हे मुक्त आहे
ना हिंदू ना मुसलमान आहे प्रेम
स्वतःच धर्म आहे अन्‌
स्वतःच निष्ठा आहे प्रेम
जे न माहीत
शेख वा ब्राह्मणालाही
त्या वास्तवाची
गरजती घोषणा आहे प्रेम

इश्क ना पुच्छे दीन धर्म नु
इश्क ना पुच्छे ज़ातां
इश्क दे हाथों गरम लहू विच
डूबियाँ लाख बराताँ
के ऐंवे इश्क
ये इश्क इश्क है इश्क इश्क
ये इश्क इश्क है इश्क इश्क
राह उल्फ़त की कठिन है
इसे आसाँ न समझ, क्योंकि
ये इश्क इश्क है इश्क इश्क
ये इश्क इश्क है इश्क इश्क

प्रेम विचारे न पंथ धर्म
कधी प्रेम विचारे न जाती
प्रेमाचे हाती गरम रक्त
जे बुडवित लाख वराती
कारण हे प्रेम
हे प्रेम प्रेम आहे प्रेम प्रेम
हे प्रेम प्रेम आहे प्रेम प्रेम
प्रेमाचा पंथ कठिण आहे
सोपा न समज, कारण
हे प्रेम प्रेम आहे प्रेम प्रेम
हे प्रेम प्रेम आहे प्रेम प्रेम

बहुत कठिन है, डगर पनघट की
अब क्या भर लाऊँ मैं जमुना से मटकी
देखो मैं जो चली जल जमुना भरन को
नंद को छोरो मोहे रोके झाड़ो तो
क्या भर लाऊँ मैं जमुना से मटकी
अब लाज राखो मोरे घूंघट पट की

खूप कठिण आहे जीवनपथही
काय भरू मी यमुनाजलही
सखी ग जशी मी चालले पाणी भराया
नंदकुमार मज रोखत आला
कशी मी आता पाणी भरू ग
आता राख लाज तू मम पदराची

जब-जब कृष्ण की बंसी बाजी
निकली राधा सज के
जान अजान का ध्यान भुला के
लोक लाज को तज के
बन-बन डोली जनक दुलारी
पहन के प्रेम की माला
दर्शन जल की प्यासी मीरा
पी गई विष का प्याला
और फिर अरज करी के
लाज राखो राखो राखो
ये इश्क इश्क है इश्क इश्क
ये इश्क इश्क है इश्क इश्क

जव जव कृष्णाची वाजली वंशी
निघाली राधा नटून सजून
जाण अजाण ध्यान ना मानून
लोकलाजही त्यागून
वन वन फिरली जनकदुहिता
वरता परमपतीला
दर्शनजला तहानली मीरा
प्याली विषभर प्याला
आणि मग म्हणू लागली की
लाज राख तू लाज राख तू
हे प्रेम प्रेम आहे प्रेम प्रेम
हे प्रेम प्रेम आहे प्रेम प्रेम

अल्लाह-ओ-रसूल का फ़रमान इश्क है
यानि हदीस इश्क है, कुरान इश्क है
गौतम का और मसीह का अरमान इश्क है
ये कायनात जिस्म है और जान इश्क है
इश्क सरमद, इश्क ही मंसूर है
इश्क मूसा, इश्क कोहेतूर है
खाक को बुत, और
बुत को देवता करता है इश्क
इन्तिहाँ ये है कि बन्दे को
खुदा करता है इश्क
हाँ इश्क इश्क तेरा इश्क इश्क

ईश्वरी दुताचा हुकूम आहे प्रेम
म्हणजे हदीस व कुराण आहे प्रेम
गौतम आणि मसीह यांची इच्छा आहे प्रेम
हे जगच शरीर आहे आणि प्राण आहे प्रेम
प्रेम सरमद व मंसूर आहे
प्रेम मूसा आहे, प्रेम कोहेतूर आहे
मातीस मूर्ती आणि
मूर्तीस देवता घडवते प्रेम
परीक्षा तर ही आहे की
नराचा नारायण घडवते प्रेम
हो प्रेम प्रेम, तुझे प्रेम प्रेम

 

 

अक्र   मूळ उर्दू शब्द             पर्यायी हिंदी शब्द
     शौक़-ए-खाना ख़राब        प्राणप्रिया
     रहगुज़र                  जाण्याचा रस्ता
     नामुराद                  दुर्दैवी
     चारागर                  वैद्य
     जाँ-सोज़                 समदुःखी
६     जुनून, जनून              खुळ, वेड, छंद, नाद
     कोहेतूर                   ईश्वरदर्शन
८     जाँ-सोज़                  समदुःखी
     वहशत-ए-दिल             हृदय उत्तेजना
१०    रस्म-ओ-दार              फाशी
११    सरमद                   सूफी संत सरमद
१२    मंसूर                    सूफी संत मंसूर
१३    मूसा                     एक प्रमुख नबी
१४    हदीस                    पैग़म्बर यांचे विवरण
१५    मसीह                    यीशु मसीह 
१६    अल्लाह-ओ-रसूल           इस्लामचे पैग़म्बर 
१७    फ़रमान                  लिखित राजाज्ञा



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.