२०२१-१२-१९

गीतानुवाद-२३६: एक तू ना मिला

मूळ हिंदी गीतः इंदिवर, संगीतः कल्याणजी-आनंदजी, गायकः लता
चित्रपटः हिमालय की गोद में, सालः १९६५, भूमिकाः मनोजकुमार, माला सिन्हा 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२११२१९

 

धृ

एक तू ना मिला
सारी दुनिया मिले भी तो क्या है
मेरा दिल ना खिला
सारी बगिया खिले भी तो क्या है

मिळसी न तू
सारे जगही मिळून फायदा काय
बहरे ना हे मन
सारे उपवन बहरलेही तरी काय

धरती हूँ मैं और तू है गगन
होगा कहाँ तेरा मेरा मिलन
लाख पहेरे यहाँ
प्यार दिल में पले भी तो क्या हैं

मी धरती आहे आणि तू आहेस गगन
सांग होईल कुठे तुझे-माझे मिलन
लाख पहारे इथे
प्रेम रुजले मनातही तरी काय

तक़दीर की मैं कोई भूल हूँ
डाली से बिछड़ा हुआ फूल हूँ
साथ तेरा नहीं
संग दुनिया चले भी तो क्या है

कुठलीशी दैवाची मी चूक आहे
फांदीवरून खुडलेले फूल आहे
सोबत नाही तुझी
साथ जग चालले हे तरी काय

तुझसे लिपटकर जो रो लेते हम
आँसू नहीं थे ये मोती से कम
तेरा दामन नहीं
ये आँसू ढले भी तो क्या है

मी रडते गळ्यात घालुनी रे गळा
अश्रू ते मोतियांहून न मुळी कमी
तव आश्रयाविण
हे अश्रू ढळले तरी फायदा काय  


२०२१-१२-१८

गीतानुवाद-२३५: एक तू जो मिला

मूळ हिंदी गीतः इंदिवर, संगीतः कल्याणजी-आनंदजी, गायकः लता
चित्रपटः हिमालय की गोद में, सालः १९६५, भूमिकाः मनोजकुमार, माला सिन्हा

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२११२१८

 

धृ

एक तू जो मिला, सारी दुनिया मिली
खिला जो मेरा दिल, सारी बगिया खिली

एक तू भेटलास सारे जगच भेटले
बहरले माझे मन, उपवने बहरली

तू सूरज मैं सूरजमुखी हूँ पिया
ना देखूँ तुझे तो खिले ना जिया
तेरे रंग मैं रंगी मेरे दिल की कली

तू सूर्य मी सूर्यमुखी आहे प्रिया
न पाहीन तुला तर चैन ना मला
तुझ्या रंगात रंगली मनाची कळी

अनोखा हैं बंधन ये कँगन साजन
बिना डोर के बंध गया मेरा मन
तू जिधर ले चल मैं उधर ही चली

अनोखे हे बंधन आहे कंकण प्रिया
बिना दोरीने बांधते बघ मला
तू जिथे नेसी मज, जातसे तिथे मी

कभी जो ना बिछड़े वो साथी हूँ मैं
तू मेरा दिया तेरा बाती हूँ मैं
बुझाया बुझी जलाया जली

कधी ना सोडे जी, अशी मी सोबती
तू दीपक माझा, वात मी रे तुझी
विझवता मी विझे, उजळता पेटती

२०२१-१२-०१

गीतानुवाद-२३४: हे... निले गगन के तले

मूळ हिंदी गीतः साहिर लुधियानवी, संगीतः रवी, गायकः महेंद्र कपूर
चित्रपटः हमराज, सालः १९६७, भूमिकाः राजकुमार, सुनील दत्त, विम्मी, मुमताज 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२१११३०

 

धृ

हे... नीले गगन के तले
धरती का प्यार पले
ऐसे ही जग में
आती हैं सुबहें
ऐसे ही शाम ढले

