२०२०-०६-०२

गीतानुवाद-१४०: एक सवाल मैं करूँ


एक सवाल मैं करूँ एक सवाल तुम करो

गीतकारः शैलेन्द्र, संगीतकारः शंकर-जयकिशन, गायकः लता मंगेशकर, मोहम्मद रफ़ी
चित्रपटः ससुराल, सालः १९६१, भूमिकाः राजेंद्रकुमार, सरोजादेवी

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२००६०२

धृ
एक सवाल मैं करूँ, एक सवाल तुम करो
हर सवाल का, सवाल ही जवाब हो

एक सवाल करतो मी, एक सवाल तूही कर
हर सवालाचा जवाबही, सवाल असो
प्यार की बेला, साथ सजन का, फिर क्यों दिल घबराये
नईहर से घर, जाती दुल्हन, क्यों नैना छलकाये
है मालूम कि, जाना होगा, दुनियाँ एक सराय
फिर क्यों, जाते वक़्त मुसाफ़िर, रोये और रुलाये

प्रियाराधन, साथ प्रियाची, तरी का मन घाबरते
माहेरून का, सासरी जाता, नवरी साश्रू होते
माहित आहे, एक दिस जाणे, दुनिया अल्पनिवास
तरीही का मग, जाता जीवही, स्फुंदे अन्‌ करे उदास
चाँद के माथे, दाग है फिर भी, चाँद को लाज न आये
उसका घटता, बढ़ता चेहरा, क्यों सुन्दर कहलाये
काजल से, नैनों की शोभा, क्यों दुगुनी हो जाये
गोरे गोरे, गाल पे काला, तिल क्यों मन को भाये

चंद्रावरती, डाग असून का, त्याला येई न लाज
कळीकळीने घडता चेहरा, सुंदर का म्हटला जाय
काजळाने डोळ्यांची शोभा, दुप्पट का बर होय
गोर्‍या गोर्‍या, गालीचा तिळ का, लोकप्रिय तो होय
उजियारे में, जो परछाई, पीछे पीछे आये
वही अन्धेरा, होने पर क्यों, साथ छोड़ छुप जाये
सुख में क्यों, घेरे रहते हैं, अपने और पराये
बुरी घड़ी में, क्यों हर कोई, देख के भी क़तराये

उजेडात येते जी, मागे मागे, सावली बाय
तीच सावली, अंधारी का, सोबत सोडून जाय
सुखात का, वेढून राहती, आपलेही परकेही
येता वाईट वेळ, का म्हणून, सारे सोडती हात
किसके छूने, से मिट्टी भी, सोना हो जाती है?
किसका साया, पड़े तो दौलत, मिट्टी बन जाती है?
मेहनतकश, मिट्टी को छू ले, तो सोना हो जाए
हाथ लगे, काहिल का, दौलत मिट्टी में मिल जाए

कोणी स्पर्शिल्याने माती, होते सोने सोने?
कोणाची ती पडता छाया, दौलत माती होते?
कष्टकर्‍याच्या हाती माती, होते सोने सोने
आळशाहाती दौलत पडता, माती माती होते 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.