२०२०-०४-२७

गीतानुवाद-१३९: माँग के साथ तुम्हारा


मूळ हिंदी गीतः साहिर लुधियानवी, संगीतः ओंकारप्रसाद नय्यर, गायकः रफी, आशा
चित्रपटः नया दौर, सालः १९५७, भूमिकाः दिलीप कुमार, वैजयंती माला

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२००४२७


धृ
माँग के साथ तुम्हारा
मैने माँग लिया संसार
मागुनी साथ तुझी मी
जग मागितले सारे
दिल कहे दिलदार मिला
हम कहे हमें प्यार मिला - २

प्यार मिला, हमें यार मिला
एक नया संसार मिला- २

आस मिली, अरमान मिला
जीने का सामान मिला
मिल गया एक सहारा
मन म्हणे मनमीत मिळे
आम्ही म्हणू आम्हा प्रीत मिळे - २

प्रीत मिळे, प्रियकर मिळे
एक नवे विश्वच मिळे - २

आस मिळे, ईप्सित मिळे
जगण्याचे सामान मिळे
आणि मिळे एक सहारा

दिल जवान और रुत हसीं
चल यूँ ही चल दे कहीं

तू चाहे ले चल कहीं
तुझ पे है मुझ को यकीं

जान भी तू है दिल भी तू ही
राह भी तू मंज़िल भी तू ही
और तू ही आस का तारा
मन युवा आणि ऋतू सजे
चल असेच जाऊ कुठे तरी

तू मला ने आवडेल तिथे
भरवसा तुजवर धरी

जीवही तू अन्‌ मनही तूची
रस्ताही तू, ईप्सितही तूची
आणि तूची आशेचा तारा



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.