हे... निळ्या नभाच्या तळी
धरतीचे प्रेम फुले
अशीच जगती
येते पहाट
अशीच सांज ढळे

शबनम के मोती
फूलों पे बिखरे
दोनों की आस फले

दवाचे मोती
फुलांवर तरती
दोघांची आशा फळे

बलखाती बेलें
मस्ती में खेलें
पेड़ों से मिलके गले

वळत्या या वेली
मस्तीत विहरती
वृक्षांना घेऊन कवेत

नदिया का पानी
दरिया से मिलके
सागर की ओर चले

नदीचे पाणी
होऊन दरिया
सागराकडे चालते

२०२१-११-३०

गीतानुवाद-२३३: जीवन ज्योत जले

मूळ हिंदी गीतः शकील बदायुनी, संगीतः रवी, गायकः आशा
चित्रपटः गृहस्थी, सालः १९६३,
भूमिकाः निरुपा रॉय, भारती मालवणकर, अशोककुमार, मनोजकुमार

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२१११३० 

धृ

जीवन ज्योत जले
कोउ न जाने कब निकसे दिन
और कब रात ढले

जीवन ज्योत जळे
कोणी न जाणे कधी दिस जातो
आणि कधी रात ढळे

भोर भए तो मन मुस्काए
साँझ भए तो नीर बहाए
एक पल मान करे संसारी
एक पल हाथ मले

पहाट होता मन खुश होई
संध्याकाळी मन अश्रू ढाळे
एक क्षणी मान मिळे संसारी
एक क्षणी तो न उरे

मनमाला मे डार वो मोती
जिस में जली हो प्रेम की ज्योती
उसी की नैया पार है जग में
जाके काज भले

मनमाळेत माळ तो मोती
ज्यात उजळली प्रीतीची ज्योती
त्याचीच नौका पार जगी हो
ज्याचे काम भले

२०२१-११-२६

गीतानुवाद-२३२: नैना बरसे

मूळ हिंदी गीतः राजा मेहंदी अली खान, संगीतः मदन मोहन, गायकः लता मंगेशकर
चित्रपटः वह कौन थी, सालः १९६४, भूमिकाः साधना, मनोजकुमार 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२१११२६

 

धृ

नैना बरसे, रिमझिम रिमझिम
पिया तोरे आवन की आस

डोळे झरती, रिमझिम रिमझिम
प्रिया तुझ्या येण्याचीच आस

वो दिन मेरी निगाहों में
वो यादें मेरी आहों में
ये दिल अब तक भटकता है
तेरी उल्फत की राहों में
सूनी सूनी राहें, सहमी सहमी बाहें
आँखों में है बरसों की प्यास

तो दिस माझ्या समोर आहे
ती सय माझ्या हृदी आहे
हे मन अजून भटकते रे
तुझ्या त्या धुंद वाटांवर
वैराणच त्या वाटा, व्यर्थ भेटीची आशा
डोळ्यांत आहे युगांची तहान

नज़र तुझ बिन मचलती है
मोहब्बत हाथ मलती है
चला आ मेरे परवाने
वफ़ा की शम्मा जलती है
ओ मेरे हमराही, फिरती हूँ घबरायी
जहाँ भी है आ जा मेरे पास

नजर तुजविण बिथरते रे
प्रीति ही निराश होते रे
परत माझ्या पतंगा ये
ज्योत प्रेमाची जळते रे
ये रे सोबत राजा, जीव घाबरे माझा
असशील तिथून निघूनी तू ये

अधूरा हूँ मैं अफसाना
जो याद आऊँ चले आना
मेरा जो हाल है तुझ बिन
वो आकर देखते जाना
भीगी भीगी पलकें, छम-छम आँसू छलकें
खोयी खोयी आँखें हैं उदास

अधुरे मी स्वप्नच आहे
आठवण येता निघून तू ये
माझी स्थिती काय आहे तुजविण
ती येऊन पाहुनी जाना
डोळे होती ओले, विरही आसू ढाळे
हरवलेले नेत्रही हे उदास

ये लाखों गम ये तन्हाई
मोहब्बत की ये रुसवाई
कटी ऐसी कई रातें
ना तुम आए ना मौत आई
ये बिंदिया का तारा, जैसे हो अंगारा
मेहंदी मेरे हाथों की उदास

ही लाखो दुःख, हा एकांत
प्रीती बदनाम का होत
गेल्या अशा रात्री काही
न तू येशी न मृत्यूही
भाळीचा हा टिळा, भासेतसे निखारा
मेंदी हाताचीही का उदास

२०२१-११-२४

गीतानुवाद-२३१: अटलजींच्या नऊ कवितांचे मराठी अनुवाद

 १.

