२०२०-१२-२२

गीतानुवाद-१७६: इन बहारों में अकेले न फिरो

मूळ हिंदी गीतः मजरूह, संगीतः रोशन, गायकः रफ़ी, आशा
चित्रपटः ममता, सालः १९६६, भूमिकाः धर्मेन्द्र, सुचित्रा सेन 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००८०६११

धृ

इन बहारों में अकेले ना फिरो
राह में काली घटा रोक ना ले
मुझ को ये काली घटा रोकेगी क्या
ये तो ख़ुद है मेरी ज़ुल्फ़ों के तले

ह्या बहारीत एकटी भटकू नको
वाटेतच रात ही रोखून ना घे
रात्र ही काळी मला रोखेल काय
राहते हीच ह्या केसांच्या तळी

ये फ़िज़ायें ये नज़ारे शाम के
सारे आशिक़ हैं तुम्हारे नाम के
फूल कहती है ओ हो हो हो
फूल कहती है तुम्हें बाद-ए-सबा
तुम्हें बाद-ए-सबा
देखना बाद-ए-सबा रोक न ले
इन बहारों में अकेले ना फिरो

हा बहर, हे दृश्य संध्याकाळचे
सारे फक्त नावाचे तव चाहते
फूल म्हणतसे ओ हो हो हो
फूल म्हणते गं तुला प्रातर्झुळूक
गं तुला प्रातर्झुळूक
जप तुला प्रातर्झुळूक रोखून ना घे
ह्या बहारीत एकटी भटकू नको

मेरी कदमों से बहारों की गली
मेरा चेहरा देखती है हर कली
जानते हैं सब ओ हो हो हो
जानते हैं सब मुझे गुलज़ार में
मुझे गुलज़ार में
रंग सब को मेरे होंठों से मिले
इन बहारों में अकेले ना फिरो

माझ्या पावलांनी बहरते वाट ही
राहे चेहरा पाहतच ही हर कळी
जाणती सगळे मला ओ हो हो हो
जाणती सगळे मला बागेमधे
मला बागेमधे
रंग सगळ्यांना या ओठांनीच दिले
ह्या बहारीत एकटी भटकू नको

बात ये है क्यूँ किसी का नाम लूँ
हो न ऐसे मै ही दामन थाम लूँ
जा रही हो तुम ओ हो हो हो
जा रही हो तुम बडे अंदाज से
बडे अंदाज से
मेरी चाहत की सदा रोक ना ले
इन बहारों में अकेले ना फिरो

नाव का घेऊ कुणाचे गोष्ट ही
त्याविनाही हात का मी ना धरू
जाशी तू तोर्‍यात ओ हो हो हो
जाशी तू तोर्‍यात मोठ्या ऐटीने
मोठ्या ऐटीने
हाक माझ्या प्रीतीची रोखून ना घे
ह्या बहारीत एकटी भटकू नको


https://www.youtube.com/watch?v=2TT2jvDdQyc

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.