२०२१-११-२६

गीतानुवाद-२३२: नैना बरसे

मूळ हिंदी गीतः राजा मेहंदी अली खान, संगीतः मदन मोहन, गायकः लता मंगेशकर
चित्रपटः वह कौन थी, सालः १९६४, भूमिकाः साधना, मनोजकुमार 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२१११२६

 

धृ

नैना बरसे, रिमझिम रिमझिम
पिया तोरे आवन की आस

डोळे झरती, रिमझिम रिमझिम
प्रिया तुझ्या येण्याचीच आस

वो दिन मेरी निगाहों में
वो यादें मेरी आहों में
ये दिल अब तक भटकता है
तेरी उल्फत की राहों में
सूनी सूनी राहें, सहमी सहमी बाहें
आँखों में है बरसों की प्यास

तो दिस माझ्या समोर आहे
ती सय माझ्या हृदी आहे
हे मन अजून भटकते रे
तुझ्या त्या धुंद वाटांवर
वैराणच त्या वाटा, व्यर्थ भेटीची आशा
डोळ्यांत आहे युगांची तहान

नज़र तुझ बिन मचलती है
मोहब्बत हाथ मलती है
चला आ मेरे परवाने
वफ़ा की शम्मा जलती है
ओ मेरे हमराही, फिरती हूँ घबरायी
जहाँ भी है आ जा मेरे पास

नजर तुजविण बिथरते रे
प्रीति ही निराश होते रे
परत माझ्या पतंगा ये
ज्योत प्रेमाची जळते रे
ये रे सोबत राजा, जीव घाबरे माझा
असशील तिथून निघूनी तू ये

अधूरा हूँ मैं अफसाना
जो याद आऊँ चले आना
मेरा जो हाल है तुझ बिन
वो आकर देखते जाना
भीगी भीगी पलकें, छम-छम आँसू छलकें
खोयी खोयी आँखें हैं उदास

अधुरे मी स्वप्नच आहे
आठवण येता निघून तू ये
माझी स्थिती काय आहे तुजविण
ती येऊन पाहुनी जाना
डोळे होती ओले, विरही आसू ढाळे
हरवलेले नेत्रही हे उदास

ये लाखों गम ये तन्हाई
मोहब्बत की ये रुसवाई
कटी ऐसी कई रातें
ना तुम आए ना मौत आई
ये बिंदिया का तारा, जैसे हो अंगारा
मेहंदी मेरे हाथों की उदास

ही लाखो दुःख, हा एकांत
प्रीती बदनाम का होत
गेल्या अशा रात्री काही
न तू येशी न मृत्यूही
भाळीचा हा टिळा, भासेतसे निखारा
मेंदी हाताचीही का उदास

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.