 

आओ फिर से दिया जलाएँ

या हो पुन्हा दीप चेतवू

 

 

 

भरी दुपहरी में अंधियारा
सुरज परछाई से हारा
अन्तरतम का नेह निचोडे
बुझी हुई बाती सुलगाएँ

दिवसा उजेडी अंधःकार
सुर्याची सावलीशी हार
अंतरातली काजळी काढू
विझलेलीशी वात सावरू

हम पडाव को समझे मंझिल
लक्ष्य हुआ आखों से ओझल
वर्तमान के मोहजाल में
आनेवाला कल न भुलाएँ

मुक्कामच गंतव्य भासले
दृष्टिआड ते लक्ष्य जाहले
मोहमयी या जगी आजच्या
येणार्‍या 'उद्या'स न विसरू

आहुति बाकी यज्ञ अधुरा
अपनों के विघ्नों ने घेरा
अंतिम जय का वज्र बनाने
नव दधीचि हड्डियाँ गलाएँ

आहुति बाकी यज्ञ अपुरा
स्वजनांच्या विघ्नांचा घेरा
अंतीम विजयी वज्र साधण्या
नवदधिची तप लागले करू

२.

 

जीवन बीत चला

जीवनपट मिटला

कल कल करते आज
हाथसे निकले सारे
भूत भविष्यत् की चिंता में
वर्तमान की बाजी हारे
पहरा कोई काम न आया
रसघट रीत चला
जीवन बीत चला

नंतर, नंतर म्हणता गेले
पळ हातातील सारे
भूत भविष्याच्या चिंतेने
वर्तमान लढाई हारे
बंदोबस्त न कामी आला
जीवनरस सरला
जीवनपट मिटला

हानि-लाभ के पलडों में
तुलता जीवन व्यापार हो गया
मोल लगा बिकने वाले का
बिना बिका बेकार हो गया
मुझे हाट मे छोड अकेला
एक-एक कर मीत चला
जीवन बीत चला

ताजव्यात नुकसान-
नफ्याच्या जीवन ते तुळले
विकाऊ गेले विकले
बाकी कुचकामी ठरले
सोडून बाजारात मला
एक एक मम सुहृद गेला
जीवनपट मिटला

३.

 

हरी हरी दूब पर

हिरव्या हरळीवरील

 

 

 

हरी हरी दूब पर ओस की बूँदें
अभी थीं, अब नही हैं
ऐसी खुशियाँ जो हमेशा
हमारा साथ दें
कभी नहीं थीं कही नहीं है

हिरव्या हरळीवरचे दव ते
क्षणात दिसते, क्षणी हरपते
संगत आपली सदासर्वदा
करे असे सुख
कुठेही नाही, कधीही नव्हते

क्वाँर की कोख से फूटा बाल सूर्य
जब पूरबकी गोद में पाँव फैलाने लगा
तो मेरी बगीचे का
पत्ता-पत्ता जगमगाने लगा
मैं उगते सूर्य को नमस्कार करूँ
या उसके ताप से भाप बनी
ओस की बूँदों को ढूँढूँ

अरुणकमळ प्राचीवर फुलले
निजतेजाने तळपू लागले
मम बागेतील पानन् पान
सूर्यप्रभेने झळकू लागले
उगवत्या सूर्या मी नमन करू
की ते दवबिंदू हुडकू, जे
रवितेजाने लागले विरू

सूर्य एक सत्य है
जिसे झुठलाया नहीं जा सकता
मगर ओस भी तो एक सच्चाई है
यह बात अलग है कि ओस क्षणिक है
क्यों न मैं क्षण-क्षण को जीऊँ?
कण-कण में बिखरे सौंदर्य को पीऊँ?
सूर्य तो फिर भी उगेगा
धूप तो फिर भी खिलेगी
लेकिन मेरी बगीचे की हरी-हरी दूब पर
ओस की बूँदे हर मौसम में नहीं मिलेगी

 

सूर्य एक वास्तव आहे
ज्याची उपेक्षा करता येत नाही
पण दव हे ही एक वास्तवच आहे
हे खरे आहे की ते क्षणिक आहे पण
क्षण क्षण तेही जगुन, का न मी
त्या सौंदर्याचे रसपान करू
तळपतील ती उन्हे पुन्हा अन्
खचित सूर्य उगवेल पुन्हाही
पण मम बागेतील हरळीवरले ते दवबिंदू
प्रत्येक ऋतूत दिसतील, दिसणारही नाहीत

४.

