२०२०-०६-०३

गीतानुवाद-१४१: तेरे प्यार का आसरा


तेरे प्यार का आसरा चाहता हूँ

मूळ हिंदी गीतः  साहिर लुधियानवी, संगीतकारः एन. दत्ता, गायकः लता, महेन्द्र कपूर
चित्रपटः धूल का फूल, सालः १९५९, भूमिकाः माला सिन्हा, राजेंद्रकुमार

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२००६०३

धृ
तेरे प्यार का आसरा चाहता हूँ
वफ़ा कर रहा हूँ वफ़ा चाहता हूँ
हसीनो से अहद-ए-वफ़ा चाहते हो
बड़े नासमझ हो ये क्या चाहते हो

तुझ्या प्रीतीचा आसरा चाहतो मी
प्रेम करतो आहे, प्रेमच चाहतो मी
सुंदरींची निष्ठा अशी चाहसी तू
असमंजस किती, हे काय चाहसी तू
तेरे नर्म बालों में तारे सजा के
तेरे शोख कदमों में कलियां बिछा के
मोहब्बत का छोटा सा मन्दिर बना के
तुझे रात दिन पूजना चाहता हूँ

तुझे रेशमी केस तार्‍यांनी सजवून
चंचल पावलांतळी कळ्या अंथरून
प्रीतीचे छोटेसे मंदिर बांधून
तुला रातदिस पूजू चाहतो मी
ज़रा सोच लो दिल लगाने से पहले
कि खोना भी पड़ता है पाने के पहले
इजाज़त तो ले लो ज़माने से पहले
कि तुम हुस्न को पूजना चाहते हो
कर विचार जरा मन जडवण्याच्यापूर्वी
मिळवण्यास काही गमवावेही लागे
जगाची आधी परवानगी तर घे की
सौंदर्याची पूजा करू चाहसी तू

कहाँ तक जियें तेरी उल्फ़त के मारे
गुज़रती नहीं ज़िन्दगी बिन सहारे
बहुत हो चुके दूर रहकर इशारे
तुझे पास से देखना चाहता हूँ
कुठवर जगू तुझ्या ओढीशी झुंजत
जगणे अशक्यच नसेल जर सोबत
पुरे जाहले आता दुरूनच इशारे
तुला जवळून पाहू चाहतो मी

मोहब्बत की दुश्मन है सारी खुदाई
मोहब्बत की तक़दीर में है जुदाई
जो सुनते नहीं हैं दिलों की दुहाई
उन्हीं से मुझे माँगना चाहते हो
प्रीतीचे शत्रू आहे सारेच जग हे
प्रीतीच्या नशीबीच आहे विलगणे
जे ऐकतच नाहीत मनाच्या हाकेला
त्यांकडेच मला मागू चाहसी तू

दुपट्टे के कोने को मुँह में दबा के
ज़रा देख लो इस तरफ़ मुस्कुरा के
मुझे लूट लो मेरे नज़दीक आ के
कि मैं मौत से खेलना चाहता हूँ
ओढणीच्या टोकाला ओठांत दाबून
जरा इकडे पाहा तर स्मित देऊन
मला लूट तू जवळ जरा येऊन
की मी मृत्यूशी खेळणे चाहतो मी

गलत सारे दावें गलत सारी कसमें
निभेंगी यहाँ कैसे उल्फ़त कि रस्में
यहाँ ज़िन्दगी है रिवाज़ों के बस में
रिवाज़ों को तुम तोड़ना चाहते हो
चुकीचेच दावे, चुकीच्याच शपथा
टिकतील कशा इथे प्रथा प्रीतीच्या ह्या
इथे जगणे आहे प्रथांच्याच हाती
प्रथांना तर तू मोडणे चाहसी तू

रिवाज़ों की परवाह ना रस्मों का डर है
तेरी आँख के फ़ैसले पे नज़र है
बला से अगर रास्ता पुर्खतर है
मैं इस हाथ को थामना चाहता हूँ
रिवाजांची परवा ना प्रथांचीही भीती
तुझ्या नेत्रीच्या निर्णयाचीच क्षिती
असो अडचणीचा जरी मार्ग खडतर
हा हातात हात धरू चाहतो मी





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.