२०२१-११-३०

गीतानुवाद-२३३: जीवन ज्योत जले

मूळ हिंदी गीतः शकील बदायुनी, संगीतः रवी, गायकः आशा
चित्रपटः गृहस्थी, सालः १९६३,
भूमिकाः निरुपा रॉय, भारती मालवणकर, अशोककुमार, मनोजकुमार

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२१११३० 

धृ

जीवन ज्योत जले
कोउ न जाने कब निकसे दिन
और कब रात ढले

जीवन ज्योत जळे
कोणी न जाणे कधी दिस जातो
आणि कधी रात ढळे

भोर भए तो मन मुस्काए
साँझ भए तो नीर बहाए
एक पल मान करे संसारी
एक पल हाथ मले

पहाट होता मन खुश होई
संध्याकाळी मन अश्रू ढाळे
एक क्षणी मान मिळे संसारी
एक क्षणी तो न उरे

मनमाला मे डार वो मोती
जिस में जली हो प्रेम की ज्योती
उसी की नैया पार है जग में
जाके काज भले

मनमाळेत माळ तो मोती
ज्यात उजळली प्रीतीची ज्योती
त्याचीच नौका पार जगी हो
ज्याचे काम भले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.