 

गीत नया गाता हूँ

 

गीत नवे गातो मी

 

टूटे हुए तारों से फूटे वासन्ती स्वर
पत्थर की छाती में उग आया नव अंकुर
झरे सब पीले पात
कोयल की कुहुक रात
प्राची में अरुणिमा की रेख देख पाता हूँ
गीत नया गाता हूँ

तुटलेल्या तार्‍यातून उठे वासंतिक सूर
दगडाच्या काळजात उगवला नवा अंकूर
पानगळीत, रात्रीच
कोकीळकुहूक ऐकतो मी
पूर्वेला उदयाचे वेध पाहू शकतो मी
गीत नवे गातो मी

टूटे हुए सपने की सुने कौन सिसकी?
अन्तर को चीर व्यथा पलकों पर ठिठकी
हार नहीं मानुंगा
राह नई ठानुंगा
काल के कपाल पर लिखता, मिटाता हूँ
गीत नया गाता हूँ

तुटलेल्या स्वप्नांची ऐकतं कोण हाक?
अंतरव्यथेची आली पापण्यांवर झाक
हार न मानेन मी
वाट नवी रेखेन मी
काळाच्या कपाळावर लिहितो, पुसतो मी
गीत नवे गातो मी

५.

 

मोड़ पर

वळणावर

मुझे दूर का दिखाई देता है
मैं दीवार पर लिखा पढ सकता हूँ
मगर हाथ की रेखाएँ नहीं पढ पाता
सीमा के पार भड़कते शोले
मुझे दिखाई देते हैं
पर पाँवों के इर्द-गिर्द फैली
गर्म राख नजर नहीं आती
क्या मैं बूढा हो चला हूँ?

मला दूरचे दिसते
भिंतीवरलं मी वाचू शकतो
हातावरील रेषा मात्र वाचू शकत नाही
सीमेपारची आग
मला दिसते मात्र
पायतळीची गरम राख
मला दिसत नाही
काय मी म्हातारा होत आहे?

हर पचीस दिसम्बर को
जीने की एक नई सीढी चढता हूँ
नए मोड़ पर औरों से कम
स्वयं से ज्यादा लडता हूँ
मैं भीड़ को चुप करा देता हूँ
मगर अपने को जवाब नहीं दे पाता
मेरा मन मुझे अपनी ही
अदालत में खड़ा कर
जब जिरह करता है
मेरा हलफनामा मेरेही खिलाफ पेश करता है
तो मैं मुकदमा हार जाता हूँ
अपनीही नजर में गुनहगार बन जाता हूँ
तब मुझे कुछ दिखाई नहीं देता
न दूर का, न पास का
मेरी उम्र अचानक दस साल बढ जाती है
मैं सचमुच बूढा हो जाता हूँ

दर पंचवीस डिसेंबरला,
जीवनाची एक नवी पायरी चढतो
नव्या वळणावर इतरांशी कमी
स्वतःशीच जास्त लढतो
मी गर्दीला शांत करू शकतो
पण स्वतःला उत्तरे देऊ शकत नाही
माझं मन मला आपल्याच
दरबारात उभं करून
जेंव्हा उलटतपासणी करतं
माझ्याविरूद्ध आरोपपत्र ठेवतं
तेंव्हा मी खटला हरतो
आपल्याच नजरेत गुन्हेगार ठरतो
त्यावेळी, मला काहीच दिसत नाही
न दूरचं न जवळचं
माझं वय अचानक दहा वर्षांनी वाढतं
मी खरोखरच म्हातारा होतो

 

६.

 

गीत नहीं गाता हूँ
 

ओठात गाणे येत नाही

बेनकाब चेहरे हैं, दाग बडे गहरे हैं
टूटता तिलस्म, आज सच से भय खाता हूँ
गीत नहीं गाता हूँ

बुरखाविरहित चेहर्‍यांवर, कलंक गहिरे दिसतात
जादू संपलेल्या क्षणाला, भीती वाटते, सत्याचीही
ओठात गाणे येत नाही

लगी कुछ ऐसी नजर, बिखरा शीशे सा शहर
अपनों के मेले में, मीत नहीं पाता हूँ
गीत नहीं गाता हूँ

अशी ही दृष्ट लागलेली, शहर काचेगत फुटलेले
स्वकीयांच्या या गर्दीत, एक सुहृद मिळत नाही
ओठात गाणे येत नाही

पीठ में छुरी सा चाँद, राहू गया रेखा फाँद
मुक्ति के क्षणों में, बार बार बँध जाता हूँ
गीत नहीं गाता हूँ

चंद्र पाठीत सुरीसा आहे, राहू आडवा येत आहे
मुक्त होतो वाटतांनाच, पुन्हा बांधला जातो मी
ओठात गाणे येत नाही

७.

 

जंग न होने देंगे!
 

युद्ध न होऊ देऊ !

कभी न खेतों में फिर खूनी खाद फलेगी
खलिहानों में नहीं मौत की फसल खिलेगी
आसमान फिर कभी न अंगारे उगलेगा
एटम से नागासाकी फिर नहीं जलेगी
युद्धविहिन विश्व का सपना
भंग न होने देंगे

रक्त न पुन्हा मिळो भूमीला
मृत्यू न तांडव खेळो
आकाशी न फुलो वन्ही तो
नागासाकी न पुन्हा जळो
शांतविश्व स्वप्नाला
भंग न होऊ देऊ

हथियारों के ढेरों पर जिनका है डेरा
मुह में शांति, बगल में बम, धोके का फेरा
कफन बेचने वालों से कह दो चिल्ला कर
दुनिया जान गई है उनका असली चेहरा
कामयाब हो उनकी चालें
ढंग न होने देंगे

शस्त्रागारावर जे बसले
अस्त्रे डागून शांती जपले
जल्लादांचे ढोंग उकलले
त्यांचे चेहरे उघडे पडले
यशस्वी त्यांच्या चाली आता
आम्ही न होऊ देऊ

हमें चाहिए शांति, जिंदगी हमको प्यारी
हमें चाहिए शांति, सृजन की है तैयारी
हम ने छेडी जंग भूख से, बीमारी से
आगे आकर हाथ बटाए दुनिया सारी
हरी भरी धरती को
खूनी रंग न लेने देंगे

जीवनशांती आम्हा प्यारी
सृजनाची करतो तय्यारी
अनारोग्य, भुक या शत्रुंशी
सोबत लढते दुनिया सारी
हिरव्यागार धरित्रीला
रक्ताने रंगू न देऊ

भारत पाकिस्तान पडोसी, साथ साथ रहना है
प्यार करें या वार करें, दोनों को ही सहना है
तीन बार लड चुके लडाई
कितना महंगा सौदा
रुसी बम हो या अमरिकी
खून एक बहना है
जो हम पर गुजरी
बच्चों के संग न होने देंगे

भारत पाकी शेजारी, धरून राहणे म्हणून जरुरी
स्नेहभाव वा शत्रुभावना, तीही सोसणे भाग परी
तीन वेळ लढाई लढलो
महाग ठरला तो सौदा
स्फोटक रशियन वा अमेरिकी,
रक्त मात्र आपलेच सांडले
आम्हावर जे बेतून गेले
भावी पिढीला सोसू न देऊ

८. 

 

मौत से ठन गई!
 

काळाशी चकमक झाली!

 

ठन गई! मौत से ठन गई!
जूझने का मेरा कोई इरादा न था
मोड़ पर मिलेंगे इसका वादा न था
रास्ता रोक कर वह खड़ी हो गई
यों लगा जिन्दगी से बड़ी हो गई
मौत की उम्र क्या? दो पल भी नहीं
जिन्दगी- सिलसिला, आज कल की नहीं
मैं जी भर जिया, मैं मन से मरूँ
लौटकर आऊँगा, कूच से क्यों डरूँ?
तू दबे पाँव, चोरी-छिपे से न आ
सामने वार कर, फिर मुझे आजमा

चकमक झाली! काळाशी चकमक झाली!
माझा झुंजायचा उद्देश नव्हता
'पुन्हा भेटू !' हे आश्वासनही नव्हते
रोखूनच ठाकला वाटेत उभा तो
जीवनाहून झाला जणू थोर तो
काळाचे वय दो पळांचेही नाही
जीवनसबंध, आज कालचा नाही
मनःपूत जगलो, मनाने मरावे
फिरून येईन, जाण्यास का डरावे?
तू दबकत दबकत, येऊ नको
समोरून वार कर, मग मला पारख

 

मौत से बेखबर, जिन्दगी का सफर
शाम हर सुरमई, रात बंसी का स्वर
बात ऐसी नहीं की, कोई गम हीं नहीं
दर्द अपने-परायें, कुछ कम भी नहीं

अनभिज्ञ मृत्यूस, जीवनाची वारी
हर सांज सुरीली, हर रातभर पावरी
असे नाही की, दुःखच शेष नाही
आपले दुःख अन् लोकांचेही कमी नाही

 

प्यार इतना परायों से मुझको मिला
न अपनों से बाकी है कोई गिला
हर चुनौती से दो हाथ मैंने किए
आँधियों मे जलाए हैं बुझते दियें
आज झकझोरता तेज तूफान है
नाव भँवरों की बाहों में मेहमान है
पार पाने का कायम मगर हौसला
देख तूफाँ का तेवर तरी तन गई

परक्यांचेही मला खूप प्रेम मिळाले,
आपल्याकडूनही न उणं झाले
प्रत्येक आव्हान मी स्वीकारलेले
वादळात विझणारे दिवे उजळलेले
आज त्रेधेस वारे जरी वादळी
नाव भोवर्‍यांत सादर जरी जाहली
आस पैलतीराची न मुळी ढळली
वादळास जोखून नौकाच फुलारली


९.

 

यक्षप्रश्न
 

यक्षप्रश्न

 

जो कल थे, वे आज नहीं है
जो आज हैं वे कल नहीं होंगे
होने न होने का क्रम
इसी तरह चलता रहेगा
हम हैं, हम रहेंगे
यह भ्रम भी सदा पलता रहेगा
सत्य क्या है? होना या न होना?
या दोनो सत्य हैं?
जो है, उसका होना सत्य है
जो नहीं है उसका न होना सत्य है
मुझे लगता है कि होना न होना
एक ही सत्य के दो आयाम हैं
शेष सब समझ का फेर
बुद्धि के व्यायाम हैं

काल होते ते आज नाहीत
जे आज आहेत ते उद्या नसतील
असण्या-नसण्याचा क्रम
राहील
आहोत-असू
हा भ्रम राहील
सत्य काय आहे? असणे की नसणे
की दोन्हीही?
असणार्‍यांचे अस्तित्व की
नसणार्‍यांचे नसणे सत्य आहे
मला वाटतं की असणं-नसणं
एकाच सत्याचे आयाम आहेत
बाकी सर्व समजुती आहेत
अन् मनुबुद्धीचे व्यायाम आहेत

 

किंतु न होने के बाद क्या होता है
 यह प्रश्न अनुत्तरित हैं
प्रत्येक नचिकेता
इस प्रश्न की खोज में लगा है
सभी साधकों को इस प्रश्न ने ठगा है
शायद यह प्रश्न, प्रश्न ही रहेगा
यदि कुछ प्रश्न अनुत्तरित रहें
तो इसमें बुराई क्या है?
हां, खोज का सिलसिला न रुके
धर्म की अनुभूति, विज्ञान का अनुसंधान
एक दिन, अवश्य ही रुद्ध द्वार खोलेगा
प्रश्न पुछने बजाय
यक्ष स्वयं उत्तर बोलेगा

पण नसण्यानंतर काय होत असावं?
हा प्रश्न अनुत्तरित आहे
प्रत्येक नचिकेत
ह्याच प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेत आहे
सार्‍याच साधकांना ह्या प्रश्नाने चकवले आहे
बहुतेक  हा प्रश्न, प्रश्नच राहणारच आहे
प्रश्न अनुत्तरित राहण्यातही
वावगं काय आहे?
शोध थांबू नये
धर्माचे दृष्टांत व विज्ञानाचे संशोधन
एक दिवस, नक्कीच वाट घडवतील
प्रश्न विचारण्याऐवजी
यक्ष स्वतःच प्रश्नांची उत्तरे देईल